स्टेशन डायरी अंमलदार ने तक्रार कशी नोंदवावी? (FIR Registration)

FIR Registration Points (तक्रार नोंदवून घेणे.)

सरकारी नोकर व्याख्या :-

  1. शासनाने नेमणूक केलेली व्यक्ती.
  2. शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या स्थानिक संस्थानी नेमलेली व्यक्ती.
  3. अश्या अन्य व्यक्ती ज्या व्यक्तीला आपले कायदयाने दिलेले काम करण्याकरिता अधिकार प्रधान केलेले आहेत.
  4. अशा प्रत्येक व्यक्तीचा सरकारी नोकर या व्याख्येत समावेश होतो.

स्टेशन डायरी अंमलदार ने तक्रार कशी नोंदवावी.

  • तक्रार त्वरित नोंदवावी.
  • तक्रारदार हा सरकारी नोकर आहे काय ? याची चौकशी करावी, व त्याचा उल्लेख तक्रारीत करावा. गरज वाटल्यास कार्यालयाचे कागदपत्र तपासावे.
  • गुन्हा घडले वेळेस तक्रारदार सरकारी काम करीत होता काय ? याची खात्री करावी. तसा उल्लेख तक्रारीत करावा.
  • त्याने त्याचे सरकारी काम करू नये म्हणून हल्ला करण्यात आला होता काय ? या बाबत पडताळणी करावी व त्याचा उल्लेख तक्रारीत करावा.
  • तक्रारदाराचे कामाचे स्वरुप कोणत्या प्रकारचे आहे हे तकरित नमूद करावे.
  • सरकारी नोकरावर हल्ला करताना काठी अगर इतर हत्यार वापरण्यात आले आहे का ? याची फिर्यादीकडे चौकशी करावी. त्या प्रमाणे फिर्यादीत नमूद करावे व लागू असल्यास कलमवाढ करावी.
  • घटनास्थळी फिर्यादी व आरोपी यांच्यात झटापट झाली होती का ? याची चौकशी करावी. त्यात जखमा झालेल्या असल्यास त्याचा उल्लेख तक्रारीत करावा.
  • प्रत्यक्ष पहाणारे साक्षीदार यांची नावे तक्रारीत घ्यावी.
  • घटनास्थळाचा अचूक उल्लेख तक्रारीत करावा. कार्यालयाचे बाहेर घटना घडली असल्यास तसे नमूद करावे. बरेचदा तक्रारदार field वर सुद्धा काम करतांना हमला होतो.
  • हल्ला किती वाजता सुरु करून किती वाजता संपला हे नमूद करावे. कार्यालयीन कामकाज चे वेळेनंतर हल्ला झाला असेल तर त्या प्रमाणे तक्रारीत पार्श्वभूमी नमूद करून योग्य प्रकारे तक्रार घ्यावी. तक्रारदार त्या वेळेस सरकारी काम करीत होता की त्यास सरकारी काम का करतो किंव्हा करत नाही असे मानून मारहाण केली याचा उल्लेख करावा.
  • फिर्यादी जखमी असल्यास त्यास औषोधोपचारासाठी दवाखान्यात कर्मचाऱ्यासोबत पाठवावे.
  • फिर्यादीच्या जखमांबाबत वैद्यकिय अधिकाऱ्याकडून सर्टीफिकेट मिळाले असल्यास त्याप्रमाणेच तक्रारीत नमूद करावे.
  • अपराधा नंतर चे आरोपी चे वर्तन तक्रारीत नमूद करावे.
  • तक्रारदारास सुद्धा सरकारी अधिकारी/कर्मचारी बाबत वेगळी तक्रार द्यायची असल्यास ती वरिष्ठ अधिकारी ना माहिती देऊन/ तक्रारीची व परिस्थितीची शहानिशा करून नोंदवून घ्यावी.

354 IPC ची तक्रार कधी घ्यावी.

  • पिडीत महिलेच्या बाबतीत आरोपी महिलेच्या अंगावर गेला किंवा अन्यायाची बळजोरीचा वापर केलेला असावा.
  • पीडितांच्या मनास धक्का बसावा या इरादयाने किंवा या कृतीने तिच्या मनास धक्का बसणार आहे हे माहिती असून आरोपीने हे कृत्य केले असावे.
  • आरोपीच्या कृत्याने तिच्या मनास लज्जा वाटेल असेल कृत्य आरोपीकडून झालेले असावे.

विनयभंगाची तक्रार कशी नोंदवावी:-

  • तक्रारदार पिडीत महिलच आहे की अन्य हे बघावे. पिडीत महिलेने खबर दिली नसल्यास तीने तक्रार का दिली नाही याचा फिर्यादीत उल्लेख करावा. (तिचे मानसिक संतुलन बिघडले/ ती बिमार झाली/ की घाबरून गेली/ ट्रॉमा मध्ये गेली/ अन्य काही)
  • तक्रारदारास/ पिडीतास लज्जा वाटेल अगर तिच्या मनास धक्का बसेल अशा ईरादयाने आरोपीने कृत्य केले हे तक्रारीत नमूद करून घ्यावे.
  • पिडीत महिलेचे वय व पत्ता तक्रारीत घ्यावा. पीडिता कमी वयाची असल्यास त्या प्रमाणे कायदे व कलमवाढ करावी.
  • फिर्यादीस तक्रार/ जबाब वाचून दाखवावा. तिचे म्हणणे प्रमाणे बदल करण्याजोगे असल्यास नक्की बदल करावे.
  • तक्रारीवर फिर्यादीची सही घ्यावी.
  • तक्रारी मध्ये पिडीताचा पूर्ण नावानिशी उल्लेख करावा. (तपासादरम्यान त्यावर पट्टी लावून ते नाव कुणालाही दिसणार नाही असे लपवावे. याचा अर्थ नाव पूर्ण खोडूनाच टाकावे किंव्हा ते कधीच पाहता येणार नाही इतके मिटवून तकाने अपेक्षित नाही.)
  • पिडीताचे नाव कुठेही प्रसिद्ध (publish) करू नये.
  • पत्रकार परिषदेत सुद्धा पीडिता या प्रमाणेच उल्लेख करावा.
  • पत्रकारांनी पीडितांच्या नावावरून वाद घातल्यास त्यांना कोर्ट निर्णय पाहण्यासाठी द्यावा.
  • फोनवर माहिती मिळाल्यास फोनवरुनच तक्रार घ्यावी. तक्रारीत व स्टेशन डायरीत तसा उल्लेख करावा.
  • तक्रार घेताना आवश्यकता नुसार दुभाषी वापरावा. (दुभाषी वापरल्यास फिर्यादीस तक्रार वाचून दाखवून व तीस समजावून त्यावर तिची सही घ्यावी/ दुभाषीची सुद्धा सही तक्रारीवर घ्यावी.)
  • पीडिता लहान वयात असल्यास तिचे सोबत असणाऱ्या नातेवाईकांची सही तक्रारीवर घ्यावी.
  • शक्य असल्यास फिर्याद घेताना व्हिडिओ शूटिंग करावी.
  • CCTNS चे नियम नुसार फिर्याद प्रसिद्ध (publish) करू नये.

बलात्कार ची तक्रार कशी नोंदवावी.

  • बलात्काराची तक्रार नोंदवून घेताना पिडीत व्यक्तीने दिली असलेस ती तिचे म्हणणे प्रमाणे मुद्देसुद घ्यावी.
  • सदर पिडीत व्यक्तीने खबर दिली नसलेस ती का दिली नाही याचा फिर्यादीत उल्लेख करावा. (तिचे मानसिक संतुलन बिघडले/ ती बिमार झाली/ की घाबरून गेली/ ट्रॉमा मध्ये गेली/ अन्य काही)
  • फिर्याद दाखल करताना गरज भासल्यास दुभाषी वापरण्यात यावा. 
  • फिर्यादीस तक्रार जबाब वाचून दाखवून स्वाक्षरी घेण्यात यावी.
  • फिर्यादीची तक्रार घेताना आवश्यकतेनुसार दुभाषी वापरण्यात यावा. फिर्यादीची घेतलेली फिर्याद वाचून दाखवून स्वाक्षरी घेण्यात यावी.
  • फिर्याद दाखल करताना फिर्यादीत घटनास्थळाचा ठिकाणी काही झटापटीच्या झाल्या असल्यास त्याच्या खुणा अंगावर असल्यास त्याची सखोल नोंद तक्रारीत करावी. झटापटीत बांगडयाचे तूकडे, हाताला रुतल्याने झालेल्या जखमा, फाटलेली कपडे, याचे वर्णन घ्यावे.
  • पिडीत व्यक्तीचे अंगावर ओरखडे आहेत काय याची पहाणी करावी. त्याचे वर्णन तक्रारीत घ्यावे.
  • पिडीत व्यक्तीने घटनास्थळी आरडा ओरडा केला असलेस त्याची माहीती फिर्यादीत जरूर लिहावी.
  • पिडीत व्यक्तीने आरडा ओरडा केला असलेस तिचे मदतीस कोणी धावुन आले होते काय? या बाबत पडताळणी करून त्याचे नाव फिर्यादीत नमूद करावे.
  • मदत करण्यास आलेल्या व्यक्तीने केलेल्या मदती बाबत तक्रारी उल्लेख करावा.
  • पिडीत व्यक्तीकडे तिच्यावर किती लोकांनी अत्याचार केला याची विचारपुस करावी. त्याची नोंद तक्रारीत नमूद करावी. (एक पेक्षा अधिक आरोपी असल्यास त्याप्रमाणे कलम वाढ करावी)
  • पिडीत व्यक्तीचा जन्म तारखेचा / शाळेचा दाखला पाहून तीचे वय ठरवावे. त्याप्रमाणे कायदे व कलम वाढ करावी.
  • तक्रारी मध्ये पिडीताचा पूर्ण नावानिशी उल्लेख करावा. (तपासादरम्यान त्यावर पट्टी लावून ते नाव कुणालाही दिसणार नाही असे लपवावे. याचा अर्थ नाव पूर्ण खोडूनाच टाकावे किंव्हा ते कधीच पाहता येणार नाही इतके मिटवून टाकने अपेक्षित नाही.)
  • पिडीताचे नाव कुठेही प्रसिद्ध (publish) करू नये.
  • पत्रकार परिषदेत सुद्धा पीडिता या प्रमाणेच उल्लेख करावा.
  • पत्रकारांनी पीडितांच्या नावावरून वाद घातल्यास त्यांना कोर्ट निर्णय पाहण्यासाठी द्यावा.
  • तक्रार घेताना आवश्यकता नुसार दुभाषी वापरावा. (दुभाषी वापरल्यास फिर्यादीस तक्रार वाचून दाखवून व तीस समजावून त्यावर तिची सही घ्यावी/ दुभाषीची सुद्धा सही तक्रारीवर घ्यावी.)
  • पीडिता लहान वयात असल्यास तिचे सोबत असणाऱ्या नातेवाईकांची सही तक्रारीवर घ्यावी.
  • शक्य असल्यास फिर्याद घेताना व्हिडिओ शूटिंग करावी.
  • CCTNS चे नियम नुसार फिर्याद प्रसिद्ध (publish) करू नये.
  • सदर घटनेची तक्रार नोंदवून घेतल्या नंतर सबंधीत कोर्टास एफ.आय.आर. ची प्रत पाठविन्यात यावी.
  • तक्रार घेताना आरोपी कडून झालेली गुन्हयांची रीत तक्रारीत घेण्यात यावी.
  • तक्रार घेताना गुन्हयांची तारीख, ठिकाण व वेळ निश्चित तरुण तक्रारीत घेण्यात यावी.
  • तक्रार घेताना आरोपीचे नाव / संशयिताचे नाव तक्रारीत नमूद करावे.
  • तक्रार घेताना गुन्हयात हत्यार वापरले असल्यास, वापरलेले हत्यार याची माहिती तक्रारीत घ्यावी. त्या प्रमाणे कायदे कलमवाढ करावी.
  • तक्रार घेताना तक्रारीत आरोपीनी उच्चारलेले शब्द याचा उल्लेख करावा.
  • फिर्याद घेताना गुन्हयानंतर आरोपीची कृती (पळून गेला/ तक्रार न देण्याची धमकी दिली/ पुरावे मिटविले/ पुरावे मिटविण्याचा प्रयत्न केला/ पागल झाल्याचे ढोंग केले/ स्वतःला दुखापत केली/ स्वतः आत्महत्या केली/ etc.) तक्रारीत घ्यावी.
  • पिडीत व्यक्तीचे व आरोपीचे नाते काय होते याची माहीती घेवून त्यांचे वयाचा व जातीचा दाखला पाहून त्या प्रमाणे तक्रारीत नोंद करावी.
  • पिडीत व्यक्तीची जात अनुसुचित जाती-जमातीची असल्यास त्याबाबत वरिष्ठाना कळविण्यात यावे. त्यांचे मार्गदर्शन प्रमाणे नोंदी घ्याव्या. कायदे व कलम वाढ करावी.
  • पिडीत व्यक्तीने तिच्यावर झाले अत्याचाराबाबत प्रथम कोणास सांगितले त्या साक्षीदाराचे नाव तक्रारीत घ्यावे.
  • पिडीत व्यक्तीचे व आरोपीचे पुर्वी काही अनैतीक संबंध होते काय याबाबत चौकशी करावी. त्या प्रमाणे, तथ्य आढळल्यास तक्रारीत नोंद घ्यावी.
  • पिडीत व्यक्तीवर अत्याचार करण्यासाठी आरोपीने काय बहाणा केला होता याची माहीती तक्रारीत घ्यावी.
  • पिडीत व्यक्तीवर अत्याचार करतेवेळी आरोपीने वाहनाचा वापर केला असल्यास तसे नमूद करावे.
  • अत्याचारी महिलेवर जर वाहनात अत्याचार झाला असेल तर तपासाच्या दृष्टीने वाहनाची सखोल वर्णन तक्रारीत घ्यावे.
  • पिडिताची तक्रार घेऊन तीस त्वरित दवाखान्यात उपचार कामी पाठवावे.

IPC 498 (अ) (ब) हुंड्यासाठी विवाहितेचा छळ ची तक्रार कशी घ्यावी.

  • मुलीला माहेरून पैसे आणण्याचे कारणांवरुन वरवर त्रास होत होता काय याची खात्री करावी, तसे तक्रारीत नमूद करावे.
  • लग्नास किती वर्ष झाले हे तक्रारीत नमूद करावे, तेव्हा पासून किती तक्रार झाल्या याची नोंद तक्रारीत करावी.
  • लग्नाचे वेळी हुडा वगैरे मागण्याचा प्रकार झाला होता काय ? याची चौकशी करावी. असल्यास त्या प्रमाणे नोंदी  तक्रारीत घ्या.
  • तशा प्रकारे हुंडा दिला होता का? याची चौकशी करावी. (याबाबत काही कागदोपत्री पुरावा आहे किंवा या बाबत साक्षीदार आहेत का याची नोंद तक्रारीत घ्यावी.)
  • सासरच्या कोणत्या नातेवाईकांकडून तिला त्रास होत होता ? याची चौकशी करावी, त्या प्रमाणे तक्रारीत तथ्य ची नोंद घ्यावी.
  • लग्न झालेल्या मुलीला सासरी त्रास होत होता याबाबत मुलीने तिचे आई-वडिलांना किंवा नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीणी यांना कधी पत्र किंवा चिठ्ठी पाठविली होती किंवा तक्रार केली होती का ? या बाबत पडताळणी करून आरोपी कार्यवाही करावी.
  • सदर बाबत महिला अत्याचार सुरक्षा समितीकडे अर्ज दिला होता काय ? याची तक्रारीत नोंद घ्यावी.
  • मुलीने कोणत्या पोलीस ठाण्याला लेखी अर्ज दिला किंवा एन. सी. तक्रार वगैरे केली होती का? याची माहिती घ्यावी.
  • मुलीने अगर मुलीच्या नातेवाईकांनी इतरत्र तक्रारी अर्ज दिला होता काय ? याची चौकशी करावी. असल्यास अर्जाची प्रत कागदपत्रात सामील करण्यात करावी.

खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७.

The Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957.

(उपरोक्त अधिनियमखाली, गौण खाणीजांचे अवैध उत्खनन वाहतूक व साठा बाबत, कोण फिर्याद देऊ शकतो? :-  जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उप विभागीय अधिकार, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी.)

क्रमांक गौखनि- १०/१०१४/प्र.क्र. ५०२ / ख. – खाण व खनिजे (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ (१९५७ चा क्रमांक ६७) याच्या कलम २२ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाखाली किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाखाली शिक्षापात्र असलेल्या गौण खनिजाचे उत्खनन, वाहतूक व साठा, या गुन्ह्यांच्या संबंधात, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उप विभागीय अधिकार, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना त्यांच्या त्यांच्या अधिकारितेतील समुचित न्यायालयासमोर उक्त अधिनियमाच्या कलम २२ अन्वये लेखी फिर्याद दाखल करण्याकरिता प्राधिकृत करीत आहे.

How to register a complaint? (In General)

तक्रारीचे स्वरुप लक्षात घ्यावेः-

  • तक्रार घेताना गुन्हयांचे स्वरुप दखलपात्र/ अदखलपात्र/ गंभीर/ कमी गंभीर/ अपघाती/ आत्महत्या/ हत्या/ दुखापत निश्चित करावे.

फिर्यादी ची ओळख:-

  • तक्रारीत फिर्यादीचे नाव  वय, जात, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी पुर्ण समजेल या प्रमाणे लिहावे.

घ. ता. वेळ. ठिकाण/ विलंबाचे कारण:-

  • तक्रार घेताना गुन्हयांची तारीख, ठिकाण व वेळ निश्चित करुण तक्रारीत घेण्यात यावी.
  • फिर्यादी कडून तक्रार देण्यास उशीर झाल्यास त्याचा जे कारण आहे त्या प्रमाणे विलंबाचा खुलासा तक्रार घेताना, तक्रारीत  लिहावा.
  • तक्रार घेताना गुन्हा करण्यास लागलेला वेळ तक्रारीत नमूद करावा.

गुन्ह्याचा हेतु :-

  • गुन्हा कुठल्या कारणामुळे घडला, हे प्रथम तपासावे. गुन्ह्याचा हेतु स्पस्ट झाल्यास फिर्यादीला आपल्याला त्या अनुशांगाने पुढील प्रश्न विचारता येतात.

Atrocity Act :-

  • फिर्यादीने आरोपीवर जातीवाचक छळवणुक/पिळवणुक केल्याचा आरोप केल्यास फिर्यादीत त्या अनुशंगाने तथ्य यायला पाहीजे.
  • फिर्यादी हा अनुसुचित जाती जमातीचा असल्यास तशी त्याची जात फिर्यादीत नमुद करावी.
  • आरोपीस फिर्यादी हा अनुसुचित जाती जमातीचा आहे हे माहीत होते या बाबत लिहीले जावे. (या करीता त्या दोघांचा संपर्क पहीले पासुनच होता हे दाखवावे लागेल.)

फिर्यादी आरोपी संबंध :-

  • तक्रार घेताना फिर्यादी,  आरोपीचे मयताचे संबंध, मित्र/ नातेवाईक/ जुना वाद/ अनोळखी (पहिला आहे किंव्हा माहिती आहे पण त्यास ओळखत नाही)/ अज्ञात (अजिबात काहीच माहिती नाही)/ बाबत तक्रारीत नमूद करावे.

आरोपी चे नाव व वर्णन:-

  • तक्रार घेताना आरोपीचे नाव / संशयिताचे नाव तक्रारीत नमूद करावे.
  • आरोपीस फिर्यादी /पिडीत कशा प्रकारे ओळखतो या बाबत फिर्यादीत लिहावे.

अनोळखी आरोपी :-

  • आरोपी अनोळखी असल्यास फिर्यादीत आरोपी चे वर्णन लिहावे.
  • आरोपी कुठल्या भाषेत बोलत होता ते फिर्यादीत  यावे.
  • आरोपी आरोपीच्या शरीरावरील खाना-खुणा, आरोपी जवळील वस्तु, आरोपी चे वाहन फिर्यादीत यावे.
  • बाकी इतर सर्वा बाबी ज्यामुळे आरोपीची ओळख पक्की होईल ती सर्व माहिती फिर्यादीत यावी.
  • तक्रार घेताना आरोपींना कोण कोण ओळखु शकेल ते तक्रारीत नोंदवून घ्यावे.

साक्षीदार :-

  • आरोपी व फिर्यादीच्या वादाच्या संबंधने शमील असणारे सर्व इसम तसेच घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर असणारे सर्व इसम गुन्ह्यात साक्षीदार होतात.
  • घटनेपूर्वी घटनेची पार्श्वभूमी माहिती असणारे लोक, घटने दरम्यान प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर असणारे लोक, हे गुन्ह्यात साक्षीदार होतात.
  • गुन्ह्याचे तपासात तपाशी अंमलदारास मदत करणारे अंमलदार जसे जप्त मुद्देमाल घेवून जाणारे पोलिस अंमलदार, गुन्ह्यात पंच म्हणून काम करणारे लोक, तपासात विशेष कामासाठी मदत घेतलेले तज्ञ लोक.

गुन्ह्याची रितः-

  • तक्रार घेताना गुन्हा करण्याची आरोपीची रीत (पद्धत) तक्रारीत घेण्यात यावी.

हत्यार :-

  • तक्रार घेताना गुन्हयात वापरलेले हत्यार याची माहिती तक्रारीत घ्यावी.
  • आरोपीने अपराधांनंतर हत्यार घेवून गेला की घटनास्थळावर फेकला हे स्पष्ट करावे.
  • हत्यारचे वर्णन फिर्यादीत येवू ध्यावे.
  • आरोपीने हत्यार घटनास्थळेवर येताना आणले की घटनास्थळावरील एखाध्या वस्तु चा हत्यार म्हणून वापर केला ते लिहावे.

दिवस/रात्र/प्रकाश/अंधार :-

  • गुन्ह्याची घटना ही रात्री/ दिवसा/ सकाळी/ सायंकाळी केव्हा झाली हे नमुद करावे. घटने दरम्याण प्रकाश कमी असल्यास इतर कशाचा प्रकाश होता की अंधार होता हे फिर्यादच्या गरजेनुसार स्पष्ट करावे.

गुन्ह्यातील वाहन :- 

  • आरोपीने वाहनाच्या मदतीने गुन्हा केला असल्यास..
  • गुन्ह्याच्या जागी पोहचण्याकरीता वाहन वापरले असल्यास..
  • वाहनात गुन्हा केला असल्यास..
  • त्या प्रमाने वाहनाचा उल्लेख फिर्यादीत यावा.
  • वाहनाचा उल्लेख करतांना वाहन क्रमांक, वाहन मॅडेल, गरजेनुसार इतर माहीती फिर्यादीत लिहीली जावी.

आरोपी भाषा/संभाषण/वक्तव्य :-

  • तक्रार घेताना तक्रारीत आरोपी किंवा साक्षीदारांनी उच्चारलेले शब्द याचा उल्लेख करावा.
  • फिर्याद घेताना गुन्हयानंतर आरोपीची कृती (पळून गेला/ तक्रार न देण्याची धमकी दिली/ अपघाताचे गुन्ह्यात फिर्यादीस दवाखान्यात जाण्यास मदत केली/ पुरावे मिटविले/ पुरावे मिटविण्याचा प्रयत्न केला/ पागल झाल्याचे ढोंग केले/ स्वतःला दुखापत केली/ स्वतः आत्महत्या केली/ etc.) तक्रारीत घ्यावी.
  • तक्रार घेताना मालाची बनावट वजन, आकार, याची माहिती शक्यतो अचूक घ्यावी/ अंदाज असल्यास अंदाजे लिहावे.
  • तक्रार घेताना गेलेला माल ओळखण्यालायक खुणा असल्यास त्याची नोंद तक्रारीत घ्यावी.
  • तक्रार घेताना माल कोणी तयार केला, (गावठी दारू/ गावठी कट्टा/ इत्यादी) याची नोंद तक्रारीत घ्यावी.

जखमा :- 

  • आरोपींचे/ मयताचे/  साक्षीदारांचे (संबंध आल्यास) अंगावरील कपडे इत्यांदीची सखोल नोंद (रक्ताचा डाग/ विर्याचा डाग/ उलटी डाग/ कपडे फटल्यास etc.) तक्रारीत घ्यावी.
  • तक्रार घेताना फिर्यादीला व साक्षीदाराला कोठे जखमा झाल्या असल्यास त्या बाबत नोंद घ्यावी.
  • तक्रार घेताना आरोपीला मार लागला असल्यास त्याचा उल्लेख तक्रारीत जरूर करावा. (पुराव्याचे दृष्टीने महत्वाचे)
  • तक्रार सविस्तर लिहावी,  गुन्हयात लावण्यात येणाऱ्या कलमांना अनुसरून हकीकत असावी.

CCTNS FIR/तोंडी रिपोर्ट :-

  • तक्रारची लेखी/CCTNS प्रिंटेड कॉपी/  नक्कल फिर्यादीला दयावी.
  • तक्रारची एक नक्कल कोर्टाला पाठवावी. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारीना त्या गुन्हयांची सुचना दयावी. 

सही :-

  • CCTNS मधून निघणार्‍या प्रिंटेड रीपोर्ट वर तक्रारदार ची सही घ्यावी. तसेच त्याची एक प्रत विनामूल्य फिर्यादिस ध्यावी.

स्पेशल रिपोर्टः-

  • गंभीर गुन्ह्यात थानेदरचे आदेश प्रमाणे वायरलेसवरुन  स्पेशल रीपोर्ट, सुचना, पाठवाव्यात.

Leave a Comment