POCSO गुन्ह्याचे तपासाबाबत पोलिसांना मार्गदर्शक सूचना- महाराष्ट्र शासन परिपत्रक.

POCSO गुन्ह्याचे तपासाबाबत, शासनाच्या, पोलिसांना मार्गदर्शक सूचना

बालकाची व्याख्या…

  • POSCO ACT, 2012 मध्ये “18 वर्षाखालील काणीही व्यक्ती” अशी बालकाची (CHILD) व्याख्या करण्यात आलेली आहे.
  • याचा अर्थ 18 वर्षाखालील स्त्री देखील बालक (CHILD) या संज्ञेत माडते.
  • लैंगिक गुन्हा, बालक म्हणजे 18 वर्षाखालील कोणाही व्यक्तीच्या बाबतीत घडला असेल तर POSCO ACT, 2012 च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. 

प्रथम खबर (FIR) अहवाल बाबत करावयाची कार्यवाही :-

  • कोणतीही व्यक्ती दखलपात्र गुन्हयांची माहिती देऊ शकते. केवळ पिडीत व्यक्तीनेच दखलपात्र गुन्यहयाची माहिती दिली पाहिजे याची आवश्यकता नाही. दखलपात्र गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस ठाणे अंमलदाराने पिडीत व्यक्ती स्वत: हजर होण्याची वाट न बघता त्वरीत गुन्हयाची प्रथम खबर नोंदवली पाहिजे. (कलम 19 (1) POSCO ACT, 2012); महाराष्ट्र पोलीस नियमावली, भाग-3, नियम-113.
  • कलम 326A, 326B, 354, 354A, 354B, 354C, 354D, 376, 376A, 376B, 376C, 376D, 376E, 509, भा.दं.सं. यापैकी कोणत्याही कलमाखाली दाखल गुन्हयातील बळीत स्त्रीने गुन्हयाची खबर दिल्यास सदर खबर महिला पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही महिला अधिकाऱ्याने नोंदवली पाहिजे (कलम- 154(1) फौ.प्र.सं. चे परंतुक) शारिरीक अथवा मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीवर कलम 354, 354A, 354B, 354C, 354D, 376, 376A, 376B, 376C, 376D, 376E, 509, भा.दं.सं. चा गुन्हा घडला किंवा सदर गुन्हयाचा प्रयत्न झाल्यास सदर शारिरीक अथवा मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीचा प्रथम खबरी अहवाल त्याचे निवासस्थानी किंवा त्यांच्या सोईनुसार त्यांचे पसंतीच्या ठिकाणी दुभाषकाच्या किंवा विशेष शिक्षकांच्या उपस्थितीत नोंदवावा. (कलम 154 (1) (a) फौ.प्र.सं.)
  • कलम 354, 354A, 354B, 354C, 354D, 376, 376A, 376B, 376C, 376D, 376E, 509, भा.दं.सं. यापैकी कोणत्याही कलमाखाली शारिरीक अथवा मानसिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीचा प्रथम खबरी अहवाल नोंदविण्याच्या प्रक्रियेचे चलचित्रण (Videography) केले पाहिजे. (कलम 154(1)(b) फौ.प्र.सं.)
  • प्रथम खबरी अहवालाची प्रत फिर्यादीस विनामुल्य व त्वरीत पुरविली पाहिजे (कलम 154 (2) फौ.प्र.सं.)
  • कलम 326A, 326B, 354, 354A, 354B, 354C, 354D, 376, 376A, 376B, 376C, 376D, 376E, 509, भा.दं.सं. या कलमाखालील गुन्हयांचा प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यास नकार देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. (कलम 166A (c) भा.दं.सं.)
  • गुन्हा घडल्यानंतर त्याची वर्दी त्या पोलीस ठाण्याला दिली जाईल, तो गुन्हा सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला नसला, तरीही, सदर पोलीस ठाण्यामध्ये वर्दी दिलेला गुन्हा शुन्य क्रमांकाने नोंदवून योग्य त्या पोलीस ठाण्यात त्वरेने हस्तांतरित केला पाहिजे. (मुंबई पोलीस अधिनियम भाग-3, नियम क्रमांक 119-A)

प्रथमोपचार व वैद्यकीय मदत याबाबत करावयाची कार्यवाही

  • कलम 326A, 376, 376A, 376B, 376C, 376D, 376E, भा.दं.सं. यापैकी कोणत्याही कलमान्वये घडलेल्या गुन्हयातील बळीत व्यक्तीस सर्व रुग्णालयांनी प्रथोमपचार किंवा वैद्यकीय मदत विनामुल्य पुरविण्यात यावी. (कलम 357 C फो.प्र.सं.)
  • पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसली व गुन्हा दाखल झाला नसला, तरही, ज्या बालकावर POSCO ACT. 2012 मधील कोणत्याही कलमाचा गुन्हा घडलेला आहे त्याची वैद्यकीय तपासणी कलम 164 A फौ.प्र.सं. मधील तरतुदीनुसार करणे बंधनकारक आहे. (कलम 27 (1) POSCO ACT. 2012)
  • बलात्कारच्या गुन्हयातील बळीत स्त्रीस किंवा POSCO ACT, 2012 या खाली घडलेल्या गुन्हयातील बळीत बालकास, अशा गुन्हयाची माहिती मिळाल्यापासून 24 तासाच्या आत वैद्यकिय तपासणीस पाठविणे पोलीसांना बंधनकारक आहे (कलम 164 A फौ.प्र.सं.)

बळीत स्त्री/बालकाचा जबाब याबाबत करावयाची कार्यवाही:-

  • कलम 354, 354A, 354B, 354C, 354D, 376, 376A, 376B, 376C, 376D, 376E, 509, भा.दं.सं. यापैकी कोणत्याही कलमांखाली दाखल गुन्हयातील बळीत स्त्री/बालकाचा जबाब महिला पोलीस अधिकारी किंवा महिला अधिकाऱ्याने बळीत स्त्रीच्या घरी किंवा तिच्या पसंतिच्या ठिकणी किंवा तिचे आई-वडिल किंवा पालक किंवा तिच्या विश्वासातील व्यक्तीच्या उपस्थितीत नोंदविण्यात यावा. (कलम 161 परंतुक 2 फौ.प्र. सं. व कलम – 157 (1) (ब) चे परंतुक फौ.प्र.सं.)
  • शारिरीक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्या बळीत बालकाचा जबाब नोंदविताना विशेष शिक्षक किंवा बालक ज्या पध्दतीने संवाद साधतो, ती पध्दत चांगल्या प्रकारे माहिती असलेल्या व्यक्तीची किंवा त्या क्षेत्रातील पात्रता व अनुभव असलेल्या तज्ञांची तपासी अधिकारी मदत घेऊ शकतात. (कलम 26 (3) POSCO ACT, 2012)
  • बळीत स्त्रीचा जबाब तपासी अधिकारी यांनी कलम 164 (5A) (a) फौ.प्र.सं. अन्वये संबंधित न्यास दंडाधिकाऱ्यांकडून नोंदवून घेतला पाहिजे. (कलम – 154 (1) (c) फौ.प्र.सं.
  • POSCO ACT, 2012 खाली दाखल गुन्हयातील बळीत बालकाचा जबाब त्याचे राहते घरी किंवा त्याच्या पसंतीच्या ठिकाणी पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने बालकाचे पालक किंवा त्याच्या विश्वासातील व्यक्तीच्या उपस्थितीत नोंदविला पाहिजे. (कलम – 24 (1)) POSCO ACT, 2012)
  • बालकाचा जबाब नोंदवताना महिला पोलीस अधिकारी गणवेषात असता कामा नये. (कलम 24(2) POSCO ACT, 2012)
  • POSCO ACT, 2012 या खाली दाखल गुन्हयातील बालकाची चौकशी/तपासणी करत असताना सदर बालक आरेपीच्या संपर्कात येणार नाही याची खात्री करतील. (कलम 24 (3) POSCO ACT, 2012)

आश्रयस्थान व बाल कल्याण समिती बाबत करावयाची कार्यवाही :

  • पोलीस अधिकाऱ्यास, बळीत बालकास काळजी व संरक्षणाची गरज असल्याबाबत समाधान झाल्यास, त्याने त्याची कारणे नोंदवून बालकाच्या काळजी व संरक्षणाची व्यवस्था त्वरीत / गुन्हयाची माहिती मिळाल्यापासून 24 तासात केली पाहिजे. यामध्ये बळीत बालकास आश्रयस्थान व जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा समावेश आहे. (कलम 19(5) POSCO ACT, 2012)
  • POSCO ACT, 2012 खाली दाखल गुन्हयाची माहिती व बालकास आवश्यक असलेली काळजी व संरक्षण व त्या बाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती अनावश्यक विलंब टाळून परंतु 24 तासाच्या आत बाल कल्याण समिती व POSCO ACT, 2012 अंतर्गत स्थापन विशेष न्यायलयास कळविली पाहिजे. (कलम 19 (6) POSCO ACT, 2012)

Model Guidelines By “MINISTRY OF WOMEN AND CHILD DEVELOPMENT” under Section 39 of The Protection of Children from Sexual Offences
Act, 2012

Leave a Comment