अदखलपात्र गुन्ह्याचा तपास कसा करावा ?

अदखलपात्र गुन्ह्याचा तपास मार्गदर्शन

  • CrPC कलम 2(एल) प्रमाणे ज्या अपराधाबद्दल आणि ज्या प्रकरणात वॉरंटाशिवाय अटक करण्याचा पोलीस अधिकाऱ्याला अधिकार नाही, तो अपराध, अदखलपात्र अपराध, बिनदखली अपराध, बिनदखली प्रकरण (Non-cognizable offence) असतो.
  • CrPC कलम 155(1) प्रमाणे सर्वप्रथम संबंधित ठाने अंमलदारने राज्या शासन विहीत करेल अशा नमुण्यात संबंधित गोषवार्‍याची (अदखलपात्र अपराधाची ) नोंद करेल. वर्दीदारास सदर गुन्हा अदखलपात्र असल्याने न्यायालयात दंडाधिकारी समोर दाद मागण्यासाठी पाठवेल (सुचना देईल).
  • CrPC कलम 155(2) सदर अदखलपात्र गुन्ह्याचा तपास, अशा प्रकरणाची संपरीक्षा करण्याचा किंवा ते प्रकरण संपरीक्षेसाठी सपुर्द करण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकाऱ्याच्या पुर्पवरवागी/आदेश शिवाय करणार नाही. [ ज्या दंडाधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रातील अदखलपात्र गुन्हा नाही त्याने देखील अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्याची परवाणगी दिली तरी सदर तपास हा बेकायदेशीर होत नाही. CrPC कलम 460(ब) प्रमाणे सदर चुक दुरूस्त होते. ]
  • CrPC कलम 155(3) असा अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश मिळालेला पोलीस  अधिकारी, दखलपात्र अपराध चे तपास कामी जे अधिकार ( फक्त वारंट शिवाय अटक करण्याचा अधिकार सोडुन ) वापरायचे आहे तेच अधिकार वापरेल व अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करेल.
  • CrPC कलम 155(4) प्रमाणे जेव्हा अदखलपात्र गुन्ह्याचे कलम, हे अशा गुन्ह्या सोबत जोडुन (सह कलम) म्हणुन येते ज्या गुन्ह्यात इतर कलमांपैकी एक तरी कलम दखलपात्र आहे, तेव्हा संबंधित अदखलपात्र कलम हे दखलपात्र कलम म्हणुन गणले जाते.
  • अदखलपात्र गुन्हा म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम १५५ अन्‍वये पोलीसांनी किरकोळ प्रकरणात दाखल केलेली तक्रार.
  • CrPC कलम 2(एल) प्रमाणे ज्या अपराधाबद्दल आणि ज्या प्रकरणात वॉरंटाशिवाय अटक करण्याचा पोलीस अधिकाऱ्याला अधिकार नाही, तो अपराध, अदखलपात्र अपराध, बिनदखली अपराध, बिनदखली प्रकरण असतो.
  • अदखलपात्र गुन्‍हा हे तुलनेने कमी गंभीर स्वरूपाचे गुन्‍हे असतात. उदा. शिवीगाळ करणे, मारून टाकण्याची धमकी देणे, क्षुल्लक कारणावरून भांडणे, हाताने मारहाण इ.
  • प्रभारी अधिकारी घडलेल्या अदखलपात्र गुन्हयासंबंधी लेखी तक्रार नोंदवून घेतो आणि त्याची प्रत तक्रारदाराला विनामूल्य देतो.
  • अशा प्रकरणात खटला चालवण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी प्राप्त केल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी अदखलपात्र प्रकरणांचा तपास करू शकत नाही.
  • अदखलपात्र गुन्ह्याच्या बाबतीत, पोलीस वॉरंट शिवाय (न्यायाधिशाच्या हुकुमा शिवाय) आरोपीला अटक करू शकत नाहीत.
  • एन.सी ओफेन्स (नॉन कोग्निसिबल) हा शब्द अदखलपात्र गुन्ह्यासाठी वापरला जातो.
  • या गुन्ह्यासाठी, एन.सी ओफेन्स (नॉन कोग्निसिबल) नावाचे वेगळे रजिस्टर ठेवले जाते.

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे..

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे…

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.)

Leave a Comment