दुःखापतीच्या गुन्हयाचे भा.द.वि. चे कलम 319 ते 338 (IPC Section of Injury 319-338)
दुःखापतीच्या गुन्हयाचे कलम 319 ते 338 (IPC Section of Injury 319-338)
IPC कलम 319 मध्ये साध्या दुःखापतची व्याख्या सांगितली आहे.
- एखाद्याच्या शरीरास वेदना होईल अगर विकार होईल अशी कृती केली असली पाहिजे. ( दुखापत :- खराचटने, खाली पडल्याने डोके फुटणे, गालावर थापड,
- दुःखापत होण्यासाठी किंवा आपल्या कृतीने तसे होणार आहे हे आरोपीस माहित असूनसुध्दा त्याने तशी कृती केली असली पाहिजे. (इच्छा पूर्वक)
दुःखापत:-
- ढकलल्याने खरचटले,
- ढकलढेप मध्ये खाली पडल्याने डोके फुटणे,
- गालावर थापड मारणे,
- अंगावर हाताने मारल्याने अंगात वेदना होणे,
- धक्काबुक्की केली,
- बुक्कीने मारहाण केली,
- धकलढेप केली,
- पाठीत लाथ मारली,
- केस धरून ओढले.
IPC कलम 320 मध्ये मोठी/जबर दुःखापतची व्याख्या सांगितली आहे.
मोठी व गंभीर/जबर दुखापत पुढील प्रकारच्या 8 दुखापती याच फक्त “जबर” म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत:-
- पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग)
- कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे.
- कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे.
- मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रुप करणे.
- हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे.
- ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा व्यक्तीला वीस दिवस (20) इतका काळ दुःसह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत.
इच्छापूर्वक दुःखापत पोचविणे व्याख्या IPC कलम 321.
- आरोपी कृती करतो.
- आरोपीचा तो उद्देश असतो,
- आरोपीस तो कारणीभुत आहे याची जानीव असते.
- कृत्य आपखुशीने होते.
इच्छापूर्वक जबर दुःखापत पोचविणे व्याख्या IPC कलम 322.
- आरोपी कृती करतो.
- आरोपीचा तो उद्देश असतो,
- आरोपीस तो जबर दुकापतीस कारणीभुत आहे याची जानीव असते.
- कृत्य आपखुशीने होते.
(323)
इच्छापूर्वक साधी दुखापत.
या गुन्ह्याकरिता आरोपीची कृती कशी असावी…
- एखाद्याच्या शरीरास वेदना होईल अगर विकार होईल अशी कृती केली असली पाहिजे. ( दुखापत :- खराचटने, खाली पडल्याने डोके फुटणे, गालावर थापड,
- दुःखापत होण्यासाठी किंवा आपल्या कृतीने तसे होणार आहे हे आरोपीस माहित असूनसुध्दा त्याने तशी कृती केली असली पाहिजे. (इच्छा पूर्वक)
दुखापत :-
- खराचटने,
- खाली पडल्याने डोके फुटणे,
- गालावर थापड,
- अंगावर मारल्याने अंगात वेदना होणे.
शब्दप्रयोग :-
- A ने B ला धक्काबुक्की केली.
- A ने B ला हाता – बुक्कीने मारहाण केली.
- A ने B ला धकलढेप केली.
- A ने B च्या पाठीत लाथ मारली.
- A ने B चे केस धरून ओढले.
कार्यपध्दती :-
- अपराध अदखलपात्र. (NC)
- जामीनपात्र,
- कोर्ट – JMFC.
- तोडजोड – CRPC 120(1) नुसार होते.
महत्वाचे न्यायनिवाडे :-
(324)
घातक शस्त्राचे साहाय्याने इच्छापूर्वक साधी दुखापत.
या गुन्ह्याकरिता आरोपीची कृती कशी असावी…
- तक्रारदाराच्या शरीदास वेदना, रोग अगर विकार होईल अशी कृती केली पाहिजे.
- ती कृती त्या ईरादयाने (इच्छापूर्वक) केलेली असावी किंवा या कृतीतून कोणाच्या शरीरास वेदना रोग अगर विकार होईल हे माहित असावे.
जखम :- ( जखम झालेली दिसणे गरजेचे नाही) ( जखम झाल्यास व्यक्तीला वीस दिवस (20) पेक्षा कमी काळ दुःसह शारीरिक वेदना सहन करावी लागते)
- अंगावर भोकसले (मृत्यू होईल इतकी जखम नाही)
- काठीने मारल्याने दुखापत झाली. (दुखापत किती झाली हे पाहणे गरजेचे नाही)
- शस्त्राने डोक्यावर मारले (पण जखम जास्त खोल नाही)
वापरलेले शस्त्र:-(11 प्रकारची साधने)
- गोळी घालून अपाय,
- भोकसण्याचे हत्याराने,
- कापण्याचे हत्याराने,
- मृत्यूचा धोका उत्पन्न होईल असे कोणतेही हत्यार,
- आग,
- तप्त पदार्थ,
- विष,
- अपायकारक असा पदार्थ की जो माणसाच्या शरीरात गेला असता अगर रक्तात गेला असता अपाय होतो,
- विस्फोटाच्या सहाय्याने अपाय,
- दाहक पदार्थ,
- कोणत्याही प्राण्याव्दारे इशारा करून अपाय करणे.
फिर्यादीतील शब्दप्रयोग :-
- A ने B ला चाकूने हातावर मारणे.
- A ने B ला हातात दगड धरून डोक्यावर/खांद्यावर/ पाठीवर मारले.
- फरशाने डोक्यावर मारले.
- A ने B ला तलवारीने मारून दुखापती केल्या.
कार्यपध्दती:-
- अपराध दखलपात्र.
- जामीनपात्र,
- कोर्ट – JMFC.
- तोडजोड – CRPC 120(2) नुसार होते.
महत्वाचे न्यायनिवाडे :-
(325)
घातक शस्त्राचे साहाय्याने इच्छापूर्वक जबर दुखापत.
या गुन्ह्याकरिता आरोपीची कृती कशी असावी…
- आरोपीने दुःखापत केलेली असावी.
- ती दुःखापत IPC कलम 320 मध्ये सांगितल्याप्रमाणे मोठी/जबर दुखापत असावी.
- सदरची दुःखापत आपखुशीने (इच्छापूर्वक) (IPC कलम 39) मध्ये सांगितल्या प्रमाणे असावी.
जखम :- (मोठी व गंभीर/जबर दुखापत) पुढील प्रकारच्या 8 दुखापती याच फक्त “जबर” म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत-
- पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग)
- कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे.
- कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे.
- मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रुप करणे.
- हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे.
- ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा व्यक्तीला वीस दिवस (20) इतका काळ दुःसह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत.
दुखापतीची साधने :-
- IPC कलम 324 मध्ये सांगितलेल्या साधनापेक्षा इतर साधनांनी होते.
कार्यपध्दती :-
- अपराध दखलपात्र.
- जामीनपात्र,
- कोर्ट – JMFC.
- तोडजोड – CRPC 120(2) नुसार होते.
महत्वाचे न्यायनिवाडे :-
(326)
घातक शस्त्राने इच्छापूर्वक जबर दुखापत पोचविणे.
या गुन्ह्यकरिता आरोपीची कृती कशी असावी.
- आरोपीने मोठी / गंभीर दुःखापत, आपखुषीने (इच्छापूर्वक) केलेली असावी,
- ती दुःखापत (IPC कलम 326) मध्ये सांगितलेल्या साधनांनी केली असावी.
जखम :- (मोठी व गंभीर/जबर दुखापत) पुढील प्रकारच्या 8 दुखापती याच फक्त “जबर” म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत-
- पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग)
- कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे.
- कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे.
- मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रुप करणे.
- हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे.
- ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा व्यक्तीला वीस दिवस (20) इतका काळ दुःसह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत.
वापरलेले शस्त्र:-(11 प्रकारची साधने)
- गोळी घालून अपाय,
- भोकसण्याचे हत्याराने,
- कापण्याचे हत्याराने,
- मृत्यूचा धोका उत्पन्न होईल असे कोणतेही हत्यार,
- आग,
- तप्त पदार्थ,
- विष,
- अपायकारक असा पदार्थ की जो माणसाच्या शरीरात गेला असता अगर रक्तात गेला असता अपाय होतो,
- विस्फोटाच्या सहाय्याने अपाय,
- दाहक पदार्थ,
- कोणत्याही प्राण्याव्दारे इशारा करून अपाय करणे.
फिर्यादीतील शब्दप्रयोग :-
- A ने B ला चाकूने हातावर मारणे.
- A ने B ला हातात दगड धरून डोक्यावर/खांद्यावर/ पाठीवर मारले.
- फरशाने डोक्यावर मारले.
- A ने B ला तलवारीने मारून दुखापती केल्या.
कार्यपध्दती:-
- अपराध दखलपात्र.
- अ – जामीनपात्र,
- कोर्ट – JMFC.
- तोडजोड – नाही.
महत्वाचे न्यायनिवाडे :-
(332)
लोकसेवकाला (सरकारी नोकरास) त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त (दुर) करण्यासाठी इच्छापूर्वक साधी दुखापत पोचविणे.
या गुन्ह्याकरिता आरोपीची कृती कशी असावी.
- आरोपीने सरकारी नोकरास आपखुशीने (इच्छापूर्वक) दुःखापत केलेली असावी.
- दुःखापत केली असावी.
- (वर्तमान काळात) सरकारी नोकर त्याचे कायदेशीर कर्तव्य बजावत असतांना, मारहाण करणे.
- (भविष्य काळात) त्यास त्याचे कर्तव्य करतांना प्रतिबंध व्हावा, म्हणुन मारहाण करणे.
- (भूत काळात) त्याने कायदेशीर कर्तव्य केले किंव्हा करण्याचा प्रयत्न केला असता, मारहाण करणे.
दुखापत :- साधी दुखापत झालेली असते. (IPC कलम 323 सारखी)
- खराचटने,
- ढकलल्यामुळे खाली पडल्याने डोके फुटणे,
- गालावर थापड,
- अंगावर मारल्याने अंगात वेदना होणे.
शब्दप्रयोग :- B या सरकारी नोकराने त्याचे कर्तव्य केले/करत आहे/करू नये म्हणून…
- A ने B ला धक्काबुक्की केली.
- A ने B ला हाता – बुक्कीने मारहाण केली.
- A ने B ला धकलढेप केली.
- A ने B च्या पाठीत लाथ मारली.
- A ने B चे केस धरून ओढले.
कार्यपध्दती :-
- अपराध दखलपात्र.
- अ – जामीनपात्र,
- कोर्ट – JMFC.
- तोडजोड – नाही.
महत्वाचे न्यायनिवाडे :-
(सरकारी नोकरावर हमल्याचे, IPC चे 353 हे कलम आहे.
- 332 मध्ये दुखापत करणे अपराध आहे तर
- 353 मध्ये अंगावर धावून जाणे (Assualt) हमला करणे अपराध आहे.)
(333)
लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचविणे.
या गुन्ह्याकरिता आरोपीची कृती कशी असावी.
- आरोपीने आपखुशीने (इच्छापूर्वक) दुःखापत केलेली असावी,
- सरकारी नोकर त्याचे कायदेशीर कर्तव्य करीत असतांना
- मोठी दुःखापत केलेली असावी,
- (वर्तमान काळ) जेव्हा तो सरकारी नोकर म्हणून कर्तव्य करीत असतांना, जबर मारहाण करणे.
- (भविष्य काळ) सरकारी नोकर म्हणून काम करीत असताना त्यास प्रतिबंध करणेसाठी, जबर मारहाण करणे.
- (भूत काळ) सरकारी नोकर या नात्याने कोणतेही कार्य केले असताना, जबर मारहाण करणे.
दुखापत :- जबर दुखापत झालेली असते. (IPC कलम 320 मध्ये सांगितल्या सारखी) पुढील प्रकारच्या 8 दुखापती याच फक्त “जबर” म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत-
- पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग)
- कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
- कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे.
- कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे.
- मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रुप करणे.
- हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे.
- ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा व्यक्तीला वीस दिवस (20) इतका काळ दुःसह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत.
शब्दप्रयोग :-
- B या सरकारी नोकराने त्याचे कर्तव्य केले/करत आहे/करू नये म्हणून जबर मारहाण केली.
कार्यपध्दती :-
- अपराध दखलपात्र.
- अ – अजामीनपात्र,
- कोर्ट – JMFC.
- तोडजोड – नाही.
महत्वाचे न्यायनिवाडे :-