माझ्या रजा

Disclaimer / अस्वीकरण

आपल्या मार्गदर्शनाकरीता पुरविण्यात येत असलेल्या या Website वरील PPT/PDF/Picture, या  Website च्या मालकीच्या नाहीत. सदर PPT/PDF/Picture, इंटरनेटवर इतरत्र शोधुन त्याची फक्त लिंक आपनास उपल्बध्द करुन दिली जात आहे. सदर साहित्याचा या Website शी कसलाही संबाधनाही, तसेच त्यात उहापोह केलेल्या विषयाशी आही सहमत असु असेही नाही. नमुद विशीष्ट लिंक वरती क्लिक केल्यास आपण या Website च्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जानार आहात याची नोंद घ्यावी.

रजेचा तक्ता

कर्मचारींना लगु असनाऱ्या रजेचे नाव आणि संबंधित नियम

मंजुर होवु शकनारे रजेचे दिवस

कार्यालयाने काय कार्यवाही करावी.

अर्जित रजा (पूर्ण पगारी) (Earned Leave) (म.ना.से. नियम 50) (GR : पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)

300 दिवस

(एका वेळी सलग 180 दिवस)

प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रत्‍येकी 15 दिवस या प्रमाणे एका वर्षात दोन हप्‍त्‍यात अर्जित रजा आगाऊ जमा होते.

एकूण कामाचे दिवस गुणीले  1/11 = येणारे दिवस.

(300 दिवसापर्यंत रजा कर्मचारींच्या नावे जमा करुन सर्वीस शिट मध्ये नोंद करुन ठेवावी..)

अर्ध वेतनी रजा (Half pay Leave)

(म.ना.से. नियम 60)

सेवा झालेल्या प्रत्‍येक वर्षासाठी 20 दिवस याप्रमाणे मिळतात.

प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी, प्रत्‍येकी 10 दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात आगाऊ जमा होते. (यात निलंबन काळ धरू नये.) ही रजा कोणत्‍याही कारणासाठी घेता येते. सर्विस शिट वर किती जमा होईल याच्‍या साठवणुकीवर मर्यादा नाही.

या रजेच्या कालावधीत कर्मचारीला 50% दराने वेतन मिळते, म्हणुन या रजेला अर्घ वेतनी रजा म्हणतात.

परिवर्तीत रजा (Commuted Leave) (म.ना.से. नियम 61)देय असलेल्‍या अर्ध वेतनी रजेच्‍या निम्‍मे (अर्धे) दिवस मंजुर होतात.

कर्मचारींना देय असनारी अर्धपगारी रजा दुप्‍पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मोजली जाते. जस्तीत जास्त 90 दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्‍या दुप्‍पट दिवस खर्ची पडेल)

महत्वाचे :- कर्मचारी कामावर परत न आल्‍यास या रजेचे रूपांतर अर्धवेतनी रजेत करून अतिप्रदानाची रक्‍कम वसूल करण्‍यात येते.

अनिर्जित रजा (Leave not due)

(म.ना.से. नियम 62)

अर्जित रजा अथवा अर्धवेतनी रजा शिल्‍लक नसल्‍यास ही रजा मंजूर करण्‍यात येते. वैद्‍यकीय प्रमाणपत्र असल्‍यास, जेवढी अर्ध वेतनी रजा अर्जित रजेत परीवर्तीत होण्‍याची शक्‍यता असेल तितके दिवस ही रजा मंजुर करता येते.

एकूण सेवेत जास्तित जास्त 360 दिवस.

एका वेळेस 90 दिवस. संपूर्ण सेवा काळात कमाल 180 दिवस.

अर्धवेतनी रजेतून ही रजा कपात करण्‍यास येते. ही रजा सेवेत कायम कर्मचार्‍यां साठीच अनुज्ञेय.

असाधारण रजा

(Extraordinary Leave)

(म.ना.से. नियम ६३)

तीन वर्ष सतत सेवा पूर्ण झाल्यास, ६ महिने पर्यंत मंजुर होते.

पाच वर्ष सतत सेवा पूर्ण झाल्यास, १२ महिने पर्यंत मंजुर होते.

जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग ई. साठी, १८ महिने पर्यंत मंजुर होते.

रजा खात्‍यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर…

किंवा विनंती वरुन. वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.

अस्‍थाई कर्मचारी करीता:-

वैद्‍यकीय प्रमाणपत्राशिवाय- ३ महिन्‍यापर्यंत मंजुर करता येते.

एक वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- ६ महिन्‍यापर्यंत मंजुर करता येते.

पाच वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- १२ महिन्‍यापर्यंत मंजुर करता येते.

परिविक्षाधीन कर्मचार्‍यास रजा (Leave on Probation)

(म.ना.से. नियम 64)

        एखाद्या परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यास, जणु काही त्याने आपले पद परिवीक्षे- व्यतिरिक्त कायमरीत्या धारण केले होते असे समजून या नियमांनुसार रजा मिळण्याचा हक्क असेल.       

परिविक्षाधीन कर्मचार्‍यास अनुज्ञेय रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

त्‍यापेक्षा जास्‍त रजा घेतल्‍यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल.

निवृत्तीपूर्व रजा

(Leave to Preparatory to Retirement) (म.ना.से. नियम 66)

सलग 180 दिवस किंवा एकूण सेवा कालावधित जास्तित जास्त 24 महिने.नियत सेवा निवृत्तीच्‍या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन 180 दिवस.

प्रसूती रजा

(Maternity Leave)

(म.ना.से. नियम 74)

 180 दिवस पगारी रजा

शासकीय सेवेत असणार्‍या महिला कर्मचार्‍यास, (नव्‍याने रूजु झालेल्‍यांसह) दोनपेक्षा कमी मुले हयात असतील तर अर्जाच्‍या तारखेपासून 26 आठवडे.

या रजेकरीता पहीले लागु असलेली किमान सेवेची अट रद्‍द करण्‍यात आली आहे.

गर्भपात रजा

(Abortion leave)

(म.ना.से. नियम 74(5)

वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक.सहा आठवड्‍यापेक्षा जास्‍त होणार नाही इतकी रजा.

विशेष रजा

(Special leave)

सरोगसी पध्‍दतीने जन्‍मलेल्‍या आपत्त्‍याचे संगोपन करण्‍यासाठी महिला कर्मचार्‍यास आपत्त्‍याच्‍या जन्‍म दिनांकापासून – 180 दिवससंपूर्ण सेवा कालात एकदाच अनुज्ञेय आहे. अशा महिला कर्मचार्‍यास स्वताःचे आपत्‍य नसावे तसेच तिने या आधी मुल दत्तक घेतलेले नसावे.

अपघाती/विशेष विकलांगता रजा

(Special Disability leave for Accidental Injury)

(म.ना.से. नियम 75 व 76)

कर्मचारी ज्या पदावर नियुक्त आहे त्या पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अपघात झाल्यास ही रजा अनुज्ञेय आहे. (पोलीस कर्मचारी, वन कर्मचारी, अबकारी शुल्क कर्मचारी )

¨अपघाती रजा 24 महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

¨विशेष विकलांगता रजा 120 दिवसांपेक्षा अधिक नाही, इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

रुग्‍णालयीन रजा

(Hospital Leave) (म.ना.से. नियम 77)

आपल्या पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय28 महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.

क्षय रोग/कर्क रोग/कुष्‍ठ रोग/ पक्षघात/एड्‌स रजा (T.B./Cancer/Leprosy/ Paralysis/Aids Leave)

(म.ना.से. नियम 79)

रोजंदारी व अंशकालीय कर्मचारी वगळून

तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुज्ञेय

12 ते 24 महिन्‍यांपेक्षा अधिक नाही

अध्‍ययन रजा (Study Leave)

(म.ना.से. नियम 80)

लोकसेवेची निकड, कर्तव्‍य क्षेत्राशी संबंधीत उच्‍च-शिक्षणासाठी, पाच वर्ष सेवेनंतर अनुज्ञेय

संपूर्ण सेवा कालात 12 ते 24 महिने.

अध्यायन रजे नंतर नंतर किमान तीन वर्षे सेवा बंधनकारक.

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

पिसाळलेला कुत्रा अथवा तत्‍सम जनावराने चावा घेतल्‍यास.21 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

स्‍वत: नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास6 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

एकदा केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास6 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यासकर्मचार्‍यास 4 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास

कर्मचार्‍यास 7 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

स्‍त्री कर्मचार्‍याने बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास

स्‍त्री कर्मचार्‍यास 14 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष रजा (बाल संगोपन रजा)(GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

(Special Leave) (Child care)

महिला कर्मचारी, पत्‍नी नसलेले पुरूष कर्मचारी यांच्‍यासाठी

18 वर्षेपेक्षा कमी वयाच्‍या ज्‍येष्‍ठ मुलाच्‍या संगोपनासाठी, कमाल 180 दिवस

(एका वर्षामध्‍ये दोन महिन्‍याच्‍या जास्तित जास्त मर्यादेत)

शासकीय सेवेत एक वर्ष पूर्ण झाल्‍यावर अनुज्ञेय

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याने स्‍वेच्‍छेने विनामूल्‍य रक्‍तदान केल्‍यास

कर्मचार्‍यास 1 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (एका वर्षात कमाल 10 दिवस)

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

राष्‍ट्रीय क्रिडा स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी

कॅलेंडर वर्षात 30 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(क्रिडा अधिकार्‍याचा दाखला आवश्‍यक)

विशेष नैमित्तिक रजा

(Special Casual Leave)

कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर किंवा अन्‍य वेळी केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास

कर्मचार्‍यास 7 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते.

(वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)

नैमित्तिक/किरकोळ रजा

(Casual Leave)

(अचानक, आपत्‍कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ रजा.

अत्‍यंत  निकड असतांना काढली जाते.

पोलीस कर्मचारींना या रजा 20 दिवस घेता येतात (GR बघण्यासाठी क्लिक करा…).

1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कॅलेंडर वर्षात 8 दिवस अनुज्ञेय.  साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सात दिवसा वाढविता येते.

(किरकोळ रजा शक्‍यतोवर बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतुद कायद्‍यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये.

किरकोळ रजा ही रजा समजली जात नाही. अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजा घेता येत नाहीत.

नैमित्तिक रजेच्‍या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार किंवा सार्वजनिक सुट्‍टी असली तर ती जोडून रजा घेता येते.

(कमाल सात ते दहा दिवस) सेवापुस्‍तकात नोंद घेता येत नाही. स्‍वतंत्र नोंदवही ठेवावी.

मोबदला सुट्‍टीफक्‍त निम्‍नश्रेणी (वर्ग 4) कर्मचार्‍यांना अनुज्ञेय. जादा कामाचा आर्थिक मोबदला दिल्‍यास अनुज्ञेय नाही.

सुट्‍टीत केलेल्‍या कामाचा मोबदला म्‍हणून देतात.

एक कॅलेंडर वर्षात एकावेळी तीन पेक्षा जास्‍त साठवता येत नाही. पुढीलवर्षी उपयोगात आणता येत नाही.

विपश्‍यनेसाठी रजाशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी 14 दिवस परिवर्तित रजा घेता येते.तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा काळात सहा वेळा.
विकलांग आपत्‍य रजा (Special Child Care Leave for disable child care)(GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)विकलांग आपत्‍य असलेल्‍या महिला कर्मचार्‍यास आणि विकलांग आपत्‍य असून पत्‍नी नसलेल्‍या पुरूष कर्मचार्‍यास, संपुर्ण सेवेत 730 दिवस अनुज्ञेय

40% पेक्षा जास्‍त अंधत्‍व, क्षीण दृष्‍टी, बरा न झालेला कुष्‍ठरोग, श्रवण शक्‍तीतील दोष, चलन-वलन विगलांगता, मतिमंदता, मानसिम आजार.

पहिल्‍या हयात दोन आपत्‍यांसाठी. आपत्‍याच्‍या 22 वर्षे वयापर्यंत.

एकाहून अधिक हप्‍त्‍यात- एका आर्थिक वर्षात कमाल तीन आठवडे

गिर्यारोहण मोहिम रजाएका आर्थिक वर्षात कमाल 30 दिवसभारतीय गिर्यारोहण फेडरेशन मान्‍यता प्राप्‍त किंवा भारतीय युथ होस्‍टेल संस्‍थेने आयोजित केलेली गिर्यारोहण मोहिम
महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (दत्तक रजा) (Adoption Leave) 

मुल दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक महिन्‍यापेक्षा कमी असेल तर- 1 वर्ष

मुल दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय सहा महिनेपेक्षा जास्‍त परंतु सात महिन्‍यापेक्षा कमी असेल तर – 6 महिने

मुल दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय नऊ महिनेपेक्षा जास्‍त परंतु दहा महिन्‍यापेक्षा कमी असेल तर – 3 महिने

मुल दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षाच्‍या आत असेल तर-180 दिवस

मुल दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्‍त आणि तीन वर्षापर्यंत तर-90 दिवस.

दत्तकाबाबत कायदेशीर कागदपत्रे आवश्‍यक आणि हयात आपत्‍ये  दोनपेक्षा कमी असावीत.

खाजगी शाळेतील महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (गर्भपात रजा) (Abortion Leave)संपूर्ण सेवाकाळात एकदागर्भपात/गर्भस्‍त्राव/गर्भसमापन यासाठी – 45 दिवस

महाराष्ट्र नागरी सेवा नियन 1981 (रजे बाबत च्या अध्यायनाकरीता या नियम पुस्तिकेतील प्रकरणे आपल्या समक्ष, जशी आहेत तशी ठेवली गेली आहेत. )

रजेचे नियम बाबत थोडक्यात आढावा…

 • रजा मंजूर झाल्यावरच शासकीय कर्मचारीनी  रजेवर जावे.
 • जो पर्यंत अधिकारी रजा मंजूर होत नाही, तो पर्यंत रजेवर जाता येत नाही.
 • रजा कर्मचाऱ्यांचा हक्क नाही.
 • एकदा रजा मंजूर झाली तरीही रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकारी कधीही बोलवू शकतात. 

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 10 ते 12

 • शासकीय कर्मचा-यास कामावर अनुपस्थित राहण्यासाठी सक्षम प्राधिका-याने दिलेली परवानगी म्हणजे रजा होय. (कार्यालयीन कामाची आवश्यकता व परिस्थिती पाहून रजा मंजूर करण्याविषयीचा निर्णय घेतला जातो.)

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 13.

 • सर्वसाधारण नियम म्हणून, जास्तीत जास्त १२० दिवसांच्या रजेमुळे अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची कर्तव्ये, त्याच ठिकाणच्या किंवा त्याच जिल्हघातील दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने पार पाडावीत.
 • फक्त अपवादात्मक परिस्थितीत, त्याच ठिकाणी दुसरा शासकीय कर्मचारी उपलब्ध नसेल तेव्हा जास्तीत जास्त १२० दिवसांच्या रजेवर असलेल्या शासकीय कर्मचान्याच्या पदावर स्थानापत्र नियुक्ती करण्यासाठी, दुसऱ्या ठिकाणच्या किंवा दुसऱ्या जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्याची बदली करण्यास परवानगी देता येईल.
 • अखिल भारतीय सेवेतील अधिकान्यांनी धारण केलेल्या पदांच्या बाबतीत, त्या सेवेतील अधिकारी त्याच ठिकाणी उपलब्ध नसेल तर, त्या रिक्त पदाचा कार्यभार राज्य सेवेतील अधिकान्याकडे सोपवावा.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 14.

 1. रजा मंजुर करणारा अधिकारी , कर्मचारीचे विनंती वरुन एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत, भुतलक्षी प्रभावाने परीवर्तन करु शकतो.
 2. अधिकारीनी एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत, भुतलक्षी प्रभावाने परीवर्तन केल्यावर मंजुर रजे प्रणाणे, वेतनाचे समायेजन केले जाईल.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 15.

 • जर म.ना.से. 1981, मध्ये तरतुद केली नसेल तर, कोनत्याही प्रकारच्या रजेला जोडुन कोणतीही प्रकारची रजा घेता येईल. (नैमित्तिक रजा, ही या नियमाखाली रजा मानली जात नसल्यामुळे, या नियमानुसार अनुद्येय असलेल्या इतर कोणत्याही रजेला ती जोडुन घेता येनार नाही.) 

देय व अनुदेय रजे बाबत

 • (१) (ए) शासकीय कर्मचा-यास त्याने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी २० दिवसांची अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असेल.
 • (बी) वरील खंड (ए) खाली देय होणारी रजा वैद्यकीय प्रमाणपत्त्रावर अथवा खाजगी कामासाठी देता येईल : मात्र, कायम सेवेत नसलेला शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत येईल असे रजा मंजूर करणाऱ्या प्राधिका-यास सकारण वाटत नसेल तर अशा शासकीय कर्मचाऱ्याला अर्धवेतनी रजा मंजूर करता येणार नाही. परंतु शासकीय कर्मचारी आणखी सेवा करण्यास पूर्णपणे व कायमचा असमर्थ झाला आहे असे वैद्यकीय प्राधिकाऱ्याने घोषित केले असेल तर त्याला अर्धवेतनी रजा मंजूर करता येईल.
 • (२) एखादा शासकीय कर्मचारी सेवेचे वर्ष ज्या दिवशी पूर्ण करील त्या दिवशी तो रजेवर असल्यास, त्याला कामावर परत रुजू न होता अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असेल. जेव्हा निलंबनाचा कालावधी हा ‘निलंबन कालावधी’ म्हणून समजण्यात येतो तेव्हा तो अर्धवेतनी रजेच्या प्रयोजनासाठी सेवेची पूर्ण वर्षे मोजताना वगळण्यात यावा.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 61. (परिवर्तित रजा)

( १ ) शासकीय कर्मचाऱ्यास, त्याला देय असलेल्या अर्धवेतनी रजेच्या निम्मे परिवर्तित रजा, पुढील शर्तीच्या अधीन राहून,  वैद्यकीय प्रमाणपत्रावर मंजूर करता येईल :-

 • (ए) शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची वाजवी शक्यता आहे, अशी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकान्याची खात्री पटली पाहिजे,
 • (बी) परिवर्तित रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा, अशा रजेच्या दुप्पट दिवस देय अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येतील;
 • (सी) शासकीय कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास किंवा तो स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास, परिवर्तित रजेच्या काळात काढलेले रजा वेतन आणि अर्धवेतनी रजेच्या काळात अनुज्ञेय असलेले वेतन, यांमधील फरकाची रक्कम परत करण्यात येईल अशी कबुली, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी त्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून .. घेईल.

(२) रजा मंजूर करणाऱ्या प्राधिका-याला लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यताप्राप्त पूर्णकालीन किवा अंशकालीन शिक्षणक्रमासाठी आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्याकरिता देखील सेवेच्या संपूर्ण कालावधीत कमाल ९० दिवस इतकी परिवर्तित रजा (वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल न करता ) मंजूर करता येईल.

(३) परिवर्तित रजा मंजूर करण्यात आली असेल अशा शासकीय कर्मचा-याच्या बावतीत, त्याने सेवेचा राजीनामा दिल्यास अथवा त्याला त्याच्या विनंतीवरून कामावर परत रुजू न होता स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्यास परवानगी दिल्यास, परिवर्तित रजा ही अर्धवेतनी रजा असल्याचे समजण्यात येईल आणि परिवर्तित रजेचे रजा वेतन आणि अर्धवेतनी रजेचे रजा वेतन यांमधील फरकाची रक्कम वसूल करण्यात येईल :

परंतु, शासकीय कर्मचारी रुग्णावस्थेमुळे आणखी सेवा करण्यास असमर्थ झाल्याकारणाने सेवानिवृत्त होत असेल अथवा मृत्यू पावला असेल तर, अशी कोणतीही वसुली करण्यात येणार नाही.

(टीप – शासकीय कर्मचान्याला अर्जित रजा देय असली तरीही त्याच्या विनंतीवरून त्याला परिवर्तित रजा मंजूर करता येईल.)

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 62. (अनर्जित रजा)

(१) निवृत्तिपूर्व रजा वगळून, इतर बाबतीत कायम सेवेतील शासकीय कर्मचान्याला . पुढील शर्तीच्या अधीन राहून अनर्जित रजा मंजूर करता येईल :-

 • (ए) शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची’ वाजवी शक्यता आहे, अशी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटलेली असावी;
 • (बी) त्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होण्याची शक्यता असेल त्या मर्यादेपर्यंत अनर्जित रजा असावी;
 • (सी) संपूर्ण सेवेच्या कालावधीतील अर्नाजत रजा कमाल ३६० दिवसांपर्यंत मर्यादित असावी. त्यापैकी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त ९० दिवस आणि सर्व मिळून जास्तीत जास्त १८० दिवस इतकी रजा असू शकेल;-
 • (डी) शासकीय कर्मचाऱ्याची जेवढी अर्धबेतनी रजा त्यानंतर अर्जित होईल त्या रजेच्या खाती अनर्जित रजा खर्ची टाकण्यात यावी;
 • (ई) शासकीय कर्मचान्याने राजीनामा दिल्यास किंवा कामावर परत रुजू न होता तो स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास, त्याला देण्यात आलेले रजा वेतन तो परत करील अशी कबुली रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, त्या शासकीय कर्मचान्या- कडून घेईल

(२)

 • (ए) अनर्जित रजा मंजूर करण्यात आली असेल अशा शासकीय कर्मचान्याच्या वावतीत त्याने सेवेचा राजीनामा दिल्यास अथवा त्याच्या विनंतीवरून त्याला कामावर परत रुजू न होता स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्याची परवानगी दिली असल्यास, त्याची अनर्जित रजा ज्या तारखेस सुरू झाली असेल त्या तारखेपासून सेवानिवृत्ती अथवा राजीनामा अंमलात येईल आणि अशी रजा रद्द करण्यात येऊन त्याला दिलेल्या रजा वेतनाची वसुली करण्यात येईल.
 • (बी) अनर्जित रजा घेतलेला शासकीय कर्मचारी कामावर परत रुजू होईल परंतु, अशी रजा अर्जित करण्यापूर्वी तो सेवेचा राजीनामा देईल किंवा सेवानिवृत्त होईल तर त्यानंतर त्याची जेवढी रजा अर्जित झालेली नसेल तेवढ्या रजेचे रजा वेतन परत करण्यास तो जबाबदार राहील:

मात्र, शासकीय कर्मचान्यास रुग्णावस्थेमुळे आणखी सेवा करण्यास तो असमर्थ झाल्याकारणाने सेवानिवृत्त केले असेल अथवा त्याचे वय ५०/५५ एवढे झाल्यामुळे सक्तीने : सेवानिवृत्त केले असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर खंड (ए) किंवा खंड (वी) अनुसार रजा वेतनाची वसुली करण्यात येणार नाही.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 63. (असाधारण रजा)

(१) शासकीय कर्मचा-याला पुढील विशेष परिस्थितीत असाधारण रजा मंजूर करता येईल

 • (ए) अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तेव्हा ;
 • (बी) अन्य रजा अनुज्ञेय असेल परंतु शासकीय कर्मचारी त्याला असाधारण रजा मंजूर करण्यात यावी असा लेखी अर्ज करील तेव्हा.

(२) एखाद्या प्रकरणातील अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने अन्यथा निर्धारित केले नसेल तर कायम सेवेत नसलेल्या कोणत्याही शासकीय कर्मचान्याला पुढील मर्यादेहून अधिक अशी असाधारण रजा कोणत्याही एका वेळी मंजूर करण्यात येणार नाही :-

 • (ए) तीन महिने ;
 • (बी) सहा महिने मात्र, या नियमांनुसार खंड (ए) खालील तीन महिने असाधारण रजा धरून ज्या प्रकारची रजा देय आणि अनुज्ञेय असेल ती रजा संपण्याच्या तारखेस शासकीय कर्मचाऱ्याची तीन वर्षाची संतत सेवा पूर्ण झाली असली पाहिजे आणि या नियमांनुसार आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अशा रजेसाठी त्याने केलेल्या अर्जासोबत जोडलेले असले पाहिजे;
 • (सी) बारा महिने; मात्र, यथास्थिति जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षकाने प्रमाणित केल्याप्रमाणे आजारपणामुळे शासकीय कर्मचा-याला असाधारण रजा आवश्यक असेल तर वरील पोटनियम (२) च्या (ए) आणि (बी) खालील असाधारण रजा धरून या नियमांनुसार देय व अनुज्ञेय असलेली रजा संपण्याच्या तारखेस त्याची पान वर्षांची संतत सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे;
 • (डी) बारा महिने; मात्र, एक वर्षाची संतत सेवा असेल असा शासकीय कर्मचारी, कर्करोगासाठी किंवा मानसिक आजारासाठी अशा रोगावर उपचार क णा-या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये किंवा जिल्हा शल्यचिकित्सकाकडून किंवा विशेषज्ञांकडून उपचार करून घेत असला पाहिजे;
 • (ई) अठरा महिने; मात्र, एक वर्षाची संतत सेवा पूर्ण केलेला कर्मचारी–

(एक) फुफुसांचा क्षयरोग किंवा क्षयरोगमूलक फुप्फुसावरणदाह ( ल्यूरिसी)

यासाठी मान्यताप्राप्त आरोग्यधामात उपचार करवून घेत असला पाहिजे, टीप- चान्यास फुप्फुसांचा क्षयरोग किंवा क्षयरोगजन्य फुप्फुसावरणदाह ( ब्ल्यूरिसी) झालेला असेल आणि तो आपल्या घरी संबंधित राज्य प्रशासकीय वैद्यकीय अधिकान्याकडून त्यावर औषधोपचार करवून घेत असेल आणि त्या विशेषज्ञाकडून तो उपचार करून घेत असल्याबद्दलचे व शिफारस केलेली रजा संपल्यानंतर तो बरा होण्याची वाजवी शक्यता असल्याचे त्या विशेषज्ञाच्या सहीचे प्रमाणपत्र त्या कर्मचान्याने सादर केले असेल तर त्यालाही अठरा महिन्यांच्या असाधारण रजेची सवलत अनुज्ञेय आहे.

( दोन ) शरीराच्या अन्य कोणत्याही भागाच्या क्षयरोगावर अर्हताप्राप्त क्षय- रोग विशेषज्ञ किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांजकडून उपचार करवून घेत असला पाहिजे, किंवा

( तीन ) कुष्ठरोगासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये अथवा जिल्हा शल्य- चिकित्सकाकडून, अथवा आरोग्य सेवा संचालकांनी खास रुग्णालय म्हणून मान्यता दिलेल्या कुष्ठरोग रुग्णालयातील विशेषज्ञाकडून, उपचार करवून घेत असला पाहिजे;

 • (एफ्) चोवीस महिने, मात्र, लोकहितार्थ म्हणून प्रमाणित केलेल्या अभ्यासक्रमासाठी रजा आवश्यक असेल अशा बाबतीत संबंधित शासकीय कर्मचा-यांची वरील पोटनियम (२) च्या खंड (ए) खालील तीन महिन्यांची असाधारण रजा धरून या नियमानुसार देय व अनुज्ञेय असलेली रजा संपण्याच्या तारखेस तीन वर्षांची संतत सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे.

(३) 

 • (ए) पोटनियम (२) च्या खंड (एफ्) मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदी शिथिल करून शासकीय कर्मचा-यास असाधारण रजा मंजूर करण्यात आली असल्यास, अशी रजा संपल्यानंतर तो कामावर परत येत नसेल अथवा कामावर परत आल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच सेवा सोडून जात असेल तेव्हा, त्याला अशा रजेच्या amrataये शासनाने केलेल्या प्रत्यक्ष खर्चाची आणि अन्य कोणत्याही अभिकरणाद्वारे करण्यात आलेल्या खर्चाची त्यावरील व्याजासह शासनाला परतफेड करण्याची कबुली देणारे बंधपत्र परिशिष्ट – पाच मधील नमुना ६ मध्ये करून द्यावे लागेल.
 • (बी) शासकीय कर्मचा-याच्या समान दर्जाचे अथवा त्याच्यापेक्षा वरचा दर्जा असलेले दोन स्थायी शासकीय कर्मचारी या बंधपत्राच्या पुष्ट्यर्थ जामीन म्हणून राहतील.

(४) शासनाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील अशा केंद्रांमध्ये परीक्षापूर्व प्रशिक्षण पाठ्यक्रमास हजर राहण्याकरता अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचान्यांना, पोटनियम (२) च्या तरतुदी शिथिल करून विभाग प्रमुख असाधारण रजा मंजूर करू शकेल.

(५) असाधारण रजेच्या दोन कालावधींमध्ये दीर्घ सुटीचा कालावधी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची रजा येत असेल तर, पोटनियम (२) च्या प्रयोजनासाठी हे दोन कालावधी असाधारण रजेचा एक अखंड कालावधी असल्याचे समजण्यात येईल.

(६) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी रजेशिवाय असलेल्या अनुपस्थितीच्या कालावधीचे भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तन करू शकेल.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 64. (परिवीक्षाधीन कर्मचारी, परिवीक्षेवरील कर्मचारी आणि शिकाऊ उमेदवार यांची रजा)

(१)

 • (ए) एखाद्या परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यास, जणु काही त्याने आपले पद परिवीक्षे- व्यतिरिक्त कायमरीत्या धारण केले होते असे समजून या नियमांनुसार रजा मिळण्याचा हक्क असेल.
 • (बी) जर कोणत्याही कारणास्तव परिवीक्षाधीन कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचे ठरविले असेल तर, त्याला जी कोणतीही रजा मंजूर करता येईल ती रजा-

(एक) अगोदरच मंजूर केलेला किंवा वाढवलेला परिवीक्षेचा कालावधी ज्या तारखेस समाप्त होत असेल त्या तारखेच्या पुढे जाणार नाही, किंवा

( दोन ) त्याची नियुक्ती करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या आदेशा- नुसार त्याची सेवा ज्या अगोदरच्या तारखेस समाप्त करण्यात आली असेल त्या तारखेच्या पुढे जाणार नाही.

(२) एखाद्या पदावर परिवीक्षेवर नियुक्त झालेल्या कर्मचा-यास या नियमांनुसार रजा मिळण्याचा हक्क असेल.

टीप – नोंदणी विभागातील उपनिबंधकाच्या पदांवरील परिवीक्षाधीन कर्मचारी कोणत्याही रजेस पात्र असणार नाहीत. परंतु, परिवीक्षाधीन कर्मचारी त्यानंतर कायम झाल्यास त्यांचा परिवीक्षेचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून हिशेबात घेतला जाईल.

(३) शिकाऊ उमेदवारास –

 • (ए) शिकाऊ उमेदवारीच्या कोणत्याही वर्षात, जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंत वैद्यकीय कारणास्तव अर्धवेतनाइतक्या रजा वेतनावरील रजा मिळण्याचा हक्क असेल;
 • (बी) नियम 63 अनुसार असाधारण रजा मिळण्याचा हक्क असेल.

टीप – कोणत्याही विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक झाल्याच्या तारखेस शासकीय कर्मचान्याच्या खाती जमा असलेली रजा, त्याच्या शिकाऊ उमेदवारीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर त्याची कोणत्याही पदावर नेमणूक झाल्यावर पुढे हिशेबात घेतली जाईल.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 66. (निवृत्तिपूर्व रजा)

(१) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, देव अर्धवेन रजेसह जास्तीत जास्त १८० दिवसांच्या देय अर्जित रजेइतकी निवृत्तिपूर्व रजा घेण्यास शासकीय कर्मचा-यास परवानगी देऊ शकेल. मात्र, रजेचा एकूण कालावधी २८ महिन्यांपेक्षा अधिक होता कामा नये किंवा अशी रजा नियत बदमान सेवानिवृत्तीच्या तारखेपलीकडे जाता कामा नये.

 • अधिसूचना. एलव्ही-२४८३ २०३ / एसई ५०३-१९८२ द्वारे मूळ पोटनियम (२) च्या जागी घालण्यात आला असून तो दि. २८-२-१९८३ पासून लागू करण्यात आला आहे.
 • अधिसूचना क्र. एलव्हीई-२४८ / सीआर ४८९ / एसईआर-९, दि. १८-४-१९८४ द्वारे हा खंड घालण्यात आला असून तो दि. २८-२-१९८३ पासून लागू करण्यात आला आहे.

(२) ज्या शासकीय कर्मचाऱ्याने, तो राजपत्रित असल्यास ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अथवा अराजपत्रित असल्यास ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्तीची नोटीस दिली असेल किया यथास्थिति ज्याच्या वयाची ५०/५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर समुचित प्राधिकाप्याने नोटीस दिली असेल, अशा कर्मचान्याला स्वेच्छा सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या पुढे जाणार नाही अशी देय व अनुज्ञेय रजा, ती नोटीसीच्या समाप्तीच्या तारखेपलीकडे जाणार असली तरीही, मंजूर करता येईल :

3. परंतु ज्या शासकीय कर्मचा-यास समुचित प्राधिकाप्याने नोटिशींच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन सेवानिवृत्त केले असेल असा कर्मचारी वेतन व भत्ते देण्यात आले त्या कालावधीमध्ये रजेसाठी अर्ज करू शकेल आणि जेव्हा त्याला रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा नोटिशीच्या बदल्यात ज्या कालावधी वेतन व भत्ते त्याला देण्यात आले असतील तो कालावधी वगळून रजेच्या कालावधीपुरतेच केवळ त्याला रजा वेतन मंजूर करण्यात येईल.’

टीप- निवृत्तपुर्व रजा म्हणून मंजूर केलेल्या रजेमध्ये असाधारण रजेचा समावेश होणार नाही.

(३)

 • (ए) शासनाच्या पूर्णतः किंवा बव्हंशी मालकीचे किवा शासनाच्या नियंत्रणाखाली असलेले कोणतेही स्थानिक प्राधिकरण किंवा महामंडळ किंवा कंपनी (‘स्थानिक संस्था ‘ असे निर्देशिले आहे) यातील किया याखालील स्वीयेतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचान्याने निवृत्तिपूर्व रजेसाठी अर्ज केला तर अशी रजा मंजूर करण्याचा अथवा ती नाकारण्याचा निर्णय स्वीयेतर नियोक्ता, त्याची सेवा उसनवारीवर देण्या या राज्य शासनाच्या प्राधिकान्याच्या सहमतीने घेईल.
 • (बी) शासकीय कर्मचान्याला लोकहिताच्या दृष्टीने अशा प्रकारे रजा नाकारण्यात आली असेल तर नियम ६७ अन्वये अनुज्ञेय असेल तेवढी रजा माने सेवा सोडून दिल्याच्या तारखेपासून त्याला घेता येईल.
 • (सी) निवृत्तिपूर्व रजा नाकारण्यास सेवा उसनवारीवर देणाऱ्या शासनाच्या प्राधिकाऱ्याची संमती नसेल तर ती रजा शासकीय कर्मचान्याला मंजूर करण्यात येईल आणि स्वीयेतर नियोक्त्याला त्या कालावधीत त्या अधिकाऱ्याच्या सेवेची गरज असेल तर, निवृत्तिपूर्व रजा चालू असतानाच तो नियोक्ता शासकीय कर्मचान्यास पुनर्नियुक्त करू शकेल आणि त्याचे • रजा वेतन, नियम ७० मधील पोटनियम (५) च्या तरतुदींनुसार विनियमित करण्यात येईल.

(४) शासकीय कर्मचारी पोटनियम (३) च्या खंड (ए) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्थानिक संस्थेव्यतिरिक्त अन्य संस्थेत किंवा तिच्या नियंत्रणाखालील स्वीयेतर सेवेमध्ये असेल तर, तो स्वीयेतर नियोक्त्याचे काम सोडील तेव्हाच केवळ निवृत्तिपूर्व रजा त्याला अनुज्ञेय होईल, मात्र, शासकीय कर्मचाऱ्याने अशा स्वीयेतर नियोक्त्याकडील आपली सेवा चालू ठेवली तर, नियम ६७ अन्वये नाकारलेली रजा मंजूर केली जावयास तो शासकीय कर्मचारी पात्र असणार नाही.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 67. (नियत वयमान सेवानिवृत्तीच्या अथवा सेवा सोडून जाण्याच्या तारखेनंतरची रजा)

(१) यात. यापुढे तरतूद केली असेल ते खेरीजकरून, शासकीय कर्मचान्याला–

 • (ए) त्याच्या नियत वयमान सेवानिवृत्तीच्या नंतर, किंवा
 • (बी) त्याचे काम अंतिमतः समाप्त झाल्याच्या तारखेनंतर, किंवा
 • (सी) त्याने सेवेचा राजीनामा दिल्याच्या तारखेनंतर, कोणतीही रजा मंजूर करता येणार नाही.

(२) एखाद्या शासकीय कर्मचान्याची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने, त्याच्या • नियत वयमान सेवानिवृत्तीच्या तारखेपुढे वाढवण्यात आली तर त्याला १८० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून अर्जित रजा मंजूर करता येईल.

( ३ ) कायम सेवेत नसलेल्या एखाद्या शासकीय कर्मचान्याची सेवा नोटीशीद्वारे अथवा नोटीशीच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन अथवा त्याच्या नियुक्तीच्या अटींच्या व शर्तीच्या अनुसार अन्य प्रकारे समाप्त करण्यात आली असेल तर, त्याला त्याच्या खाती जमा असलेली अर्जित रजा १२० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून मंजूर करता येईल, मग ती रजा त्याच्या सेवा समाप्तीच्या तारखेपलीकडे जात असली तरी चालेल. शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः होऊन राजीनामा दिला असेल अथवा नोकरी सोडली असेल तर त्याला ६० दिवसांच्या कमाल मर्यादेस अंधीन राहून, त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या निम्मी रजा मंजूर करता येईल :

मात्र, नियत वयमान सेवानिवृत्तीचे वय झाल्यानंतर पुनर्नियुक्त झालेल्या एखाद्या शासकीय कर्मचान्याव्यतिरिक्त इतर शासकीय कर्मचान्याला अशा प्रकारे मंजूर केलेली रजा, ज्या तारखेस त्याचे वय नियत वयमान सेवानिवृत्तीच्या वयाइतके होईल त्या तारखेच्या पलीकडे जाता कामा नये.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 68. (नियत वयमान सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचान्याच्या खाती जमा असलेल्या अजित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम)

(१) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा, नियत वयमानानंतर सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचान्यास नियत वयमानाच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या कालावधीच्या संबंधात १८० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून, रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम स्वाधिकारे मंजूर करील.

(२) वरील पोटनियम (१) खाली देय असलेल्या रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेत, सेवानिवृत्तीच्या तारखेस अंमलात असलेल्या दराने रजा वेतनावर अनुज्ञेय असलेल्या महागाई भत्त्याचाही समावेश असेल आणि ती सर्व रक्कम अंतिम प्रदान म्हणून एकाच वेळी एका ठोक रकमेत चुकती केली जाईल.

(३) या नियमानुसार रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचा हिशेब करताना स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता यांचा समावेश केला जाणार नाही.
(४) अशा प्रकारे हिशेब करून काढलेल्या सममूल्य रोख रकमेतून निवृत्तिवेतन आणि इतर निवृत्तिविषयक लाभांचे निवृत्तिवेतन सममूल्य वजा करण्यात येणार नाही.

(५) निलंबनाधीन असताना, नियत वयमान सेवानिवृत्तीचे वय झाल्यावर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या नियत वयमानाच्या तारखेस त्याच्या खात्यात जमा असलेल्या अर्जित रजेबद्दल वरील पोटनियम (१) अनुसार रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम देण्यात येईल; मात्र, तो शासकीय कर्मचारी पूर्णपणे निर्दोष ठरवलेला आहे. आणि त्याचे निलंबन पूर्णतः असमर्थनीय आहे, असे त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश देणा-या सक्षम प्राधिकाऱ्याचे मत असले पाहिजे.

टीप १. – शासकीय कर्मचारी त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेपैकी काही रजा निवृत्तिपूर्व रजा म्हणूनही घेऊ शकेल. अशा वेळी, सेवानिवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती शिल्लक राहिलेल्या अर्जित रजेबद्दल वरोल पोटनियम (१) अनुसार त्याला रजा वेतनांची सममूल्य रोख रक्कम चुकती करता येईल.

टीप २ सेवा निवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचान्याला त्याने न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम विनाविलंब मिळावी म्हणून पुढील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी :-

(ए) नियत वयमान सेवा निवृत्तीची तारीख जवळ आली आहे अशा शासकीय कर्मचान्याने त्याच्या नियत वयमानाच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचा लाभ घेण्याची त्याची इच्छा असेल तर त्याने त्याची रजा मंजूर करणान्या सक्षम प्राधिकान्यास सेवा निवृत्तीच्या तारखेच्या तीन महिने अगोदर तसे लेखी कळवले पाहिजे.

(बी)

 • (एक) राजपत्रित अधिकान्याकडून अशी सूचना मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत, सक्षम प्राधिकारी, त्या कर्मचान्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती किती अर्जित रजा जमा आहे. हे कळवण्याची विनंती लेखापरीक्षा अधिकान्याला करील.
 • (दोन) लेखापरीक्षा अधिकारी, शासकीय कर्मचान्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या निदान एक पंधरवडा अगोदर, त्याच्या खाती नियत वयमानाच्या तारखेस किती देय व अनुज्ञेय अर्जित रजा शिल्लक आहे ते सक्षम प्राधिकान्याला कळवील व त्याची एक प्रत संबंधित राजपत्रित अधिकान्याला पाठवील.
 • (तीन) सेवानिवृत्त होणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्याच्या खाती अर्जित रजा किती जमा आहे ते कळवताना लेखापरीक्षा कार्यालय, देय व अनुज्ञेय असलेल्या आणि न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचे दर कळवील. मात्र शर्त अशी की, लेखा कार्यालयाने कळविलेल्या दराने सममूल्य रोख रक्कम सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी दिली जाणार नाही आणि लेखा कार्यालयाने रजेचा हिशेब कळविल्याच्या तारखेनंतर तो अधिकारी कोणतीही अर्जित रजा घेणार नाही.

(सी) अराजपत्रित कर्मचान्याच्या बाबतीत, संबंधित कर्मचान्याकडून सूचना मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी हा त्या शासकीय कर्मचान्याच्या नियत वयमानाच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेली देय आणि अनुज्ञेय रजा किती आहे त्यासंबंधी स्वतःची खात्री करून घेईल.

(डी) वरील (ए) प्रमाणे संबंधित राजपत्रित किंवा अराजपत्रित शासकीय कर्मचान्याकडून लेखी सूचना मिळाल्यानंतर, त्याने घेतलेली कोणतीही अर्जित रजा, लेखापरीक्षा कार्यालयाने / त्याच्या कार्यालयाने कळविल्याप्रमाणे नियत वयमानाच्या तारखेस देय आणि अनुज्ञेय असलेल्या अर्जित रजेमधून प्रत्यक्षात वजा केली आहे यासंबंधी सक्षम प्राधिकारी स्वतःची खात्री करून घेईल आणि न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम मंजूर करण्यासबधीचे आवश्यक ते आदेश काढण्याची व्यवस्था करील. ही सर्व कार्यवाही संबंधित शासकीय कर्मचान्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर एक आठवडयाच्या आत करण्यात यावी.

(ई) त्यानंतर सक्षम प्राधिकारी, सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर १५ दिवसांच्या आत, न घेतलेत्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचे देयक कोषागारांकडे पाठवील.

(एफ्) नियत वयमानावर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने न घेतलेल्या रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम संबंधित लेखापरीक्षा कार्यालयाकडून विभागाकडून ‘ना मागणी प्रमाणपत्र’ मिळालेले असले किंवा नसले तरीही, देण्यात येईल.

टीप ३. शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रोख रकमेचे प्रदान पुढील रीतीने करण्यात येईल :-

 

रोख रकमेचे प्रदान =

  वेतन + सेवानिवृत्तीच्या तारखेस अनुज्ञेय

       असलेला महागाई भत्ता

——————————————————— X

                60

180 दिवसांच्या कमाल

मर्यादेस अधीन राहून

खाती जमा असलेल्या

शिल्लक अर्जित रजेचे

      दिवस.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 69. (सेवेत असताना मृत्यू झाल्यास रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम)

सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, तो कर्मचारी मृत्यू पावला नसता आणि मृत्यूच्या तारखेच्या लगतनंतर, त्याला देय व अनुज्ञेय होणाऱ्या अर्जित रजेवर गेला असता तर, त्या मृत कर्मचा-याला रजा वेतनाची जेवढी सममूल्य रोख रक्कम मिळाली असती तेवढी पण कोणत्याही परिस्थितीत १८० दिवसांबद्दलच्या रजा वेतनाहून अधिक होणार नाही इतकी रोख रक्कम त्याच्या कुटुंबाला देण्यात येईल. या रकमेतून निवृत्ति- वेतन आणि मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य कमी केले जाणार नाही.

टीप – या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेव्यतिरिक्त, मृत  शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबास केवळ महागाई भत्ता मिळण्याचा हक्क असेल. 

अध्यायन रजे व्यतिरिक्त विषेश प्रकारच्या रजा

म.ना.से. 1981, नियम क्रमांक  74. (प्रसूती रजा)

(१) कायम सेवेतील महिला शासकीय कर्मचाऱ्यास अर्ज केल्याच्या तारखेस, तीन किंवा त्यापेक्षा अधिक हयात मुले नसतील तर, या नियमाच्या तरतुदींच्या अधीन राहून, सक्षम प्राधिकारी रजा सुरू झाल्याच्या तारखेपासून ९० दिवसांच्या कालावधीइतकी प्रसूती रजा तिला मंजूर करू शकेल. अशा कालावधीत, रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल. अशी रजा, रजा खाती खर्ची टाकण्यात येणार नाही.

(२) कायम सेवेमध्ये नसलेली व कमीत कमी एक वर्ष संतत सेवेत असलेली महिला शासकीय कर्मचारीदेखील, या नियमाच्या तरतुदींच्या अधीन, पोटनियम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रसूती रजेस पात्र ठरेल. मात्र शर्त अशी की, प्रसूती रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असलेले रजा वेतन खालीलप्रमाणे विनियमित करण्यात येईल :-

 • (ए) दोन किंवा अधिक वर्षे संतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, अनुज्ञेय रजा वेतन या नियमांच्या नियम ७० च्या पोटनियम (१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे असेल; आणि
 • (बी) एक वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षांपेक्षा कमी संतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचान्याच्या बाबतीत, अनुज्ञेय रजा वेतन या नियमांच्या नियम ७० च्या पोटनियम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे असेल.
 • (३) महिला शासकीय कर्मचाऱ्याने प्रसूती रजेच्या अर्जासोबत प्रसूतीच्या संभाव्य तारखेसंबंधीचे वैद्यकीय मत अवश्य नमूद करून प्रत्यक्ष प्रसूतीची तारीख वैद्यकीय प्रमाणपत्रासह कळवण्याची हमी दिली पाहिजे. वर्ग चारच्या कर्मचा-यांच्या बाबतीत. वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे त्रासाचे होत असेल तर रजा मंजूर करणारा प्राधिकारी त्यास योग्य वाटेल असे प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.

(४) महिला शासकीय कर्मचाऱ्याची, तशी इच्छा असल्यास तिला प्रसूती रजेस जोडून परिवर्तित रजा आणि देय असेल त्या प्रकारची रजा, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करताही कमाल ६० दिवसांपर्यंत घेण्यास परवानगी देता येईल.

(५) या नियमाखालील रजा पुढील शर्तीच्या अधीन राहून, गर्भस्राव किंवा गर्भपात आणि गर्भसमापन अधिनियम, १९७१ अन्वये घडवून आणलेला गर्भपात, यांच्या बाबतीत अनुज्ञेय असेल :-

 • (ए) रजा सहा आठवड्यांपेक्षा अधिक होता कामा नये; आणि
 • (बी) रजेच्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आले पाहिजे.

(६) कार्यालय प्रमुख, या नियमाच्या तरतुदींच्या अधीन राहून कार्यव्ययी आस्थापने- वरील, किंवा उक्त्या दराने अथवा रोजंदारीवर पारिश्रमिक देण्यात येणाऱ्या महिला शासकीय कर्मचान्यास, प्रसूती रजेच्या अर्जाच्या तारखेस तिची तीन किंवा अधिक मुले 1. हयात नसतील तर, रजा सुरू झाल्याच्या तारखेपासून ९० दिवसांची प्रसूती रजा, वरील पोटनियम (३) व (५) यांच्या अधीन राहून, मंजूर करू शकेल. याबाबतच्या आणखी शर्ती खालीलप्रमाणे आहेत :- —

 • (ए) तिने प्रसूती रजा पाहिजे असलेल्या तारखेपूर्वी ( अधिकृत रजेच्या कालावधीसह ) निदान ३३ महिन्यांची संतत सेवा केलेली असली पाहिजे आणि तिची सेवा आवश्यक असेल तर कमीत कमी एका व्यक्तीच्या जामीनासह तिने अशी हमी दिली पाहिजे की, रजा समाप्त झाल्यानंतर कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधी- साठी ती कामावर परत येईल.
 • (बी) अनुज्ञेय रजा वेतन, रजेवर जाण्याच्या लगतपूर्वीच्या महिन्यात तिला मिळालेल्या वित्तलब्धी एवढे असेल.

प्रसुती रजे संदर्भात महाराष्ट्र शासनाचे दिनांक 28/07/1995 रोजीचे शासन निर्णय….

 1. प्रसुती रजेत सुधारणा तसेच मुल दत्तक घेनाऱ्या महीला शासकीय कर्मचारींना देय व अनुदेय रजा मंजुर करणे बाबत महाराष्ट्र शासनाचे दिनांक 28/07/1995 रोजीचे शासन निर्णय….(पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)
 2. प्रसुती रजेत सुधारणा तसेच मुल दत्तक घेनाऱ्या महीला शासकीय कर्मचारींना देय व अनुदेय रजा मंजुर करणे बाबत महाराष्ट्र शासनाचे दिनांक 28/07/1995 रोजीचे शासन निर्णय….(पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)
 3. प्रसुती रजेत सुधारणा तसेच मुल दत्तक घेनाऱ्या महीला शासकीय कर्मचारींना देय व अनुदेय रजा मंजुर करणे बाबत महाराष्ट्र शासनाचे दिनांक 28/07/1995 रोजीचे शासन निर्णय….(पाहण्यासाठी येथे क्लिक करा…)

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 75. (हेतुपुरस्सर केल्या गेलेल्या इजेच्या संबंधात विशेष विकलांगता रजा)

(१) शासकीय कर्मचारी ( स्थायी असो वा अस्थायी असो) आपल्या पदाच्या कर्तव्यांचे योग्य पालन करीत असताना अथवा त्याच्या परिणामी किंवा त्याच्या अधिकृत दर्जाचा परिणाम म्हणून हेतुपुरस्सर केल्या गेलेल्या किंवा झालेल्या इजेमुळे विकलांग झाल्यावर, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी अशा शासकीय कर्मचा-यास विशेष विकलांगता रजा मंजूर करू शकेल.

(२) विकलांगता ज्या घटनेतून उद्भवली असेल त्या घटनेपासून तीन महिन्यांच्या आत ती उघड झालेली नसेल आणि विकलांग व्यक्तीने ती विकलांगता तत्परतेने निदर्शनास आणून दिली नसेल तर अशी रजा मंजूर करण्यात येणार नाही :

           मात्र, विकलांगतेस कारणीभूत झालेल्या घटनेनंतर तीन महिने उलटून गेल्यावर ती विकलांगता उघड झाली असेल आणि अशा विकलांगतेच्या कारणाबद्दल रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल तर अशा प्रकरणी तो प्राधिकारी रजा मंजूर करण्यास परवानगी देऊ शकेल.

(३) मंजूर केलेल्या रजेचा कालावधी, प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे असेल व कोणत्याही परिस्थितीत तो २४ महिन्यांपेक्षा अधिक होणार नाही.

( ४ ) विशेष विकलांगता रजा अन्य कोणत्याही प्रकारच्या रजेस जोडता येईल.

(५) विकलांगता विकोपास गेली असेल किंवा तशाच परिस्थितीत नंतरच्या तारखेस पुन्हा उद्भवली असेल तर एकापेक्षा अधिक वेळा विशेष विकलांगता रजा मंजूर करता येईल. परंतु अशी रजा कोणत्याही एका विकलांगतेच्या परिणामी २४ महिन्यांपेक्षा अधिक मंजूर करण्यात येणार नाही.

(६) निवृत्तिवेतनासाठी अर्हताकारी सेवेची गणना करताना विशेष विकलांगता रजा सेवा म्हणून हिशेबात घेण्यात येईल आणि पोटनियम (७) च्या खंड (बी) च्या परंतुकान्वये मंजूर केलेल्या रजेव्यतिरिक्त विशेष विकलांगता रजा, रजाखाती खर्ची घालण्यात येणार नाही.

(७) विशेष विकलांगता रजेच्या कालावधीतील रजा वेतन पुढील प्रमाणे असेल :-

 • (ए) पोटनियम (५) खाली मंजूर केलेल्या रजेचा कालावधी धरून अशा रजेच्या पहिल्या १२० दिवसांच्या कोणत्याही कालावधीसाठी रजा वेतन अर्जित रजेवर असताना मिळणाऱ्या रजा वेतनाइतके असेल, आणि
 • (बी) अशा रजेच्या उरलेल्या कालावधीतील रजा वेतन, अर्धवेतनी रजेच्या रजा वेतनाइतके असेल : मात्र, शासकीय कर्मचा-याला स्वेच्छेनुसार आणखी जास्तीत जास्त १२० दिवसांच्या कालावधीकरिता पोटनियम (ए) अनुसार रजा वेतन घेण्याची मुभा देता येईल आणि त्या वेळी अशा रजेचा कालावधी त्याच्या अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येईल.

टीप – एकापेक्षा अधिक राज्य शासनांकडे सेवा केलेल्या शासकीय कर्मचान्याला मंजूर केलेल्या विशेष विकलांगता रजेच्या संबंधातील रजा वेतन, त्या शासनांमध्ये नेहमीच्या नियमानुसार विभागण्यात येईल.

(८)

 • (ए) ज्या कर्मचान्यास श्रमिक भरपाई अधिनियम, १९२३ (१९२३ चा ८ वा) लागू होतो अशा कर्मचान्याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाच्या कलम ४, पोटकलम (१), खंड (डी) अन्वये प्रदेय असलेल्या भरपाईच्या रकमेने कमी करण्यात येईल.
 • (बी) ज्या कर्मचान्यास राज्य कामगार विमा अधिनियम, १९४८ ( १९४८ चा ३४ वा लागू होतो अशा कर्मचान्याच्या बाबतीत, या नियमान्वये देय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाखाली तत्सम कालावधीसाठी त्याला प्रदेय असलेल्या लाभाच्या रकमेने कमी करण्यात येईल.

(९)(ए) या नियमाच्या तरतुदी —

 • (एक) सेनादलातील सेवेच्या परिणामी विकलांग झालेल्या नागरी शासकीय कर्मचा-यास, आणखी सैनिकी सेवा करण्यास अपात्र म्हणून सेवामुक्त केले असेल परंतु नागरी सेवा करण्यास तो पूर्णपणे व कायमचा असमर्थं झालेला नसेल तर अशा कर्मचा-यास लागू होतील; आणि
 • (दोन) अशा रीतीने सेवामुक्त न केलेल्या परंतु ज्याची विकलांगता सेनादलातील प्रत्यक्ष सेवेमुळे उद्भवली असल्याचे वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केले असेल, अशा नागरी सेवेतील कर्मचान्यास लागू होतील.

(बी) यांपैकी कोणत्याही प्रकरणी, अशा व्यक्तीला त्या विकलांगतेच्या संबंधात सैनिकी नियमांनुसार मंजूर करण्यात आलेल्या रजेचा कोणताही कालावधी, अनुज्ञेय रजेचा कालावधी मोजण्यासाठी, या नियमांखाली मंजूर केलेली रजा असल्याचे मानण्यात येईल.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 76. (अपघाती इजेबद्दल विशेष विकलांगता रजा)

( १ ) एखादा स्थायी किंवा अस्थायी शासकीय कर्मचारी, आपल्या पदाच्या कर्तव्यांचे योग्य पालन करीत असताना अथवा त्याच्या परिणामी किंवा त्याच्या अधिकृत दर्जाचा परिणाम म्हणून अपघाती इजेमुळे, किंवा ज्या कामामुळे त्याचा आजार अधिक वाढण्याची शक्यता आहे असे कोणतेही विशिष्ट काम पार पाडताना झालेल्या आजारामुळे किंवा तो जे नागरी पद धारण करीत असेल त्या नागरी पदाशी संलग्न असलेल्या सर्वसामान्य जोखमीपलिकडची इजा झाल्यामुळे विकलांग झाला असेल तर, त्यालाही नियम ७५ च्या तरतुदी लागू होतील.

( २ ) अम्बा प्रकरणात विशेष विकलांगता रजा मंजूर करणे हे पुढील शर्तीच्या अधीन असेल : –

 • (ए) जर विकलांगता ही, रोगामुळे आलेली असेल तर ती एखाद्या विशिष्ट प्रकारचे काम प्रत्यक्षपणे पार पाडल्यामुळे उद्भवलेली असल्याचे प्राधिकृत वैद्यकीय अधिकान्याने प्रमाणित केले असले पाहिजे; आणि
 • (बी) शासकीय कर्मचान्याला अशी विकलांगता, सेनादलातील सेवेव्यतिरिक्त अन्य सेवेमध्ये असताना आलेली असेल तर रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिका- न्याच्या मते तिचे स्वरूप अपवादात्मक असले पाहिजे; आणि
 • (सी) प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने शिफारस केलेल्या अनुपस्थितीच्या कालावधीपैकी काही कालावधी या नियमाखालील रजेमध्ये आणि काही कालावधी अन्य कोणत्याही प्रकारच्या रजेमध्ये समाविष्ट करता येईल व अर्जित रजेवर असताना अनुज्ञेय असेल इतक्या रजा वेतनावर मंजूर केलेली विशेष विकलांगता रजा १२० दिवसांहून अधिक होणार नाही

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 77. (रुग्णालयीन रजा)

(१) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा-

 • (ए) वर्ग चार चे शासकीय कर्मचारी, आणि
 • (बी) ज्यांना आपल्या कर्तव्यामध्ये घातक यंत्रसामुग्री, स्फोटक वस्तू, विषारी औषधे व तत्सम वस्तू हाताळाव्या लागतात किंवा धोक्याची कामे पार पाडावी लागतात असे वर्ग तीनचे कर्मचारी, यांना, ते कर्मचारी आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडीत असताना त्यातील प्रत्यक्ष जोखमीमुळे आजारी झाले असतील किंवा त्यांना इजा पोहोचली असेल तर अशा आजारावरील किंवा इजेवरील उपचार रुग्णालयात किंवा अन्यत्र करवून घेत असताना, रुग्णालयीन रजा मंजूर करू शकेल.

अपवाद – खाली नमूद ‘ केलेल्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये अप- घाताचा अथवा आजाराचा विशेष धोका संभवतो अशा कर्मचाऱ्यांचा आजार • अथवा इजा ते आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडीत असताना, त्यातील प्रत्यक्ष जोखमीमुळे झालेली नसली तरीही, अशा शासकीय कर्मचान्यांना देतील आजाराकरिता रुग्णालयीन रजा मंजूर करता येईल :-

 • (एक) पोलीस अधिकारी आणि हवालदाराच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे नसतील असे प्रशिक्षार्थी ;
 • (दोन) दारूबंदी व उत्पादनशुल्क विभागातील लिपिकवर्गीय कर्मचारी सोडून अन्य शासकीय कर्मचारीवर्ग ;
 • (तीन) लिपिकांव्यतिरिक्त रु. २२५ पेक्षा अधिक वेतन न घेणारे दुय्यम वन कर्मचारी.

(२) प्राधिकृत वैद्यकीय अधिकान्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यावर रुग्णालयीन रजा देण्यात येईल.

(३) रजा मंजूर करणान्या प्राधिकाऱ्यास आवश्यक वाटेल इतक्या कालावधी- साठी आणि अर्जित रजेच्या किंवा अर्धवेतनी रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असेल इतक्या रजा वेतनावर रुग्णालयीन रजा मंजूर करता येईल.

(४) रुग्णालयीन रजा ही रजा खाती खर्ची घालण्यात येणार नाही आणि अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रंजेस जोडून घेता येईल. मात्र, अशा प्रकारे जोडून घेतलेल्या अशा रजेचा एकूण कालावधी २८ महिन्यांपेक्षा अधिक होता कामा नये.

(५)

 • (ए) ज्या कर्मचान्यास श्रमिक भरपाई अधिनियम, १९२३ (१९२३ चा ८ वा) लाग होतो अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाच्या कलम ४, पोटकलम (१), खंड (डी) अन्वये प्रदेय असलेल्या भरपाईच्या रकमेने कमी करण्यात येईल.
 • (बी) ज्या कर्मचान्यास राज्य कामगार विमा अधिनियम, १९४८ (१९४८ चा (३४ वा) लागू होतो अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाखाली तत्सम कालावधीसाठी प्रदेय असलेल्या लाभाच्या रकमेने कमी करण्यात येईल.

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 78. (खलाशाची रुग्णता रजा)

 

म.ना.से. 1981, नियम क्रमांक 79. (क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघात रजा)

क्षयरोग | कर्करोग | कुष्ठरोग / पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचान्यांना रजा मंजूर करण्यासंबधीचे नियम परिशिष्ट-तीन मध्ये समाविष्ट केले आहेत.

अध्यायन रजा

म.ना.से. 1981, नियम क्रमांक  80. (अध्ययन रजेच्या मंजुरीच्या शर्ती)

(१) या प्रकरणामध्ये नमूद केलेल्या शर्तीच्या अधीन राहून, शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यक्षेत्राशी प्रत्यक्ष आणि निकट संबंध असलेल्या व्यवसाय विषयातील अथवा तांत्रिक विषयातील उच्च शिक्षण अथवा विशेषीकृत प्रशिक्षण अंतर्भूत असलेला विशेष पाठ्यक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी, लोकसेवेची निकड लक्षात घेऊन अध्ययन रजा मंजूर करता येईल.

(२) अध्ययन रजा

 • (ए) खासकीय कर्मचाऱ्याला एखाद्या नियमित विद्याविषयक किंवा निमविद्या- विषयक पाठ्यक्रमासाठी उपस्थित राहता येत नसेल असा प्रशिक्षण पाठयक्रम किंवा अध्ययन दौरा लोकहिताच्या दृष्टीने शासनाला निश्चितपणे फायदेशीर ठरणारा असल्याचे प्रमाणित करण्यात आलेले असेल तर आणि तो शासकीय कर्मचान्याच्या कर्तव्यक्षेत्राशी संबंधित असेल तर अशा प्रशिक्षण पाठ्यक्रमासाठी किंवा अध्ययन दौन्यासाठी मंजूर करता येईल; आणि
 • (बी) लोकप्रशासनाच्या यंत्रणेशी किंवा पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या अध्ययना- साठी पुढील शर्तीच्या अधीन मंजूर करता येईल :- –(एक) विशिष्ट अध्ययन किंवा अध्ययन दौरा, रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने मान्य केलेला असावा, आणि ( दोन ) शासकीय कर्मचान्याला तो अध्ययन रजेवर असताना त्याने केलेल्या कामाबाबतचा संपूर्ण अहवाल रजेवरून परत आल्यावर सादर करावा लागेल;
 • (सी) शासकीय कर्मचाऱ्याच्या कामकाजाशी निकटचा अथवा प्रत्यक्ष संबंध नसेल परंतु नागरी सेवक म्हणून त्याची क्षमता वाढीस लागेल आणि लोकसेवेच्या अन्य शाखांमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचा-यांशी तो अधिक चांगला सहयोग साधू शकेल, अशा रीतीने त्याच्या मनाची कक्षा विस्तारित करण्यास समर्थ असलेल्या अभ्यासक्रमासाठी मंजूर करता येईल.

(३) अध्ययन रजा पुढील शर्ती पूर्ण झाल्याखेरीज मंजूर करण्यात येणार नाही.

 • (ए) प्रस्तावित अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण लोकहिताच्या दृष्टीने निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे असे, रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकान्याने प्रमाणित ★ केलेले असले पाहिजे;
 • (बी) अध्ययन रजा, विद्याविषयक किंवा वाङ्मयीन विषयांव्यतिरिक्त अन्य विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असली पाहिजे : मात्र, एखादा वैद्यकीय अधिकारी आपले काम पार पाडत असताना वैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर अभ्यासक्रम त्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने मौलिक ठरेल असे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी प्रमाणित केले असेल तर तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अशा वैद्यकीय अधिकाऱ्यास अध्ययन रजा मंजूर करता येईल.
 • (सी) अशी अध्ययन रजा भारताबाहेर असेल तर भारत सरकारच्या वित्त मंत्रा- लयाच्या अर्थव्यवहार विभागाने अशा रजेसाठी विदेशी चलन उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले असले पाहिजे.

(४) भारतामध्ये पुरेशा सोयी उपलब्ध आहेत अशा विषयांचा अभ्यासक्रम किंवा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील अर्थव्यवहार विभागाने किंवा शिक्षण मंत्रालयाने चालू केलेल्या योजनांपैकी कोणत्याही योजनेखालील अभ्यासक्रम भारताबाहेर पार पाडण्यासाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात येणार नाही.

(५) सर्वसामान्यपणे अध्ययन रजा-

 • (ए) पाच वर्षांपेक्षा कमी सेवा झाली असेल अशा शासकीय कर्मचा-यास मंजूर केली जाणार नाही ;
 • (बी) ज़ो कर्मचारी अध्ययन रजा संपल्यानंतर कामावर परत येणे अपेक्षित असेल अशा तारखेपासून तीन वर्षांच्या आत सेवानिवृत्त होणार असेल अथवा जो सेवानिवृत्त होण्याचा विकल्प देऊ शकेल, अशा शासकीय कर्मचाऱ्यास मंजूर केली जाणार नाही.

(६) रजेवरील अनुपस्थितीमुळे शासकीय कर्मचाऱ्याचा त्याच्या नित्याच्या कामाशी संबंध तुटेल अथवा त्याच्या संवर्गामध्ये काही अडचणी निर्माण होतील, तर शासकीय कर्मचाऱ्याला वारंवार अध्ययन रजा मंजूर करण्यात येऊ नये.

टीप – प्रत्येक प्रकरणातील गुणवत्ता लक्षात घेऊन आणि सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्याशी विचारविनिमय करून अध्ययन रजेच्या अर्जाचा विचार करण्यात येईल..

Leave a Comment