हरविलेल्या व्यक्तींचा शोध कसा घ्यावा? (Search of Missing Person)

Procedure for Search of Missing Person.

पोलीस स्टेशन ला बऱ्याच व्यक्ती हरवील्याच्या, घरून निघून गेल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. अशा प्रकरणात एक परिपूर्ण तक्रार दिली जावी, त्या प्रकरणाचा वेळीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोध घेतला जावा (Searching of Missing Person), तपासाच्या कागदपत्रांचे उत्तम दस्तऐवाजीकरण व्हावे. या हेतूने हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या सूचना अपेक्षीत आहेत. comments box मध्ये किंव्हा आमच्या what’s app number वर लिहू शकता.

तक्रारदारने पोलिस स्टेशनला व्यक्ती हरविल्या बाबतची तक्रार कशी नोंदवावी? काय माहिती सोबत घ्यावी? (How to register a complain for missing person? What information should Complainant carry before registering complain?)

  • महाराष्ट्र पोलीस चे नागरिकांसाठीचे Citizen Portal वर Missing Person चे कॉलम मध्ये, आपल्या हरविलेल्या व्यक्ती बाबतची माहिती टाकून पडताळावी. म्हणजे पोलिस स्टेशन चे इतर कुठल्याही रेकॉर्ड वर त्याची नोंद झाली असेल तर ती आपणास कळेल. Citizen Portal ची लिंक या प्रमाणे आहे.

1) Missing Person link…. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

2) Citizen Portal link…. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

  • तक्रारदारनी प्रथम आपले राहण्याचे ठिकाण/भाग ज्या पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येते त्या पोलिस स्टेशन ला जावे. याला आपण आणखी स्पष्ट (specific) सांगायचे म्हणजे हरविलेली व्यक्ती ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीतून हरविली आहे त्या पोलिस स्टेशन च्या स्टेशन ला जावून आपली तक्रार नोंदवावी. पोलीस स्टेशन मध्ये प्रथम स्टेशन डायरी सांभाळणाऱ्या अधिकारी/अंमलदार कडे जावून व्यक्ती हरविल्या बाबत कळवावे व आपली तक्रार नोंदवावी.
  • मिसिंग रजिस्टर हे पोलीस ठाण्याकडील ठाणे अंमलदार (स्टेशन डायरी अंमलदार) कर्तव्य बजाविणाऱ्या अंमलदारांकडे ठेवण्यात येते त्यात हरविलेल्या व्यक्तींची तक्रार नोंदवून घ्यावी.
  • पोलीस ठाण्याकडील मिसिंग प्रकरणामध्ये हरविलेल्या व्यक्तींचे फोटो दिलेल्या ठिकाणी लावले जावेत या करिता आपण पोलिसांना हरविलेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो द्यावा.
  • मिसिंग नोंदवहीतील सर्व रकाने तसेच CCTNS या संगणक प्रणालीतील सर्व रकाणे पोलिसांकडून भरली जावीत या करिता पाठपुरावा करावा. (कारण पोलिसांच्या CCTNS प्रणालीत सर्व/पुरेशी माहिती भरली गेल्यास हरविलेल्या व्यक्ती बाबतची पुरेशी माहिती इंटरनेटवर गेल्याने साहजिकच हरविलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला मदत होते. ही बाब महत्त्वाची.)
  • हरविलेली व्यक्ती ही मिसिंग नोंदविताना वयस्कर असेल तर अशा संदर्भात मयत इसमांच्या यादीतील माहिती तसेच आरोपींची यादी सुद्धा पोलिस स्टेशनचे रेकॉर्ड वर तपासण्यास पाठपुरावा करावा. संबंधित हद्दीतील पोलिस स्टेशन असल्याने तेथील माहिती अध्यावत असते.
  • मयत (मृत) व्यक्ती बाबतची व अटक करण्यात आलेल्या आरोपी बाबतची माहिती मध्ये आपली व्यक्ती आहे काय हे शोधून घ्यावे. (साहजिकच हे थोडं वाईट वाटण्यासारखे आहे, आपण आपल्या व्यक्ती बाबत असा विचार करत नाही, परंतु शक्यता म्हणून तपासून घेतलेले पुढील तपासाकरिता केव्हाही चांगले.) ही माहिती महाराष्ट्र पोलिसांचे Citizen Portal वर उपलब्ध आहे. आपण ती माहिती खालील लिंक वर क्लिक करून सुद्धा जाणून घेऊ शकता.

1) Unidentified dead bodies on Citizen Portal,  मयत इसम बाबतची माहिती. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

2) Arrest Accused on Citizen Portal, अटक आरोपी बाबतची माहिती (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

पोलीस अधिकारी म्हणून पोलिस स्टेशनला व्यक्ती हरविल्या बाबतची तक्रार नोंदवून घेताना घ्यायची काळजी… (How to register complain for missing person as police officer?)

  • मिसिंग रजिस्टर हे पोलीस ठाण्याकडील ठाणे अंमलदार कर्तव्य बजाविणाऱ्या अंमलदारांकडे ठेवण्यात येते त्यात हरविलेल्या व्यक्तींची तक्रार नोंदवून घ्यावी.
  • पोलीस ठाण्याकडील मिसिंग प्रकरणामध्ये हरविलेल्या व्यक्तींचे फोटो दिलेल्या ठिकाणी लावले जावेत.
  • मिसिंग नोंदवहीतील सर्व रकाने तक्रारदार कडून माहिती घेवून भरली जावीत. (तक्रारदारनी सुद्धा सर्व रकाने भरली जावीत या करिता पाठपुरावा करावा. कारण पोलिसांच्या CCTNS प्रणालीत सर्व/पुरेशी माहिती भरली गेल्यास हरविलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला मदत होते.)
  • हरविलेली व्यक्ती ही मिसिंग नोंदविताना वयस्कर असेल तर अशा संदर्भात मयत इसमांच्या यादीतील माहिती सी. सी. टी. एन. एस. प्रणाली मध्ये तपासण्यात यावी. तसेच सी. सी. टी. एन. एस. प्रणाली मधील आरोपींची यादी सुद्धा तपासावी.
  • मयत इसमाबाबतची व अटक करण्यात आलेल्या आरोपी बाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांचे Citizen Portal वर सुद्धा उपलब्ध आहे. आपण ती खालील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता.

1) Unidentified dead bodies on Citizen Portal,  मयत इसम बाबतची माहिती. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

2) Arrest Accused on Citizen Portal, अटक आरोपी बाबतची माहिती (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

पोलिस अधिकारीनी हरविलेल्या व्यक्तीचा शोध कसा घ्यावा.. (As a police officer how to search a missing person?)

तक्रारीचे अवलोकन करावे – मिसिंग रजिस्टर मध्ये नोंद झालेल्या हरविलेल्या तक्रारीची फाईल स्वतःकडे घ्यावी, त्या मधील तक्रारीचे अवलोकन करावे.. तक्रार स्पष्ट/पुरेशी माहिती देणारी नसल्यास तक्रारदारास बोलावून परत त्याचा सविस्तर बायान घ्यावा. (उद्देश – हरविलेल्या व्यक्ती बाबतची पुरेशी माहिती गोळा करणे.) अवलोकन वरून Missing चा प्रकार ओळखावा. उदा.

  • वय कमी असल्याने समाज नसल्याने नवीन जागी,  हरविला/हरविली:-
  • विसरण्याची किव्हा ईतर बिमारी असल्याने हरवला/हरविली:-
  • पागलपणात निघून गेली/गेला:-
  • दुःखात स्वतः पळून गेला/गेली:- घरी भांडण झाल्याने, कॉलेज मध्ये कमी मार्क पडल्याने, इत्यादी..
  • खुशीत स्वतः पळून गेला/गेली:- हॉस्टेल/नातेवाईक कडे राहत होता/होती — जवळ काही पैसे जमा झाले आणि स्वतःचे घरी पळून गेला/गेली.
  • योजना करून स्वतः पाळला/पाळली :- 1) प्रेम प्रकरण सुरू होते, तिच्या/त्याच्या सोबत पळून गेला/गेली. (पैसे/दागिने/कपडे सोबत नेतो.) 2) घरचे नेहमी टोमणे मरायचे – एक दिवस अचानक जॉब शोधायला कुणालाही न सांगता पळून गेला.(documents सोबत नेतो.)
  • योजना न करता पाळला/पाळली:- रागिस्ट व्यक्ती घराच्याचा राग आल्याने.
  • दुःखात इतरांकडून पळवून नेला गेला असण्याची शक्यता. 
  • सुखात इतरांकडून पळवून नेला गेला असण्याची शक्यता.

CCTNS प्रणालीत शोध घ्यावा:

  • CCTNS प्रणालीत हरविलेल्या व्यक्ती बाबत नाव/वर्णन/वय/जन्म डाग/ठिकाण/मयत/आरोपी इत्यादी सर्व.. प्रमाणे शोध घ्यावा.
  • मिसिंग नोंदवहीतील सर्व रकाने तक्रारदार कडून माहिती घेवून भरली जावीत. (तक्रारदारनी सुद्धा सर्व रकाने भरली जावीत या करिता पाठपुरावा करावा. कारण पोलिसांच्या CCTNS प्रणालीत सर्व/पुरेशी माहिती भरली गेल्यास हरविलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला मदत होते.
  • हरविलेली व्यक्ती ही मिसिंग नोंदविताना वयस्कर असेल तर अशा संदर्भात मयत इसमांच्या यादीतील माहिती सी. सी. टी. एन. एस. प्रणाली मध्ये तपासण्यात यावी. तसेच सी. सी. टी. एन. एस. प्रणाली मधील आरोपींच्या यादी सुद्धा तपासावी.
  • मयत इसमाबाबतची व अटक करण्यात आलेल्या आरोपी बाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांचे Citizen Portal वर सुद्धा उपलब्ध आहे. आपण ती खालील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता.

1) Unidentified dead bodies on Citizen Portal,  मयत इसम बाबतची माहिती. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

2) Arrest Accused on Citizen Portal, अटक आरोपी बाबतची माहिती (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

शोध पत्रिका तयार करावी. :-

तपास करावा :-

  • बयाण घ्यावे : हरविलेल्या व्यक्तीच्या जवळच्या/दूरच्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शाळेत, त्याचे नेहमीच्या सवयीप्रमाणे वावरायच्या ठिकाणी, शेजारी पाजारी, इत्यादी व अनेक सर्व ठिकणी चौकशी करून बयान घ्यावे.
  • वाहन शोध करावा : Missing व्यक्तीने निघून जाताना वाहनाचा वापर केला असल्यास.. पेट्रोल पंप, पेट्रोल पंप वरील CCTV फुटेज चेक करावे.
  • टोल नाक्यावरील CCTV तपासावे, नोंदी तपासाव्या.
  • ट्रॅफिक पोलिसांचे CCTV footage तपासावे.
  • रेल्वे मार्ग/बस स्टँड वरील CCTV फुटेज तपासावे.
  • त्या वेळेतील बस, रेल्वे search करावे.
  • CDR/SDR/LOCATIN:- मिसिंग मधील वयात आलेल्या मुली/स्त्रिया विवाहीत/अविवाहित असून, प्रेमप्रकरणात लिप्त आहेत, त्या हरविलेल्या आहेत. म्हणजेच त्या गावातील संबंधित पुरुष व्यक्ती देखील परिसरात दिसून येत नसल्यास व त्याबाबत मिसिंग दाखल नसल्यास अशा पुरुष व्यक्ती बाबत गोपनिय माहिती काढून/त्याच्या वापरत्या मोबाईल ची माहिती (CDR/SDR/LOCATIN) घेवून अश्या मिसिंग प्रकरनांची निर्गती करावी.
  • Missing व्यक्तीने वापरलेले सोशल मीडियाचे ट्रॅकिंग करावे..
  • Missing व्यक्तीने वापरलेले ATM Card चे location घ्यावे, त्या परिसरातील सर्व संभावित ठिकाणी शोध घ्यावा.
  • Missing व्यक्ती हरविण्याचे पाहिले ज्या मोठ्या सहरचे  ठिकाणी गेलेली असेल, त्या ठिकाणी शोध घ्यावा.

पोलिस स्टेशन चे रेकॉर्ड तपासावे:

  • पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्ती बाबत अकस्मात मयत दाखल असतो. तरी परंतू संबंधित बाबतीत मिसिंग नोंद होवून प्रकरण चौकशीवर प्रलंबित असते याबाबत तपासी अधिकारी यांनी खातरजमा करावी.

हरवीलेली व्यक्ती मिळून आल्यास काय करावे (Police procedure after funding of Missing Person.)

  • हरविलेल्या व्यक्तीचा बायाण घ्यावा : हरविलेल्या व्यक्तींचा बायन घ्यावा. (त्यात ती व्यक्ती कशी हरविली, त्याचे सोबत गुन्हा घडला काय?, ती कशी सापडून आली या बाबत सविस्तर माहिती विचारून बयाण लिहावे.)
  • सपूर्तनामा : हरविलेली व्यक्ती संबंधितांकडे ज्या मानसिक व शारीरिक स्थितीत मिळाली त्या स्थितीत सपूर्त केली बाबत सुचानापत्र देऊन आवश्यक त्या स्टेशन डायरी/रजिस्टरला नोंदी घ्याव्यात.
  • गुन्हा पडताळणी : हरविलेल्या व्यक्तीच्या सोबत गुन्हा घडला असेल तर गुन्हा दाखल करावा, व PSO चे आदेश प्रमाणे पुढील चौकशी करावी 
  • Crime Writer ला अहवाल : हरविलेल्या व्यक्तीच्या सोबत गुन्हा घडला नसेल तर हरवीलेली व्यक्ती मिळून आल्या बाबत क्राईम राईटरला लेखी अहवाल द्यावा. त्याचे दस्तऐवजतून प्रकरण कमी करून घ्यावे.
  • निपटारा : या प्रमाणे Missing प्रकरणाचा निपटारा करावा.
  • CCTNS नोंदी : पटारा प्रमाणे CCTNS मध्ये नोंदी घ्याव्यात.

वरिष्ठ अधिकारींनी हरविलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेणारे तपासी अंमलदार यांना योग्य शोध करणे करिता मार्गदर्शन करावे.

  • मयत चौकशी (मार्ग चौकशी) व missing चौकशी:- पोलीस ठाण्याकडे अकस्मात मार्ग दाखल आहे. परंतू संबंधित इसमाने बाबतीत त्याच पो.स्टे. ला किंव्हा इतर पोलिस स्टेशन ला मिसिंग प्रकरण चौकशीवर प्रलंबित आहे. याबाबत प्रभारी अधिकारी यांनी खातरजमा करावी. (CCTNS ची मदत घ्यावी.)
  • Missing चौकशी अधिकारी कडे, क्राईम राईटरला लेखी अहवाल देणे:- मिसिंग मधील बरीच प्रकरणे चौकशी अधिकारी यांनी निर्गती केलेली असतात. परंतू पोलीस स्टेशनचा क्राईम राईटर कर्मचारी यांना लेखी अहवाल न दिल्याने क्राईम राईटर कर्मचारी तो प्रकरणे प्रलंबित दाखवितो याबाबत प्रभारी अधिकारी यांनी Missing चौकशी अधिकारी कडे, क्राईम राईटरला लेखी अहवाल देणे बाबत पाठपुरावा करावा.
  • CCTNS प्रणाली मध्ये नोंद :- प्रभारी अधिकारी यांनी मिसिंग प्रकरणे, आरोपी अटक, अकस्मात मयत प्रकरणांची सी.सी.टी.एन.एस. मध्ये नोंद झाल्याची खात्री करावी. त्यामध्ये बऱ्याच मिसिंग प्रकरणांच्या व्यक्तींचा शोध होऊन प्रकरणे निपटारा करणे सहज शक्य होईल. याबाबत प्रभारी अधिकारी यांनी क्राईम कर्मचारी तसेच तपासी अधिकारी/मिसिंग प्रकरणे चौकशी अंमलदार यांची एकत्रित बैठक घेऊन मिसिंग प्रकरणांचा निपटारा केल्यास सोईचे होते.
  • उप विभागीय पोलीस अधिकारी:- पोलीस ठाण्याच्या भेटीच्या अनुषंगाने उप विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या गुन्हे निपटायाच्या व मिसिंग प्रकरणे निपटाराच्या अनुषंगाने, मिसिंग प्रकरनांची अभिलेख परिपुर्ण ठेवण्याच्या दृष्टीने ही सर्व अधिकारी/अंमलदार यांना सूचना करावेत. पोलीस ठाणे भेटी दरम्यान पाठपुरावा करावा.
  • सात वर्ष (7 वर्षे) पुर्ण झालेली प्रकरणे:- पोलीस ठाण्या कडील मिसिंग प्रकरणे ही चौकशीवर ठेवण्यात आल्यानंतर ज्या प्रकरणांना 7 वर्षे पुर्ण झालेली आहेत अशी प्रकरणे भारतीय पुरावा कायदा 1872 वे कलम 108 च्या तरतुदीनुसार अशी प्रकरणे डॉरमेंन्ट फाईलवर ठेवण्यात येतात. त्याप्रमाणे आपले पोलीस ठाण्याकडील ज्या प्रकरणाचा चौकशीचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशी प्रकरणे डॉरमंन्ट फाईलवर ठेवणेबाबत अहवाल सादर करण्यास सूचना द्याव्यात.
  • Dormant ठेवायची प्रकरणे वरिष्ठ कार्यालयास पाठविताना चौकशी अंमलदार यांनी चौकशीचे सर्व मुद्याबाबत पुर्तता करून पाठविल्यास प्रकरण परत येत नाहीत.

-: Missing Dormant files :-

पोलीस ठाण्याकडील मिसिंग प्रकरणे ही चौकशीवर ठेवण्यात आल्यानंतर ज्या प्रकरणांना 7 वर्षे पुर्ण झालेली आहेत अशी प्रकरणे भारतीय पुरावा कायदा 1872 वे कलम 108 च्या तरतुदीनुसार (Missing Dormant files) डॉरमेंन्ट फाईलवर ठेवण्यात येतात.

  • त्याप्रमाणे पोलीस ठाण्या कडील ज्या प्रकरणात चौकशीचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशी प्रकरणे डॉरमंन्ट फाईलवर ठेवणे बाबत वरिष्ठ अधिकारी ना अहवाल सादर करण्यात यावा.

Dormant ठेवायची प्रकरनांचा अहवाल पाठविताना missing चौकशी अंमलदार यांनी खालील मुद्याबाबत पुर्तता करणे आवश्यक आहे.

  • हरविलेल्या व्यक्तींची खबर देणाऱ्या किंवा जवळचा नातलग याच्याकडे चालू कालावधीतील तारखेचा फेर जवाब नोंदविण्यात यावा. (त्यामध्ये मागील 7 वर्षाच्या कालावधीमध्ये हरविलेल्या व्यक्ती बाबत त्यांना काही हकीकत ज्ञात झाली अगर कसे याबाबत बयान/जबाब नोंदवावा.)
  • सदरची हरविलेली व्यक्ती सध्या कोठे आहे किंवा यापूर्वी कोणास नजरेस आली. भेटली याबाबत चौकशीमध्ये नमूद करावे.
  • ज्या गावातील व्यक्ती हरविली आहे तेथील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे चालु कालावधीतील जबाब नोंद करावेत. (त्यामध्ये मागील 7 वर्षाच्या कालावधीमध्ये हरविलेल्या व्यक्ती बाबत त्यांना काही हकीकत ज्ञात झाली अगर कसे याबाबत बयान/जबाब नोंदवावा.)
  • हरविलेल्या व्यक्तीच्या संदर्भात तिच्या नावे शेती/घर/ याप्रकारची ईतर स्थावर मालमत्ता आहे काय? या अनुषंगाने देखील संबंधित तलाठी व सरपंच यांचे पत्र घ्यावे
  • पोलीस ठाण्या कडील सी. सी. टी. एन. एस. प्रणालीत यातील हरविलेली व्यक्ती ही अकस्मात मयत प्रकरणामध्ये/अगर अटक व्यक्तीमध्ये तिचे नाव आढळते किंव्हा कसे  याबाबत तपासावे. तसे आढळून न  आल्यास संबंधित CCTNS इन्चार्ज कर्मचारी यांचा दाखला घ्यावा.

या मुद्याप्रमाणे चौकशी करुन प्रकरण डॉरमंन्ट फाईलसाठी पाठविण्यात यावे.

हरविलेल्या व्यक्ती संबंधाने महत्वाची कलमे.. (Important IPC/CrPc/IEA regarding Missing Person)

  • ज्या missing चे प्रकरणांना 7 वर्षे पुर्ण झालेली आहेत अशी प्रकरणे (Missing Dormant files under Indian Evidence Act 1872, Section 108) भारतीय पुरावा कायदा 1872 वे कलम 108 च्या तरतुदीनुसार (Missing Dormant files) डॉरमेंन्ट फाईलवर ठेवण्यात येतात.
  • Section 359 of Indian Penal Code 1860 is for Kidnapping from India and Kidnapping from lawful guardianship.
  • Section 362 of Indian Penal Code 1860 is for Abduction.
  • Punishment for Kidnapping under Section 363 of Indian Penal Code 1860.

Difference between Kidnapping and abduction.

 

Kidnapping:

Kidnapping is the unlawful act of taking a person away with the intent to hold them for ransom, some financial gain, or other malicious purposes.

It typically involves planning and often demands a specific motive, such as money or revenge.

Example: A criminal kidnaps a wealthy individual’s child and demands a substantial ransom in exchange for the child’s safe release. The motive here is financial gain.

 

Abduction:

Abduction, on the other hand, involves taking a person away without their consent but may not necessarily involve a specific motive like ransom.

It can be done for various reasons, including personal motives, human trafficking, or even child custody disputes.

Example: A non-custodial parent takes their child without the custodial parent’s permission during a visitation, with the intent to keep the child with them. While this is an abduction, it may not involve ransom or financial gain but rather personal motivations.

 

In summary, the key distinction lies in the motive and intent behind the act. Kidnapping involves specific intent, often for financial gain, while abduction refers to the act of taking someone without their consent, which can have various underlying reasons beyond financial gain.

Leave a Comment