समन्स आणि वॉरंट (Summons & Warrant)

समन्स (Summons)

 • समन्स म्हणजे बोलावणे.
 • एखादे कोर्ट, किंव्हा एखादा अधिकारी, त्याचे समक्ष आलेल्या विषया संबंधाने एखाद्याला विचारपूस करण्यासाठी बोलावणी करणे कामी लेखी पत्र देतो त्यास समन्स असे म्हणतात.
 • कायदेशीर संदर्भात “समन्स” हा शब्द न्यायालय किंवा प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिकृत नोटीसचे बाबत वापरला जातो, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर राहणे व कायदेशीर प्रकरणावर त्याचे म्हणणे ऐकण्याची संधी देण्यात येत असले संदर्भात कळविले जाते.
 • समन्स सामान्यतः दिवाणी खटले, फौजदारी खटले आणि इतर कायदेशीर कार्यवाहींमध्ये  जारी केले जातात.
 • समन्सचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, विविध कायदेशीर परिणामाला सामोरे जावे लागते, ज्यामध्ये संभाव्य दंड भरणे किंवा आपल्या अनुपस्थितीत न्यायनिर्णय दिला जाणे, या बाबींचा  समावेश आहे.

समन्स कोणी बजवावे. 

 • पोलीस अंमलदार
 • कोर्ट अंमलदाराने,
 • इतर सरकारी नोकराने,

समन्स तमील कसे करावे, या बाबत सविस्तर माहिती..

 • ज्या व्यक्ती चे नावे समन्स काढले असेल त्या व्यक्तीस त्या समन्सची एक प्रत देऊन  स्वतः बजावले पाहिजे. (सीआरपीसी ६२)
 • ज्या इसमावर समन्स वरील प्रमाणे बजविले गेले असेल त्यास ते मिळाले बद्दल समन्स तामील करणाऱ्या अंमलदाराने दुस-या प्रतीवर सही करणेस सांगितले पाहिजे.
 • तसेच ज्या इसमावर समन्स बजावले गेले त्या इसमाने त्याप्रमाणे सही केली पाहिजे.
 • समन्स मध्ये नमुद केलेल्या इसमास समक्ष समन्सची एक प्रत देऊन दुसऱ्या प्रतीवर त्या इमसाची समन्स मिळालेबद्दल सही घेऊन पोलीस अंमलदाराने बजावणी केल्याची तारीख व आपली सही करुन समन्स ज्याचेकडून मिळाले असेल त्याचेकडे दिलेल्या मुदतीत परत केले पाहिजे.
 • समन्स एखाद्या संस्थेच्या / मंडळाचे नावाचे असल्यास त्या संस्थेच्या मंडळाचे सचिवाला एक प्रत तामिल करावी अथवा रजिस्टर पोस्टाने पाठवावी.
 • समन्स मधील इसम मिळून येत नसेल तर समन्सची एक प्रत त्याचे कुटूंबिया पैकी कोणत्याही जाणत्या इसमाजवळ देवुन ते मिळाल्याबद्दल एका प्रतीवर त्याची सही घ्यावी.
 • कलम 62,63,64 अन्वये समन्स बजाविता येत नसल्यास ज्या घरात तो मनुष्य रहात असेल त्या घराच्या एखादया ठळक भागावर ते समन्स चिकटवावा.
 • समन्स सरकारी नोकराचे नावचे असल्यास ते समन्स त्या सरकारी नोकराचे विभाग प्रमुख कडे तामिल करणे करीता पाठवावे.
 • जेव्हा समन्स बजावले जाणारा मुनष्य न्यायालयाचे स्थळ सीमेबाहेर राहत असेल तेव्हा तो ज्या न्यायालयाचे स्थळ सीमेच्या हद्दीत राहत असेल त्या न्यायालयाकडे ते समन्स बजाविणेकरीता पाठविले पाहिजे.
 • कुठल्याही साक्षीदारास समन्स काढणा-या कोर्टास समन्स काढतेवळी (issue करतांना) ज्या मनुष्यावर समनस काढले असेल, तो ज्या ठिकाणी राहत असेल अशा ठिकाणच्या पोस्टाच्या पत्यावर समन्सची एक प्रत तामिल करणे करीता रजिस्टर पोस्टाने पाठविण्याचा हुकूम देता येईल.

समन्स बजावणी तमिलिकरिता उपाययोजना

 • समन्स तमिळ करणारे कर्मचा-याकडुन रोजचे रोज एकुण दाखल व बजाविले समन्सचा आकडा घ्यावा.
 • एकच दिवशी विभीन्न दिशेच्या गावचे जास्त समन्स प्राप्त झालेस समन्स डयुटी कर्मचा-याचे मदतीस इतर पोलीस कर्मचारी दयावे.
 • संबंधित बीट अंतर्गत नेमलेले पोलीस कर्मचा-यांना समन्स बजाविणेसाठी मदतीला घ्यावेत. परंतू त्याचे नियंत्रण समन्स डयुटी कर्मचा-याच्या मार्फतच करावे. म्हणजे समन्सची तारीख निघून जाण्याचा प्रसंग उद्भवुन समन्स न बजावता परत जाणार नाही.

वॉरंट (Warrant)

 • कोर्टाने ठराविक नमुन्यात कोर्टाचे सही शिक्यानिशी, कोणत्याही मनुष्यास अगर पोलीस अंमलदारास, त्यात नमुद केलेल्या मनुष्यास अटक करुन, लेखी हुकूम करणा-या न्यायायासमोर विलंब न लावता हजर करावे किंवा सीआरपीसी 79, 80, 81  अन्वये वॉरट काढणारे कोर्टाकडे हजर राहणेच्या शर्तीने अटक केलेल्या मनुष्यास जामीनावर सोडावे अशा लेखी हुकूमास अटक करण्याचे वॉरट असे म्हणतात.

अटक वॉरंटचे प्रकार

 1. नॉन बेलेबल अटक वॉरट
 2. बेलेबल अटक वॉरट

अटक वॉरटला कोणी तामील करावे ?

 • अटक वॉरट साधारणतः  पोलीस अधिकाऱ्याचे नावाचे असू शकते. तेव्हा त्यांना ते वॉरंट बजाविणेचा अधिकार आहे. (सीआरपीसी 75)
 • जेव्हा जारी केलेले वॉरंट तात्काळ बजावणे आवश्यक असेल आणि पोलीस अंमलदार लागलीच मिळण्यासारखा नसेल, तर ते दुस-या कोणत्याही मनुष्यास किंवा मनुष्यांच्या नावाने करण्याचा अधिकार कोर्टास आहे. (सीआरपीसी 72 (2)
 • अटक वॉरंट हे पोलीस शिपाई बजावु शकतो, परंतु बेलेबल वॉरट पोलीस हेड कॉस्टेबलनेच बजवावे.

अटक वॉरट कसे बजवावे?

 • अटक वॉरंट बजविताना पोलीस अंमलदार नेहमी गणवेशात असावा.
 • पोलीस अंमलदाराचे नावाने जेव्हा वॉरंट बजविणेस दिले असेल तेव्हा त्याचेवर शेरा मारुन त्या पोलीस अंमलदारास ते बजविणेकरीता दुस-या पोलीस अंमलदारास देता येईल.
 • अटक वॉरंट भारतात कोठेही बजाविता येईल.
 • ज्या मनुष्यास अटक करावयाचे आहे, तोच वॉरंटात नमुद केलेला इसम आहे याची खात्री करुन घ्यावी.
 • ज्या मनुष्यास अटक करावयाचे आहे, त्यास वॉरंटातील मजुकर समजावुन सांगावा, अणि त्याने वॉरंट पाहण्यास मागितले असता ते त्या दाखवावे.
 • अटक करावयाच्या मनुष्यास सीआरपीसी 46 मध्ये नमुद केलेल्या रितीने अटक करावे.
 • अटक करावयाच्या मनुष्यास पळुन जाता येऊ नये म्हणुन जो प्रतिबंध आवश्यक असेल त्याहुन जास्त प्रतिबंध त्यास करु नये.
 • अटक करावयाचा मनुष्य एखादया घरात असेल तर त्यास अटक करण्याकरीता घरात प्रवेश मिळवता येतो.
 • वॉरंट जर बेलेबल असेल तर त्या अटक केलेल्या मनुष्यास उशीर न लावता कोर्टापुढे हजर करावे.
 • वॉरंट जर नॉन-बेलेबल असेल तर त्या अटक केलेल्या मनुष्याने जामीनदार हजर केल्यास त्यास जामीनावर मुक्त करावे.
 • पकड वॉरट त्या जिल्हयात काढले आहे त्या जिल्हयाबाहेर जेव्हा ते बजावले असेल तेव्हा पकडलेल्या मनुष्यास,ज्या कोर्टाने ते वॉरंट काढले ते कोर्ट पकडणेचे जागेपासुन 20 मैलाचे आत नसल्यास किंवा ज्या कोर्टाच्या किंवा पोलीस अधीक्षक यांच्या किंवा पोलीस कमिशनर यांच्या पेक्षा जवळ नसल्यास 71 व्या कलमान्वये तारण घेतलेले नसल्यास सदरहु कोर्टापुढे किंवा पोलीस अधीक्षक यांचे पुढे किंवा पोलीस कमिशनर यांचेपुढे नेले पाहिजे.

वॉरंट मोठ्या संखेने तामील केले जावे या करीता उपाययोजना

 • वॉरट डयुटी कर्मचा-याकडुन रोजचे रोज एकुण दाखल वॉरंट व तामील वॉरट बाबत आढावा घ्यावा.
 • वॉरंट डयुटी ASI/पोहवा यांना मदतीला पोलीस कर्मचारी दयावे, शक्य असल्यास टिम बनवावी.
 • वॉरंंट डयुटी कर्मचा-यास बाहेरचे बंदोबस्त डयुटी शक्यतो देवु नये.
 • त्यांच्या सुट्टीचा वार रविवार ठेवावा.
 • वॉरंट डयुटी कर्मचा-याने रजेवर जाताना नजीकच्या तारखेची वॉरंट बजावणीसाठी दुस-या पोलीस कर्मचा-यास दयावीत.
 • प्रलबिंत वॉरंटची यादी नेहमी प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकरी यांचेकडे ठेवावी.
 • प्रत्येक वॉरंट एकालाच बजावणीसाठी न देता ईतर दुय्यम पोलीस अधिकारी व दुसरा पोलीस कर्मचा-याकडे बजावणीसाठी दयावा.

Leave a Comment