अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थच्या गुन्ह्याची रेड व तपास. (Raid and investigation of narcotics and psychotropic substance, NDPS ACT offences.)
NDPS ACT चे गुन्ह्याची रेड व तपास कसा करावा? (How to raid and investigate crime under NDPS ACT?)
Guidelines for the investigation of the N.D.P.S. Act crime of…
N.D.P.S. Act चे गुन्हयाचे तपासा संदर्भात मार्गदर्शक सुचना…
NDPS चे गुन्ह्या बाबत मिळालेल्या माहितीची नोंद स्टेशन डायरी अंमलदार कडील स्टेशन डायरीमध्ये मध्ये घ्यावी.
- N.D.P.S. चे ‘गुन्हया बाबत माहिती प्राप्त होताच त्या माहीतीची खात्री करावी.
- सदर बातमीव्दारे (माझे समाधान झाले व माझी खात्री झाली असुन सदर ठिकाणी सत्यता पडताळुन पाहणे आवश्यक असल्याने तेथे छापा घालण्याचे मी ठरविले आहे या आशयाची नोंद स्टेशन डायरीत घ्यावी.
- ज्या व्यक्तीने बातमी दिली त्याचे नांव गोपनीय ठेवावे तसेच त्यास धाड टाकतांना बोलावू नये…
- प्राप्त खबरीची नोंद योग्यप्रकारे ठाणे दैनंदिनीत घ्यावी. ख़बरीचे नोंदी मध्ये संशयीत इसमाचे नाव, उपनाव, वय, वर्ण, शरीरयष्टी अंगात घातलेल्या पेहरावाचे वर्णन करावे. संशयित इसम ज्या घटनास्थळी येणार त्या स्थळाचे वर्णन, लॅण्डमार्क, दिनांक व वेळ इ. माहीती प्राप्त खबरीचे नोंदी मध्ये लिहावी. संशयित इसमास अंमलीपदार्थ कोणी दिला व तो पुढे कोणास माल विकणार आहे, त्याची माहीती प्रथम खबरीचे नोंदीत लिहावी.
- स्टेशन डायरीला नोंद घेवुन ती माहिती त्वरित नजीकचे वरिष्ठ अधिकारी यांना लेखी पत्राव्दारे कळवावी. (दिलेले पत्रकाचे स्थळप्रतीवर (O/C प्रत वर) त्यांचे कार्यालयाची दिनांकीत स्वाक्षरी घेण्यात यावी. (कलम 42 ( 2 ) N.D.P.S.Act) व तशी स्टेशन डायरीत नोंद घेण्यात यावी.
- आरोपी वापरत असलेली वाहने, आरोपीचे नेहमीचे मार्ग, विक्रची अथवा वितरणाची पध्दत, साठयाचे स्वरुप इत्यादी माहितीची जास्तीत जास्त तपशील स्टेशन डायरीमध्ये नोंदविणे हे अत्यंत महत्वाचे आहे व त्यामुळे सदरचा गुन्हा हा पूर्ण माहिती घेऊन काळजीपूर्वक व खर्या व्यक्तीवर दाखल झाल्याची न्यायालयाची खात्री पटेल.
- बातमी बाबत घेण्यात आलेले स्टेशन डायरी च्या नोंदीचे उतारे व वरिष्ठांना माहिती दिलेल्या पत्रांची स्थळप्रत मा. न्यायालयात दोषारोप सादर करताना जोडावी.
Preparation of NDPS Act Raid
NDPS Act रेड ची पूर्वतयारी.
- मिळालेल्या माहितीचे आधारे छापा घालावयाचे ठरविल्यावर दोन पंचाना, तराजु वजन मापवाला, फोटोग्रापर तसेच राजपत्रीत अधिकारी यांना बोलाविण्यासाठी पाठवावे.
- सदर केससाठी पंच बोलवितांना काळजी घेणे जरुरीचे आहे. पंच मादक द्रव्य विरोधी आहे व समाज जीवनावर मादक द्रव्याचा विपरित परिणामांची जाणीव आहे असे सभ्य सुशिक्षित निर्भय असे पंच घ्यावे. पंचांचे ज्ञान व खरेपण हे केसचे दोषसिद्धीत महत्वाची भूमिका पार पाडते, याची जाणीव ठेवावी.
- पंचांना सुद्धा एकमेकांची पूर्ण नावे व माहिती द्यावी. म्हणजे कोणतीही विसंगती रहात नाही.
- राजपत्रीत अधिकारी यांना बोलाविण्यासाठी कलम 50 (3) N.D.P.S. Act चा वापर करावा.
- दोन पंच, तराजु वजन मापवाला, फोटोग्रापर तसेच राजपत्रीत अधिकारी हे पो.स्टे.ला हजर आल्यावर त्यांना ज्या इसमाने बोलावून आणले व आलेल्या सबंधित व्यक्तीचे नांवासह स्टेशन डायरीत नोंद (रवाना झाल्याची व परत आल्याची) घेण्यात यावी.
- पंटर पंच: विक्रीचे केससाठी जर पंटर पंच पाठविला असेल तर त्याचे जवळ दिलेल्या खुणेची नोटेचा चलनी नंबर व खुण याचा उल्लेख स्टेशन डायरीत व नंतर पंचनाम्यामध्ये करावा. सदरची प्रकारात एक नोट देण्यापेक्षा दोन किंवा तीन नोटा देणे जास्त उपयुक्त ठरते, कारण एक नोट असली की आरोपी चावुन अथवा गिळून खराब/नष्ट करतो. सदरची नोट आरोपी जवळ कोठे सापडली याचा उल्लेख तसेच त्याच्याजवळचे इतर (विक्रीचे पैस) याचाही जप्त केलेल्या मालामध्येही उल्लेख असावा.
- पोलीस ठाण्याची पितळी मोहर (ब्रास सिल) अंमली पदार्थ तपासणी संच (केमिकल किट असते), वजन काटा (वजन यंत्राचे मानकीकरण झाले असावे), व सिलींग व लेबलींगचे साहीत्य ताब्यात मिळण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्र द्यावे. (जप्ती अधिकार्याचे सिलिंग व लेबलिंगचे साहित्य असेल तर त्या प्रमाणे नोंद घ्यावी.)
NDPS Act raid warrant.
Raid कामी झडती वॉरंट घेणे अन्यथा स्टेशन डायरी नोंद घ्यावी…
- Raid कामी झडती वॉरंट घ्यावे. (कलम 41 वॉरन्टावरुन झडती.)
- झडती वॉरंट घेणे शक्य नसल्यास त्या अनुषंगाने झडती वॉरंट घेणे शक्य नसले बाबतची नोंद स्टेशन डायरी ला करावी. (कलम 42 (1) (D))
- वॉरन्टाशिवाय झडती वॉरन्ट का घेता आले नाही त्याबाबत ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद घेणे आवश्यक आहे. (रेड घालण्यासाठी जाताना मिळालेल्या माहिती प्रमाणे लवकर पोहचणे आवश्यक आहे अन्यथा गुन्हयातील आरोपी हे गुन्ह्यातील मुद्देमाल गांजा हा नष्ट करण्याची/होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे झडती वॉरंट घेण्यास वेळ मिळणार नाही अशा आशयाची नोंद स्टेशन डायरीत नोंद करावी. कलम 42 (1) (D) (N.D.P.S.Act))
एनडीपीएस चे गुन्ह्यातील रेड कामी स्टेशन डायरीला रवानगी टाकावी…
- स्टेशन डायरी मध्ये नोंद करतांना रेग्युलर, जी आहे ती वेळ टाकावी. वेळ टाकतांना ती खोटी राहील अशी वेळ टाकू नये.
- एखाद्या कामात उशीर लागल्यास त्याबाबत स्टेशन डायरीत कारणासह नोंद करावी.
- पोलीस व पंचाना छापा टाकण्यासाठी नेण्यात येणाऱ्या पोलीस वहानांची तपासणी (झडती पंचांनी घ्यावी.) करुन स्टेशन डायरी नोंद टाकावी. तसा उल्लेख पंचनाम्यात करावा.
- छापा घालण्यास निघताना स्टेशन डायरीमध्ये सोबतचे दोन्ही पंच, वजनमापवाला, फोटोग्रापर व सोबतचे पोलीस कर्मचारी/राजपत्रित अधिकारी यांचे नांव व क्रमांक तसेच वापरण्यात येणारे वाहनाचा क्रमांक, ड्रायव्हर (शक्य झाल्यास मीटर रिडींग घेणे) या बाबत स्टेशन डायरीत सविस्तर नोंद करण्यात यावी.
Pre-Raid Panchnama in NDPS Case.
एनडीपीएस चे गुन्ह्यात बरेचदा पोलिस रेड कमी जाताना कश्याप्रकर काय-काय साहित्य घेवून चालले, तसेच रेड कमी जाणारे अधिकारी/कर्मचारी कोण? याचा सापळापूर्व पंचनामा / (प्रिरेड) पंचनामा केला जातो. याला Pri-Raid पंचनामा म्हणतात.
(प्रिरेड पंचनामा हा काही रेड अधिकारी करतात तर काही स्टेशन डायरी चे नोंदी घेवून मोकळे होतात. आपल्याला कुठल्या प्रकारे सत्य समोर ठेवायचे आहे ते रेड अधिकारी यांनी आपण स्वतः वेळ, काळ, परिस्थिती पाहून ठरवावे.)
- सापळापुर्व पंचनाम्यात पंचांनी यापुर्वी पंच म्हणुन काम केले आहे किंवा कसे या बाबत नोंद घ्यावी.
- पंचाचे शिक्षण, धंदा इ. माहीती पूर्ण माहिती पंचनाम्यात नोंदवावी.
- सापळयापुर्वी पंचाने पोलीस पथकाची व पोलीसांनी पंचाची झडती घ्यावी, तसेच ती झडती घेतल्याचे पंचनाम्यामध्ये नमुद करावे.
- सापळयापुर्वी चा पंचनामा कोणी सांगितला व कोणी लिहिला हे स्पष्ट नमुद करावे. (कारण सांगणाऱ्याचे व लिहिण्याचे हस्ताक्षरात फरक असतो)
- ज्या वेळेस व ठिकाणी सापळापूर्व पंचनामा संपतो, पंचनामा संपल्याची वेळ नमुद करावी. पंचास पंचनामा वाचुन दाखवुन समजल्याची सही घ्यावी व पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वत:ची सही करावी.
- या पंचनाम्यात पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
- पंचाना “प्राप्त खबरीची” माहीती दिल्याची नोंद अनिवार्य आहे.
NDPS Act Fir – First Information Report.
- वरील प्रमाणे पंचनामा पुर्ण करुन आरोपीस ताब्यात घेवून अधिकारी व पथक पोलीस ठाण्यास परत येतील.
- पोलीस ठाण्यात परत आल्यानंतर सापळा पथकातील अधिकारी किंवा अनुभवी कर्मचारी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करावा.
- फिर्याद पूर्णपणे लिहावी, पंचनाम्यात वर्णन असल्यासारखीच फिर्याद असावी.
- फिर्यादीत मुद्देमालाचे वर्णन लिहिताना पंचनाम्याप्रमानेच असे लिहून काम चालवू फिर्याद लिहू नये. सविस्तर घ्यावी.
- एफ.आय.आर.ची कॉपीची प्रत सत्र न्यायालयात 24 तासात पाठवून व जमा करून तशी पोच पावती घेतली जावी.
Who should investigate the offense of NDPS Act…
NDPS Act चे गुन्हयाचा तपास कोणी करावा…
- NDPS चे गुन्ह्यात छापा मारणारे अधिकारी यांनी पो.स्टे.ला परत आल्यावर योग्य कलमान्वये गुन्हा नोंदवावा.
- NDPS चे गुन्हयाचा पुढील तपास छापा मारणारे अधिकारी यांनी स्वतः न करता दुसऱ्या अधिकारीकडे तपसास द्यावा. (फिर्याद दिली तो तपासी अंमलदार होऊ शकत नाही. (judgement पहा.) प्रभारी अधिकारी यांनी या प्रमाणे आदेश द्यावे.)
- NDPS चे गुन्ह्यातील छाप्याचा सविस्तर अहवाल कलम 57 (N.D.P.S.Act) प्रमाणे वरिष्ठ अधिकारी यांना पाठवुन वरिष्ठ कार्यालयाचे दिनांकीत स्वाक्षरीची स्थळप्रत संचिकेत सामील करावी व दोषारोप पत्र पाठविताना मा. कोर्टाचे संचिकेस जोडावी.
NDPS गुन्ह्यातील आरोपीस अटक…
- आरोपीस रीतसर अटक करावे.
- ठाणे दैनंदिनीत वरील गुन्हा नोंद केल्याची तसेच आरोपीस अटक केल्याची माहीतीची नोंद करावी.
- आरोपीस अटके नंतरचे त्याचे अधिकार त्यास सांगितले जावेत.
- सदर इसमास अटक करावयाचे असल्यास वेगळा अटक पंचनामा तयार करावा.
- अटक पंचांनाम्यात अटकेची कारणे, ठिकाण, वेळ या सर्व बाबीच्या नोंदी घेव्यात.
- आरोपीस अटक करताना साक्षीदार चे कॉलम जरूर भरावे.
- आरोपीस अटक केल्याची माहिती त्याचे नातेवाईकांस लेखी सूचनापत्राने देण्यात यावी.
- आरोपीचा अटक पंचनामा तयार केल्यावर, त्यात आरोपीस पंचनाम्याची प्रत मिळाल्याचा उल्लेख जरुर करावा.
- गुन्हयातील आरोपीस अटक केले बाबत ची माहिती त्वरित मा. न्यायदंडाधिकारी यांना लेखी कळवावे. कलम 52 (1) (N.D.P.S.Act)
- अटक आरोपीच्या स्थावर, जंगम मालमत्तेची माहिती गोळा केली जावी.
- कमर्शियल कॉन्टीटीच्या गुन्हयात अटक आरोपीच्या मालमत्तेबाबत 68(1) अन्वये कारवाईस पात्र असतो. त्याप्रमाणे कार्यवाही केली जावी.
- आरोपीच्या पुर्व दोषसिध्दीबाबत माहिती गोळा करावी. (त्या करिता CCTNS, अंमली पदार्थांशी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.) दोषसिध्दी असल्यास दोषारोप पत्रात, कलम 31(अ) लावले जावे.
- तपासात इतर पाहीजे आरोपी अटक झाल्यास अटकेचे कलम 56 अन्वये खास अहवाल वरिष्ठांना पाठवावा.
Post-seizure proceedings and inventory in NDPS Cases.
NDPS Act मधील रेड व जप्ती नंतरची कार्यवाही व ईन्व्हेन्टरी…
A) ईन्व्हेन्टरी कोर्ट मध्ये पाठविणे.
- रेड करून पो.स्टे. ला परत येताच जप्त मुद्देमाल व सॅम्पल हे पो.स्टे.तील लेखणिक हवालदार (मोहरर) यांचे कडे गैरवाजवी विलंब न लावता जमा करून मुद्देमाल पावती फाडुन मुद्देमाल क्रमांक (एम. आर. क्रमांक) प्राप्त करावा.
- “ईन्व्हेन्टरी” कामी मा. कोर्टात माल घेवुन जाणे असताना लेखणिक हवालदार यांना लेखी कळवुन मुद्देमाल ताब्यात घ्यावा. त्याच प्रमाणे ” इन्व्हेन्टरी” करून परत येताच लेखी रिपोर्ट देवुन मुद्देमाल पुन्हा लेखणिक हवालदार यांचे कडे गैरवाजवी विलंब न लावता जमा करावा. कलम. 52 (2) (N.D.P.S.Act)
B) अपरिहार्य कारणास्तव लेखणिक हवालदार कडे जप्त माल जमा करणे शक्य नसल्यास काय करावे?
- अपरिहार्य कारणास्तव लेखणिक हवालदार कडे जप्त माल जमा करणे शक्य नसल्यास त्या बाबत स्टेशन डायरीस नोंद घ्यावी.
- पर्यायी व्यवस्था म्हणुन लेखणिक हवालदार हजर येई पर्यंत गुन्हयातील मुद्येमाल व सॅम्पल हे तात्पुरते पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांचे ताब्यात ठेवावेत कोणत्याही परिस्थीतीत तपासीक अंमलदार यांनी गुन्हयाचा मुद्देमाल स्वतःचे कब्जात ठेवु नये.
C) दंडाधिकारी यांचे वॉरंटचे आधारे झडती…
- दंडाधिकारी यांचे वॉरंटचे आधारे झडती घेण्यात आलेली असल्यास अटक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती व जप्त करण्यात आलेली प्रत्येक वस्तु ज्या दंडाधिकारी यांनी वॉरंट काढलेले असेल त्यांचे समोर गैरवाजवी विलंब न लावता सादर करावी. कलम 52(2) (N.D.P.S.Act)
D) कलम 52(3)(अ) व (ब) (N.D.P.S.Act) नुसार अटक…
- कलम 52(3)(अ) व (ब) (N.D.P.S.Act) नुसार अटक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती व जप्त करण्यात आलेली प्रत्येक वस्तु पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांचे समोर किंवा अधिकार दिलेले अधिकाऱ्यासमोर गैरवाजवी विलंब न लावता सादर करावी.
E) फोटो/व्हिडिओ जप्ती पंचनामा/Hash Value.
- पंचनामा कार्यवाही दरम्यान घेण्यात आलेले फोटो व केलेली व्हिडीओ रेकॉर्डींग त्याची जप्ती पंचनामा Hash Value करून त्वरित सीसीटीएनएस मध्ये अपलोड करावी.
- तश्या स्टे.डा.नोंदी कराव्यात.
सर्वोच्य न्यायालयाचे तरतूद प्रमाणे NDPS Act मधील मुद्देमालाचे फोटो कोर्ट मध्ये काढून घेणे अनिवार्य आहे.
According to the provisions of the Supreme Court, it is mandatory to take photos of the Narcotics material in the court under the NDPS Act.
- अंमली मुद्देमालाचा J.M.F.C. समोर फोटो 24 तासांच्या आत काढावे.
- कोर्ट त्याबद्दल नोंद करते.
- मुद्देमाल रजिस्टरला कोर्टात मुद्देमाल पाठविले बद्दल स्टेशन डायरीला नोंद करावी.
- फोटोग्राफरला कोर्टात सोबत नेऊ नये.
- कोर्टाने आदेश दिल्यावर फोटोग्राफरला बोलावावे. (त्या बद्दल कोर्टने आदेश दिल्यावर फोटोग्राफर ला बोलविल्याची नोंद करावी.)
- फोटोग्राफरने मुद्देमालाचे फोटो काढलेबाबत, त्याने त्याचे फोटो देण्याबद्यलची पावती घेणे, (त्याची नोंद स्टेशन डायरीला करावी.)
NDPS च्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचे सॅम्पल त्वरित सी.ए. अभिप्राय प्राप्त करणे कामी सी.ए. कार्यालयाकडे पाठविणे.
- जप्त मुद्देमाल भांडारगृहात (स्टोअर रूम) जमा करण्यासाठी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमोर मुद्देमाल हजर (NDPS Act कलम 52(3)(क)) करून त्यांच्या लेखी आदेशाने सर्व मुद्देमाल भांडारगृहात जमा केला जावा.
- NDPS Act कलम 55, नुसार, पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी, दंडाधिकाऱ्याचे आदेश होईपर्यंत, त्या पोलीस ठाण्याच्या स्थानिक क्षेत्रांतर्गत या अधिनियमान्वये ताब्यात घेण्यात आलेल्या आणि त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील अशा सर्व वस्तूंचा प्रभार घेईल आणि त्या सुरक्षित ताब्यात ठेवील व अशा वस्तू पोलीस ठाण्यावर घेऊन येणाऱ्या किंवा त्या प्रयोजनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला, अशा वस्तूंवर त्याचा शिक्का मारण्यास किंवा त्यांचे वा त्यांच्यामधून नमुने घेण्यास परवानगी देईल आणि अशा तऱ्हेने घेण्यात आलेल्या सर्व नमुन्यांवर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचाही शिक्का मारण्यात येईल. (विसंगती टाळण्यासाठी, NDPS साहितेतील शब्द जसे आहेत तसे लिहिलेले आहेत.)
- जप्त मुद्देमालातील सिल नमुना पाकिटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून ते ताब्यात घेवून दुस-या दिवशी रासायनिक विश्लेषक कार्यालयात पाठविले पाहिजे.
- पंचनामा दरम्यान जप्त करण्यात आलेले मुद्देमालाचे सॅम्पल त्वरीत सी. ए. तपासणीस पाठवावे.
- रासायनिक विश्लेषक कार्यालय येथे नमुना पाकीटे सादर करण्यास घेवून गेलेल्या पोलीस अंमलदाराने जातांना तशी ठाणे दैनंदिनी मध्ये नोंद करावी व पाकीटे सादर करुन परत पोलीस ठाणेस आल्याची ठाणे दैनंदिनीत नोंद करावी.
- सी. ए. सॅम्पल माल जमा करून परत आल्यावर सी. ए. कॅरीअर कर्मचारी यांचे तपास टिपण (बयाण) नोंदवावे.
- सी. ए. कार्यालयात पाठपुरावा करून सी. ए. अभिप्राय प्राप्त करून दोषोराप पत्रासोबत पाठवावा.
इतर महत्वाच्या बाबी…
NDPS Act (अंमली पदार्थ) संबंधित कायध्याविषयी…
- चरस, गांजा अफु, मार्फीन, कोकेन भांग, हिरॉईन व ब्राऊन शुगर या आठ आम्ली पदार्थाचा समावेश होतो.
- कायद्यान्वये दाखल होणारे गुन्हे दखलपात्र असून नॉन बेलेबल आहेत.
- या कायद्यात सन 1988 साली सुधारणा करण्यास आली असून 10 वर्षे ते 20 वर्षांपर्यंत या तसेच मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
- आरोपी अटक केल्यानंतरची कार्यवाही विशेष न्यालयासमोर चालते.
- या कायद्यान्वये छापा घालण्याचे अधिकार एक्साईज, कस्टम, रेव्हेन्यु, सीमा सुरक्षा बल तसेच पोलीस ठाणे स्वाधीन असणारे अधिकारी व त्यांचे वरील दर्जाचे अधिका-यांना दिलेले आहेत.
- सदर अधिकारी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी कर्मचा-यांना आदेश देऊ शकतात परंतु असा आदेश देतेवेळी अधिकारी हे पोलीस कॉन्स्टेबल दर्जाचे वरील असावे. NDPS Act कलम 41, 42 मधील तरतुदी अभ्यासाव्यात.
- रेडच्या केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना 48 तासाचे आत नारकोटीक्स कमिशन किंवा अधिकार दिलेल्या अधिका-याला कळवावा.
- 90 दिवसाचे आत दोषारोप पत्र पाठवावे.
काही महत्वाचे कलमाविषयी माहिती…
- कलम 22- गुन्हा दाखल करता येतो.
- कलम 3 तडीपार प्रोसिडींग पाठवता येते.
- कलम 41 वॉरन्टावरुन झडती.
- कलम 42 (1) (2) वॉरन्टाशिवाय झडती वॉरन्ट का घेता आले नाही त्याबाबत ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद घेणे आवश्यक आहे.
- कलम 43 – सार्वजनिक जागी छापा माल जप्त करणे, आरोपी अटक करण्याचा अधिकार.
- कलम 50 राजपत्रित अधिका-यांसमक्ष झडती घेता येते. पंचनाम्याची प्रत आरोपीला द्यावी.
- कलम 52 आरोपी व जप्त मुद्देमालाचे निर्गतीबाबत.
- कलम 55 – पोलीस अधिका-याने माल ताब्यात घेतल्या नंतरची कार्यवाही.
- सदर कायद्यातील कलम 15 ते 25 व 27-अ मध्ये नमूद केलेले अपराधाबद्यल शिक्षा झाली असेल आणि पुन्हा तोच अपराध करण्यास सहाय्य करणे. कष्ट करण्यात सदर कायद्याचे कलम 41 मध्ये दिलेल्या तक्त्यातील प्रमाणात किंवा त्याहून अधिक प्रमाणात मादक द्रव्य निर्माण करणे, मिसळणे, ताब्यात ठेवणे, निर्यात करणे इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहाय्य केल्यास सदर गुन्हयात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतुद केली आहे.
- कलम 57 – 48 तासाचे आत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल…
संशयित मुद्देमाल अंमली पदार्थच आहे किव्हा कसे?
- आपण जप्त करीत असलेला मुद्देमाल हा अंमली पदार्थच आहे किव्हा इतर काही यात संभ्रम असल्यास आपल्या कार्यालयातील NDPS गुन्ह्याची किट चा वापर करून संशयित मुद्देमाल अंमली पदार्थच आहे किव्हा कसे? या बाबत पडताळणी करून संभ्रम दूर करावा.
दुभाषीचा उपयोग:-
- गुन्हयाचे तपासांत भाषेचे अडचणी मुळे दुभाषी वापरण्यात आलेला असल्यास त्या बाबत पंचनाम्यात नोंद करून भाषांतर केलेले कागदावर दुभाषी यांचे नांवाची नोंद करून स्वाक्षरी घ्यावी.
फोटो /व्हिडिओ :-
- गुन्हयाचे तपासांत घेण्यात आलेले फोटो/व्हिडिओ दोषारोप पत्रा सोबत जोडण्यात यावेत.
आरोपीचे पूर्वीचे गुन्हे व पूर्व शिक्षा बाबत.
- आरोपी विरूध्द पुर्वीचे गुन्हे दाखल असल्यास किंवा पुर्वी शिक्षा झालेली असल्यास त्याचा उल्लेख दोषारोप पत्रात करण्यात यावा.
साक्षीदारांना विचारपुस करावी.
- रेड करण्यासाठी सोबत असलेले सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, वाहन चालक यांचे बयाण (तपास टिपण) नोंदवावेत.
- गुन्हयातील पंच, साक्षीदार, पोलीस निरीक्षक राजपत्रित अधिकारी यांचे जबाब नोंदविले जावे.
- सार्वजनीक ठिकाणी घटनास्थळावर उपस्थित असलेले साक्षीदारांचे बयाण नोंदवावेत.
वापरलेल्या सरकारी वाहनांचा लॉगबुकाचा उतारा घ्यावा.
- रेडसाठी वापरलेले वाहनाचे लॉगबुकाचा उतारा (संपुर्ण कॉलम प्रमाणे माहिती भरलेला) तपासात सामील करावा.
आरोपी परदेशी नागरीक असल्यास आरोपी परदेशी नागरीक असल्यास…
- त्याचे अटकेची माहिती संबंधीत देशाचे दुतावासास दिली जावी.
- परदेशी आरोपीचे 24 तासात नागरीकत्वासंदर्भात दस्तऐवज पुरावा गोळा करावे.
- अश्या आरोपीच्या प्रत्यार्पणाची पुर्वतयारी करून ठेवावी.
इतर आरोपी…
- आरोपी मालविक्री करीत असतांना तेथे हजर असलेले गि-हाईकांकडेही झडतीमध्ये काही मुद्देमाल सापडू शकते, तेव्हा आरोपी प्रमाणे त्याचे वर्णन सविस्तर घ्यावे.
- सदर कायद्यातील कलम 27 (क) मध्ये (स्मॉल क्वांटीटी) अल्पप्रमाणात मादक पदार्थ जवळ बाळगणा-यांसाठी शिक्षा नमुद करण्यात आली आहे.
- वेगवेगळया मादक पदार्थाबाबत अल्पप्रमाणे (स्मॉल क्वांटीटी) म्हणजे किती हे खाली नमुद केल्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी असे मानावे. (हे प्रमाण नवीन/सुधारीत तरतुदी/नियमा प्रमाणे तापासूनच निर्णय घ्यावे.)
1) हेरॉईन, ब्राऊन शुगर, स्मॅक किंवा गर्द :- 250 मी.ग्रॅम
2) हशीश किंवा चरस :- 5 ग्रॅम
3) अफु :- 5 ग्रॅम
4) कोकेन :- 125 मी.ग्रॅम
5) गांजा :- 500 ग्रॅम
प्रसंगानुसार इतर पुरावे घ्यावे…
अचानक एखादा अमली पदार्थ मिळून आल्यावर काय कार्यवाही करावी? या प्रकारच्या NDPS गुन्ह्याचा तपास कसा करावा?
When a narcotic substance is found suddenly, the procedure followed by the police…
- अचानक पेट्रोलींग करीत असताना किंवा दुसरे ईतर कोणतेही काम करीत असताना जर या NDPS कायद्याप्रमाणे नमुद काही वस्तु किंवा माल मिळुन आल्यास त्या बाबत संबंधित पो.स्टे. चे स्टेशन डायरीस व पोलीस नियंत्रण कक्षाचे स्टेशन डायरीस नोंद करणे बाबत फोन व्दारे कळविण्यात यावे.
- घटनास्थळी मिळुन आलेला ईसम व NDPS चा मुद्देमाल हा सुरक्षीत स्थळी ठेवुन त्या प्रमाणे पोलिस स्टेशान प्रभारी अधिकारी यांना फोनवरुन कळवावे.
- पो.स्टे. प्रभारी यांनी NDPS चे गुन्ह्यात अनुसरावयाचे कार्य पध्दतीचा अवलंब पो.स्टे. मार्फतीने करवुन घेवुन, वर चर्चा केल्या प्रमाणे, पंच, फॉटोग्राफर, वजनमाप तराजूवाला, राजपत्रित अधिकारी यांना रीतसर लेखी पद्धतीने बोलावून झडती पंचनामा/जप्ती पंचनामाची पुढील कार्यवाही करावी.
- वर चर्चा केल्याप्रमाणे पध्दत का पाळण्यात आली नाही या बाबतचा पंचनाम्यात स्पष्ट उल्लेख करावा. कलम 50(5) (N.D.P.S.Act)
- NDPS Act चे regular गुन्ह्यात वापरायची रेड ची पद्धत या ठिकाणी वापरावी.
- अचानक एखाद्या बसस्थानकावर किंवा ईतर ठिकाणी सुटकेस मध्ये, कपाटामध्ये,
- कारचे मोटार सायकलचे डिक्की मध्ये अमली पदार्थ मिळुन आल्यास ते उघडण्यापुर्वी आरोपीने चावी हजर केली व नंतर ते उघडण्यात आले ईत्यादी बाबीचा पंचनाम्यात उल्लेख करावा.
- सदर चावी व कुलूप सुध्दा जप्त करावे.
- जेथे माल मिळुन आला असेल त्या ठिकाणाचा व परिसराची ओळख पटविण्याइतपतचे वर्णन पंचनाम्यात घेण्यात यावे.
- सार्वजनीक ठिकाणी घटनास्थळावर उपस्थित असलेले पुरेशा साक्षीदारांचे सकारात्मक जबाब नोंदवावेत. कलम 50 (5) (N.D.P.S.Act)
शेतात गांजाचे उभे पीक किंवा शेतात लागवड केलेले अमली पदार्थ मिळून आल्यावर काय कार्यवाही करावी?
Actions to be taken when a standing crop of cannabis or cultivated narcotic material is found in the field…
- शेतात गांजाचे उभे पीक किंवा शेतात लागवड केलेले अमली पदार्थ मिळून आल्यावर शेतातील उभे पीक मुळासकट उपटून जप्तीची कार्यवाही करण्यात यावी. पिकाचे दिसते वर्णन बरोबर व आहे तसे लिहिणे गरजेचे आहे.
- CA करिता सॅम्पल काढतांना एक पूर्ण झाड मुळासकट घेऊन नेहमीच्या पद्धतीने सील करून पंचांचे लेबल लावावेत. त्वरित CA कार्यालयास पाठवावे. (नाशवंत मुद्देमाल असतो.)
- कोर्ट मध्ये ईन्व्हेन्टरी करावी.
- कोर्ट चे परवानगी घेवून जप्त ओला मुद्देमाल (नाशवंत मुद्देमाल असतो.) संबंधित अंमली पदार्थ कार्यालयामार्फत नस्ट करावा. (कोर्ट चे आदेश प्रमाणे मुद्देमाल नस्ट करण्याचे नियमाचे पालन करावे)
- त्या शेताचे व पिकाचे मालकी हक्क सिध्द करण्यासाठी संबंधित तलाठी यांचे तपास टिपण नोंदवावे शेताचा 7/12 चा उतारा घ्यावा.
- शेताच्या आजुबाजुच्या सर्व शेतकऱ्याचे जबाब नोंदवावेत त्यात आरोपीने झाडे लावली, पाणी दिले, मशागत करून जोपासना केली ईत्यादीचा उल्लेख करावा.
- इतर बाबतीत कोरड्या अंमली पदार्था चे बाबतीत (Regular NDPS) करायची पद्धतच या ठिकाणी अनुसारावी.
किरायाचे जागेत NDPS कायध्यांतर्गत अमली पदार्थ मिळुन आल्यावर काय कार्यवाही करावी?
Action to be taken in case of discovery of narcotics under NDPS Act in rented/rented premises…
- एखादे घर खोली किंवा टपरी भाडयाने दिली असेल व त्या ठिकाणी या NDPS चे कायद्याप्रमाणे अमली पदार्थ मिळुन आल्यास त्या जागेचा मालकी हक्क सिध्द करण्याकरीता घर नंबर, भाडे पावती, भाडयाने दिले बाबतचे करारपत्र, शेजाऱ्याचे जबाब घेण्यात यावेत.
- मालकी हक्का बाबत संदिग्धता वाटल्यास मुळ मालकास NDPS ACT कलम 25 प्रमाणे आरोपी करावे.
- तपासांत पुढे संदिग्धता नष्ट झाल्यास मुळ मालकास दंड प्रक्रिया संहिता कलम 306 प्रमाणे माफीचा साक्षीदार करणे किव्हा इतर संणयुक्तिक कार्यवाही करावी.
- रेग्युलर NDPS Act चे गुन्ह्यात वापरायची रेड ची पद्धत या ठिकाणी वापरावी.
वाहतूक करीत असताना NDPS चा अमली पदार्थ मिळून आल्यावर काय कार्यवाही करावी ?
What action should be taken when the accused is caught transporting Narcotics (NDPS) material?
- वाहतूक करीत असताना आरोपी मिळुन आल्यास त्या बाबत संबंधित पो.स्टे. चे स्टेशन डायरीस व पोलीस नियंत्रण कक्षाचे स्टेशन डायरीस नोंद करणे बाबत फोन व्दारे कळविण्यात यावे.
- घटनास्थळी मिळुन आलेला ईसम व NDPS चा मुद्देमाल हा सुरक्षीत स्थळी ठेवुन त्या प्रमाणे पोलिस स्टेशान प्रभारी अधिकारी यांना फोनवरुन कळवावे.
- पो.स्टे. प्रभारी यांनी NDPS चे गुन्ह्यात अनुसरावयाचे कार्य पध्दतीचा अवलंब पो.स्टे. मार्फतीने करवुन घेवुन, वर चर्चा केल्या प्रमाणे, पंच, फॉटोग्राफर, वजनमाप तराजूवाला, राजपत्रित अधिकारी यांना रीतसर लेखी पद्धतीने बोलावून झडती पंचनामा/जप्ती पंचनामाची पुढील कार्यवाही करावी.
- वर चर्चा केल्याप्रमाणे पध्दत का पाळण्यात आली नाही या बाबतचा पंचनाम्यात स्पष्ट उल्लेख करावा. कलम 50(5) (N.D.P.S.Act)
- पकडलेल्या इसमाने तो अमली पदार्थ कोठुन आणला त्या मुळ मालकांचा व व्यवसाय करणार्याचा शोध घेवून त्यांना पण आरोपी करावे.
- अशा NDPS चे मालाचे वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन मालकांचे बाबत सुध्दा सखोल तपास करून त्याची पूर्व संमती आढळुन आल्यास त्यास पण आरोपी करावे. कलम 49 (N.D.P.S.Act)
- रेग्युलर NDPS Act चे गुन्ह्यात वापरायची रेड ची पद्धत या ठिकाणी वापरावी.
Narcotic Drugs - Law (अंमली पदार्थ संबंधीत कायदे)
क्रिमिनल अपील क्रमांक 1880/2011 मोहन लाल विरुध्द पंजाब राज्य. Supreme Court of India Mohan Lal vs The State Of Punjab on 16 August, 2018
JUDGMENT – CRIMINAL APPEAL No. 1880/2011 MOHAN LAL v. STATE OF PUNJAB. Dated 16/08/2018.
मा. न्यायालयाने अपीलकर्ते यांना निर्दोष मुक्त करण्याची खालील प्रमाणे कारणे नमुद केलेली आहेत.
- गुन्हयाचे फिर्यादी व तपासीक अंमलदार हे एकच आहेत.
- गुन्हयाचे तपासीक अंमलदार यांनी गुन्हयातील मुद्देमाल जप्त केल्यानंतर पो.स्टे. ला मुद्देमाल कक्षात जमा न करता 09 दिवस आपले ताब्यात ठेवला.
- सी. ए. कडे तपासणीस पाठवावयाचे सी. ए. सॅम्पल तपासीक अंमलदार यांनी स्वतःचे ताब्यात ठेवले.
- सी. ए. कडे पाठवावयाचा मुद्देमाल 09 दिवस विलंबाने पाठविला.
- जप्ती पंचनाम्यावर आरोपीची स्वाक्षरी नाही.
- पंचनाम्याची प्रत आरोपीस मिळाले बाबत आरोपीची स्वाक्षरी नाही.
अंमली पदार्थ संबंधात शासन स्थरावर तरतूद...
Memorandum of Understanding with various countries regarding drugs related issue.
विविध देशयासोबत अंमली पदार्थाचे संबंधांने केलेले सामंजस्य करार
5) SAARC Convention on NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES
Information about Proclaimed Offenders (घोषित गुन्हेगार संबंधित माहिती.)
Proclaimed Offenders at National Level…(NCORD चे website वरुण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
Information about Drug
अंमली पदार्थाबाबत माहिती
अंमली पदार्थाबाबत माहिती…(NCORD याचे website वरुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)