केस डायरी (Case Diary)

केस डायरी संदर्भात महत्वाची माहिती...

केस डायरी

  • केस डायरी ही आपल्या जिल्हयातील प्रचलित विशीस्ट नमूना असेल त्या प्रकारच्या नमुन्यात लिहावी.
  • केस डायरी चा कालावधी हा विशिस्ट तारखेस 00.00 वा ते त्याच दिवसाच्या 24.00 वा. पावेतो असतो.
  • रात्री 24.00 वा. नंतर सुधा तपास सुरूच राहत असेल तर केस डायरी मध्ये 24.00 वा. पावेतो चा तपास पहिल्या दिवसाच्या केस डायरी मध्ये लिहावा. व 00.00 वा. नंतर चा तपास दुसर्‍या दिवसाच्या केस डायरी मध्ये लिहावा.
  • केस डायरी मध्ये अपराधाची ओळख होण्याबाबतची संपूर्ण माहिती लिहावी. उदा. अप क्र. , गुन्हा घडल्याचे ठिकाण, गुन्हा घडल्याचे दिनांक, गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस स्टेशन, गुन्हा दाखल झाल्याचे दिनांक, इत्यादि …
  • केस डायरीला तारखे प्रमाणे केस डायरी नंबर दिला जातो. ती केस डायरी किती क्रमांकची आहे व ती किती तारखेला लिहिली गेली आहे हे 05/2023, दिनांक 12/12/2023 या प्रमाणे नमूद करावे.
  • केस डायरी मध्ये आपण त्या तारखेला काय तपस केला हे नमूद करावे. जसे घटनास्थाळ पंचनामा, आरोपी शोध, घर झडती, इत्यादि…
  • आपण केलेल्या तपासात पुराव्याचे दृस्टीने काही महत्वाची बाब लक्ष्यात आल्यास ती केस डायरी मध्ये त्या तारखेला जरूर नमूद करावी. केस डायरी मध्ये गुन्ह्या संदर्भात आपले निरीक्षण लिहावे.
  • फिर्याद सोबत बरेचदा इतर कागदपत्रे सुधा असतात. गुन्हा दाखल केल्या नंतर बरेचदा, फिर्यादी काही कागदपत्रे सुधा फिर्याद सोबत फिर्याद दाखल अंमलदार/अधिकारीना (स्टेशन डायरी अंमलदार) देतो. उदा. खरेदी बिल, विक्री बिल, एखादे पत्र, दारूची केस असल्यास घटनास्थळ पंचनामा इत्यादि. ते सुधा तपास डायरीला लावलेली असतात. ज्या तापसी अमलदार ने तपास डायरी तपासा कारिता घेतलेली असेल त्यांनी त्या डायरीचे अवलोकन करावे. त्या तपास डायरीमध्ये काय कागदपत्र समविस्ट केले आहेत ते केस डायरी मध्ये नमूद करावे. (बरेचदा फिर्यादी कडून तपासी अंमलदार कडे कागदपत्र वर्ग होताना गहाळ होण्याची शक्यता असते) (तपस डायरी मध्ये काही विशिस्ट बाब त्याचे नजरेस आली असल्यास ती सुधा केस डायरी मध्ये नमूद करावी.) 
  •  तपासात बर्‍याचदा एक पेक्षा जास्त तपासी अंमलदार असतात त्यावेळेस सुधा तपास डायरी घेताना तपास घेणार्‍यांनी, तपास डायरी चे अवलोकन करून त्यात काय कागदपत्र आहेत हे केस डायरीमध्ये नमूद करावे.
  •  तपास आदानप्रदान करताना तपास देणार्‍यांनी, … यांचे आदेश्याने, तपास डायरी … यांना वर्ग केली असे नमूद करावे तर तपास घेणार्‍यांनी … यांचे आदेश्याने तपास डायरी ….. यांचे कडून पुढील तपास कमी तपास डायरी प्राप्त झाली असे नमूद करून पुढील तपास सुरू करावे. तपास डायरी चे अवलोकन करता … … कागदपत्र सलग्न असल्याचे नमूद करावे.
  • तापासाच्या शेवटच्या डायरी मध्ये तपासचा शेवट कसं झाला हे नमूद करावे. उदा. दोषारोप पत्र पाठविले, फायनल पाठविले… इत्यादि.
  • बर्‍याचदा तपास कोर्ट चे आदेश्याने पुढील आदेश्या पावेतो तपास स्थगित केला जातो किवा दोषारोप पाठविने करिता स्थगिती दिली जाते, त्या प्रमाणे केस डायरी मध्ये नमूद करून तपास स्थगित ठेवावा.
  • तपासाची केस डायरी लिहिताना तपास पूर्ण होण्याआधीच्या केस डायरी मध्ये आजचा तपास या ठिकाणी 20.00वा. स्थगित करण्यात आला असे लिहून त्या दिवसाचा तपास थांबविण्यात येतो. तर तपास पूर्ण झाल्यावर … दोषारोप पाठविण्यात आले. या ठिकाणी तपास पूर्ण झाला असे लिहून केस डायरी थांबविली जाते. तर ज्या तपासात आरोपी न मिळाल्याचे कारणाने तपास थांबविला जातो त्यात …. इतके प्रयत्न करून सुधा आरोपी मिळून येत नाही, नजीकच्या भविष्यात सुधा मिळून येण्याची शक्यता कमी आहे करिता सादर चा गुन्हा कायम तपासावर ठेवून सादर गुन्ह्यात अ फायनल पाठविण्यात येते असे लिहून तपास स्थगित केला जातो.
  • तपासाचा शेवट ज्या प्रमाणे झाला त्या प्रमाणे नोंदी केस डायरी मध्ये घ्याव्यात.
  • केस डायरी ही रोजची रोज लिहिणे तसेच एसडीपीओ कार्यालयास पाठविणे गरजेचे आहे. 

THE HIGH COURT OF BOMBAY, CRIMINAL APPELLATE JURISDICTION, ANTICIPATORY BAIL APPLICATION NO.1802 OF 2016, ALONG WITH, CRIMINAL APPLICATION NO.966 OF 2016.(पाहण्याकरिता येथे क्लिक करा…) 

  • मा.उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार्‍या केस डायर्‍या फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या प्रकरण 12 मध्ये नमूद प्रमाणे ठेवण्यात याव्यात.
  • केस डायरी ठेवण्यासंबंधात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 172 (1-ब) चे पालन होणे गरजेचे आहे.
  • फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 172 (1-ब) मध्ये सन 2008 मध्ये सुधारणा (अधिनियम 5/2009) करताना केंद्र शासनाने कलम 172 मध्ये केलेली सुधारणा शासन परिपत्रक, गृह विभाग, क्रमांक संकिर्ण-2011/प्र.क्र.179/पोल दि. 11/02/2011 अन्वये शासनाने यापूर्वीच सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळविली आहे. सदरची सुधारणा दि. 31/12/2009 पासून अंमलात आलेली आहे. सदर सुधारणेत नमूद नुसार केस डायरी ही पुस्तक स्वरुपात बांधणी केलेल्या पृष्ठांच्या स्वरुपात असावी व केस डायरीच्या प्रत्येक पानावर क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. 
  • पोलिस मनुयल भाग 3, मधील नियम 225, चॅप्टर -6, मध्ये तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत.  
  • एखाद्या प्रकरणांतर्गत चौकशी करणार्‍या प्रत्येक पोलिस अधिकार्‍याने दररोज आपल्या चौकशीची कार्यवाही केस डायरीमध्ये नोंदवावी, ज्यामध्ये गुन्ह्याची किव्हा इतर माहिती कोणत्या वेळेस पोहोचली, त्याने कोणत्या वेळी चौकशी सुरू केली आणि बंद केली, त्याने कोठे किंवा कोणत्या ठिकाणी भेट दिली हे नमूद केले पाहिजे.
  • कोणतेही फौजदारी न्यायालय, तपास दरम्यान किव्हा गुन्ह्याचे ट्रायल Trial (संपरीक्षण दरम्यान) पोलीस केस डायरी मागवू शकते, अशा डायरीचा वापर खटल्यातील पुरावा म्हणून नव्हे, तर अशा तपासासाठी किंवा खटल्याच्या संपरीक्षण करिता मदतीसाठी करू शकते.
  • आरोपी किंवा त्याचा वकील या दोघांनाही अशा डायरी मागवण्याचा अधिकार नाही, किंवा त्यांना त्या पाहण्याचा अधिकार नाही, (केस डायरी केवळ न्यायालयाने मागविल्या आहेत या सबबी खाली या आरोपी किव्हा त्याचे वकिलास पाहता येत नाही.); परंतु, त्यांचा वापर ज्या पोलीस अधिकाऱ्याने तपस केला असेल त्यांना त्यांची आठवण ताजी करण्यासाठी वापरता येईल किंवा न्यायालयाने त्यांचा वापर अशा पोलीस अधिकाऱ्याला खोटा ठरवण्याच्या उद्देशाने केला असेल, तर न्यायालयास त्या वापरता येईल (भारतीय पुरावा कायदा, 1872 (1872 चा 1), मधील कलम 161 किंवा कलम 145 मधील तरतुदी, यथास्थिती, लागू होईल.)

Leave a Comment