जप्त मुद्देमालाचे / मालमत्तेचे बाबतीत मुद्देमाल मोहररचे कर्तव्य (Duties of Muddemal Moharar in case of seized property)
जप्त मुद्देमाल कसा सांभाळावा या बाबत मुद्देमाल मोहरर (कारकून) यांना मार्गदर्शन..
जप्त मुद्देमालाची पडताळणी करूनच तो ताब्यात घेणे
(Taking possession of the seized material only after verifying it.)
तपासी अंमलदार गुन्ह्यातील मुद्देमाल जमा करण्यास आल्यानंतर जप्त मुद्देमाल पंचनाम्यातील वर्णनाप्रमाणे बरोबर असलेबाबत तपासुन पाहुन, मुद्देमालाची पडताळणी करून ताब्यात घ्यावा. सादर मुद्देमालाची मुद्देमाल नोंद वहीत नोंद करून घ्यावी. ही नोंद सुवाच्य असावी. (पंचनाम्यातील वर्णनाप्रमाणे मुद्देमाल कोर्टात न पाठविल्यास तो स्विकारला जात नाही व त्याचा परिणाम खटल्याचे निकालावर होण्याची शक्यता असते)
- जप्ती देणे कमी आलेल्या मुद्देमालाची मुद्देमाल पावती तयार करावी :- तपासी अंमलदार यांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची तात्काळ पावती फाडणे व जप्तीपंचांनाम्या प्रमाणे असा सर्व मुद्देमाल जमा करुन घेणे. (सध्या CCTNS प्रणालीत मुद्देमाल नोंद केल्यावर लागलीच मुद्देमाल क्रमांक मिळतो, तोच मुद्देमाल क्रमांक मोद्देमाल मोहरर तापसी अधिकारी यांना देतात.)
- मुद्देमाल नोंदवहीतील नोंदी:- तपासी अंमलदार यांचकडुन ताब्यात आलेल्या मुद्देमालाची पावती तयार केल्या नंतर त्याची संबंधीत रजिस्टरमध्ये (भाग-5, भाग-6, दारुबंदी वगैरे) नोंद घेवुन मुद्देमाल पवतीवर मुद्देमाल रजिस्टर नंबर लिहावा. व दुस-या प्रतीवर मुद्देमाल नंबर टाकुन ती प्रत तपास अंमलदारास ध्यावी.
- क्राईम रजिस्टरला नोंद घेणे:- मुद्देमाल पावती फाडल्या नंतर मुद्देमाल इंट्रीची नोंद क्राईम रजिस्टरमधील कॉलम क्रमांक 21 मध्ये करण्यात यावी.
जप्त मुद्देमालाचा रेकॉर्ड ठेवणे.
(Record Keeping of seized property)
- मुद्देमाल शिल्लकी आढावा:-वर्ष संपल्या नंतर नवीन नोंदवही अभिलेखावर ठेवाव्यात. सर्व नवीन व जुन्या नोंदवही वरिस्ट कार्यालयाकडुन प्रमाणित करुन घ्याव्यात. मुद्देमाल आढावा नोंदवहीत पोलीस तपासावर प्रलंबित तसेच न्यायालयात निकाल न लागलेल्या कोर्ट प्रलंबित मुद्देमालाचा आढावा लाल शाईने भाग-5, भाग-6 व दारुबंदी मुद्देमाल नोंदवहीत घ्यावा. तसेच ज्या पोलीस ठाण्यात अकस्मित मयतांचे प्रकरणाकरीता आढावा नोंदवही उपलब्ध असेल तर संबंधीत आढावा नोंदवहीत प्रलंबित प्रकरणांचा आढावा लाल शाईने 15 दिवसांचे आत लिहावा.
- क्राईम रजिस्टरी नोंद :- मुद्देमाल पावती फाडल्या नंतर मुद्देमाल इंट्रीची नोंद क्राईम रजिस्टरमधील कॉलम क्रमांक 21 मध्ये करण्यात यावी.
- मुद्देमाल नोंदी:- तपासी अंमलदारकरवी वेळचेवेळी मुद्देमाल पावती फाडुन जप्त मुद्देमाल सत्वर जमा करणेसाठी पाठपुरवा करावा. यामुळे मुद्देमालांची रजिस्टरमध्ये क्रमवार नोंदी होऊन मुद्देमाल जप्त तारखेवरुन तात्काळ शोधणेस मदत होईल.
- रजि. मधील नोंदी बाबत प्रभारी अधि. यांची स्वाक्षरी :- निर्गती केलेल्या वस्तुबाबत व रजिस्टला घेण्यात आलेल्या नोंदी बाबत प्रभारी अधिकारी यांची समक्षची म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी.
- गहाळ नोंद :- गहाळ मुद्देमालचे नोंदी बाबत स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात यावा. एखादा मुद्देमाल गहाळ झाला असेल तर संबंधीताकडुन त्याची पुर्तता करुन घेणेत यावी. जर मुद्देमाल गहाळ अथवा अपहार केला असल्यास ती बाब पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या निदेर्शनास आणुन दयावी. नंतर प्रभारी अधिकारी यांनी त्याची खातरजमा करुन उपविपोअधि. यांना अहवाल पाठवावा. याबाबत सविस्तर चौकशी करुन त्वरीत चौकशी अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर करावा.
- अभिलेख :- सर्व अभिलेख व नोंदवही अद्ययावत लिहुन त्याची मांडणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन दिलेल्या सुचनेप्रमाणे क्रमवार लावुन करावी.
- रेकार्ड छाननी :- जुन्या रेकार्डची छाननी करुन अ व ब अशी वर्गवारी करून सदरचे रेकार्ड पोलीस ठाणेच्या रेकार्ड रुममध्ये अनुक्रमणिका लावुन सुस्थितीत व सुबक रित्या ठेवावे. तसेच मुदत बाहय झालेल्या रेकार्डची यादी बनवुन या रेकार्डची नाश रेकार्ड नोदवहीत नोंद घेवुन अहवालासोबत सदरचे रेकार्ड रापोनि मुख्यालय यांच्याकडे सुपूर्त करावेत.
वर्ष प्रमाणे व वर्गवारी प्रमाणे मुद्देमाल सुरक्षितरीत्या ठेवणे.
(keeping of seized property safe, according to year and category.)
- मुद्देमालाचे लेबल पहावे व वर्षा प्रमाणे मुद्देमाल क्रमवार ठेवावा :- ताब्यात मिळालेल्या सर्व मुद्देमालावर नोंद नंबर,गुरंन क्र, कलम यांची कागदी लेबल पाहून तो मुद्देमाल क्रमवार सालाप्रमाणे सुरक्षित व सुबकरित्या रॅकवर लावुन ठेवावा.
- मौल्यवान व संकीर्ण मुद्देमाल:- दागिने, पैसे, अग्निशस्त्र जप्त असतील तर त्याची तज्ञाकडे छाननी करुन त्यांचे प्रमाणपत्रसह असा सर्व मुद्देमाल खास बनवुन घेतलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
- अवजड मुदेमल :- जो मुद्देमाल अवजड स्वरुपाचा असेल उदा. बॅरेल, अवजड वाहने, मोटार सायकल, सायकल इत्यादी वाहनांवर ऑईलपेंटने मुद्देमाल इंट्री नंबर, गुरनं व कलम या प्रमाणे नोंद करुन, कागदी लेबले लावुन तो मुद्देमाल क्रमवार सालाप्रमाणे सुरक्षित सुबकरित्या ठेवावा.
- वर्गवारी प्रमाणे मुद्देमाल ठेवणे :- ताब्यात मिळालेला मुद्देमाल उदा. भाग – 5,भाग-6 दारुबंदी असा स्वतंत्रपणे क्रमवार सालाप्रमाणे सुरक्षित व सुबकरित्या रॅकवर लावुन ठेवणे.
रासायनिक विश्लेषक (न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळा) यांचा अहवाल.
(Report of the Chemical Analyst (Forensic Lab.))
- सी.ए. परीक्षणाकरिता पाठविलेला मुद्देमाल:- गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचे परीक्षण होवून त्याचा अहवाल संपरीक्षण करणार्या कोर्ट समोर सादर झाल्यास कोर्टला त्या गुन्ह्यासंदर्भात विशीस्ट निष्कर्ष काढायला सबळ पुरावा मिळतो. त्यामुळे मुद्देमालाचे परीक्षण होवून त्याचा अहवाल संबंधित कोर्टला वेळेत पाठविणे गरजेचे असते. सी.ए. परीक्षणाकरिता पाठविलेल्या मुद्देमालाचे स्वतंत्र रजिस्टर करण्यात यावे, जेणेकरुन किती गुन्हयातील मुद्देमाल सी. ए. तपासणीवर प्रलंबित आहे. याची तात्काळ माहिती उपलब्ध होईल.
- सी. ए. तपासणीस पाठविलेल्या मुद्देमालाची नोंद:- सी. ए. तपासणी करीता, हस्ताक्षर तपासणी करीता, इतर तपासणी करीता पाठविलेल्या मुद्देमालाची मुद्देमाल नोंदवहीतील त्या-त्या नोंदीसमोर नोंद घेवुन ज्यांचे ताब्यात मुद्देमाल दिला त्यांची (मुद्देमाल CA ऑफिसला घेवून जाणारे अंमलदार) स्वाक्षरी घ्यावी व पाठविलेल्या रिपोर्टची स्थळप्रत (Counterfoil/पोचपावती/OC Copy) फाईलला लावुन ठेवावी..
- सी.ए. तपासणी वरुण मुद्देमाल पोलिस स्टेशनला परत आल्यानंतर त्या मुद्देमालाची नोंद घेणे :- सी. ए. तपासणी होवुन मुद्देमाल परत पोलीस ठाणेस आल्या नंतर त्या मुद्देमालाची संबंधीत नोंदीसमोर पुन्हा नोंद घ्यावी.
- रासायनिक विश्लेषक अहवाल :- CA ऑफिस कडून मुद्देमाल परीक्षणाचा रासायनिक विश्लेषक चा अहवाल प्राप्त झाल्यावर तो संबंधित तापसी अंमलदार यांना ध्यावा. त्याप्रमाणे आपल्या रजिस्टर वर नोंद अरुण ठेवावी. (ज्या गुन्ह्याचे बाबतीत दोषारोपपत्र कोर्ट मध्ये गेले आहे त्या गुन्ह्यातील रासायनिक विश्लेषकाचा अहवाल संबंधित कोर्टात PSO चे पत्राने संबंधित कोर्ट मध्ये पाठवावा.
कोर्टाचे आदेशाप्रमाणे संबंधितस मुद्देमाल परत करणे.
(To return the seized property to the concerned as per the order of the court.)
- कोर्टाचे आदेशाप्रमाणे मुद्देमाल परत करणे:- ज्या मुद्देमालाचे संदर्भात मुद्देमाल मालक/ वारस / संबंधित व्यक्तिस परत देण्याबाबत न्यायालयाचा लेखी आदेश होईल. त्यावेळी मुद्देमाल ज्याचे ताब्यात दयावयाचा आहे त्यांची पुर्ण खात्री करावी व मुद्देमाल ताब्यात दयावा. सदर मुद्देमालाबाबत संबंधीत मुद्धेमलचे नोंदीसमोर मुद्देमाल मालकास परत दिल्या नोंद करावी. त्या नोंदीत संबंधित कोर्टचा आदेश लिहून संबंधीताची स्वाक्षरी घ्यावी व संबंधीत इसमास मुद्देमालाची पुर्ण खात्री करण्यास सांगुन नंतरच सदरचा मुद्देमाल परत करावा. (मुद्देमाल सुस्थितीत परत मिळाला असे नोंदीसमोर लिहून घ्यावे.)
नियमितपणे मुद्देमालाची पाहणी करून नोंदी घेणे.
(Regularly inspecting the seized property and taking notes.)
- प्रलंबित मुद्देमाल आढावा :- प्रत्येक महिन्याचे अखेरीस नोंदवहीत प्रलंबित मुद्देमालाचा आढावा घेवून त्याची दर महिन्यास नोंद घ्यावी.
- मुद्देमाल चेक व पंधरवडा अहवाल :- प्रभारी अधिकारी यांनी दर पंधरवडयामध्ये मुद्देमाल चेक केले बाबत रजिस्टरला नोंद घेवून पंधरवडा अहवाल पाठवावा. (आदेशयाप्रमाणे)
- अचानक मुद्देमाल तपासणी :- प्रभारी अधिकारी यांनी अचानक मुद्देमाल तपासणी करुन सर्व मुद्देमाल बरोबर आहे का याची खात्री करावी
दारूबंदीचे गुन्ह्यातील मुद्देमाल
(Seized property of Prohibition Act.)
- दारुबंदीचे गुन्हयातील मुद्देमालाची सी.ए. तपासणी :- दारुबंदी कायदा खालील जप्त सी.ए. सँपल बाटल्या नियमीतपणे केमीकल अॅनालायझर यांचेकडे तपासणीस पाठवाव्यात.
- CA कार्यालयाचा अहवाल:- CA कार्यालयाकडून आलेल्या मुद्देमालाचा अहवाल संबंधित PSO यांना ध्यावा किवा कोर्ट मध्ये दोषारोप पाठविलेल्या गुन्ह्यासंदर्भात PSO चे पत्राने तो अहवाल कोर्टात पाठवावा.
- दारुबंदीचे गुन्हयातील मुद्देमाल व सी.ए. सैंपल बाटल्या सुरक्षित ठेवने:- दारुबंदी खालील जप्त मुद्देमाल गावठी दारु व इतर मालाबाबत न्यायालयाकडुन लिलाव करण्याचे/नाश करण्याचे आदेश प्राप्त करुन घेण्यासाठी नियमीत पाठपुरावा करुन असे आदेश प्राप्त होताच नियमानुसार लिलाव / नाश प्रक्रिया पुर्ण करावी. (जर लिलावाचे आदेश असतील तर लिलावाची रक्कम चलनाने सरकार जमा करुन संबंधीत नोंदवहीत नोंद करावी.)
- किम्मत 1000 रु रकमेच्या खलील दारू मुद्देमाल:- SDPO कार्यालयाचे आदेशा प्रमाणे सादर मुद्देमाल नस्ट करावा.
- किम्मत 1000 रु रकमे पेक्षा जास्त रकमेचा दारू मुद्देमाल:- संबंधित कोर्ट चे आदेश प्रमाणे सादर मुद्देमालाची विल्हेवाट लावावी.
गुन्ह्यातील तसेच जुगार कायदया खालील गुन्ह्यातील जप्त रोख रक्कम.
(Cash seized from offenses as well as from offenses under the Gambling Acts.)
- जुगार कायदया खालील जप्त रोख रक्कम :- जुगार कायदयाखालील जप्त रोख रक्कमा कोर्ट क्रिमीनल हेड खालील बॅक/ट्रेझरी मध्ये जमा करुन त्याच्या चलनाच्या प्रती चलन फाईलला लावुन ठेवाव्यात. तसेच चलन क्रमांकाची नोंद मुद्देमाल नोंदवहीत घ्यावी.
- गुन्ह्यातील जप्त रोख मोठ्या रक्कम जमा:- गुन्हयातील जप्त मोठया रक्कमा न्यायालयच्या परवानगीने बॅक/ट्रेझरी मध्ये कोर्ट क्रिमीनल हेड खाली जमा कराव्यात.
मूल्यवान किंमती मुद्देमाल.
(Valuable Seized property)
- किंमती मुद्देमाल:- गुन्ह्यातील जप्त किंमती मुद्देमाल उदा. सोने, चांदी, इत्यादीचे दर 6 महिन्याचे अंतराने सराफाकडुन प्रमाणपत्र घ्यावेत व सदरचे मुद्देमाला सोबत ठेवावे.
कोर्टात दाखल केलेला मुद्देमाल.
(Seized property submitted/filed in court.)
- कोर्टात दाखल केलेला मुद्देमाल :- कोर्टात जमा केलेल्या मुद्देमालाची मुद्देमाल नोंदवहीतील संबंधित नोंदीसमोर नोंद घेवुन मुद्देमाल कोणाच्या ताब्यात देवुन न्यायालयात पाठविला त्याची स्वाक्षरी नोंदवहीत घ्यावी. मुद्देमाल न्यायालयात जमा झाल्यानंतर कोर्टाकडील एम. आर. क्रमांक, व्ही. पी.एम.आर. क्रमांक यांची रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी. पाठविलेल्या रिपोर्टाची स्थळप्रत (पोचपावती) फाईलला लावुन ठेवावी.
स्फोटक, ज्वालाग्राही मुद्देमालाबाबत.
(Regarding explosive and flammable Seized property.)
- स्फोटक, ज्वालाग्राही मुद्देमालाबाबत :- स्फोटक ज्वालाग्राही मुद्देमालाबाबत उदा. गॅस, पेट्रोल इत्यादी बाबत महसुल विभागाचे पुरवठा अधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करुन आदेश प्राप्त करुन घेवुन त्यांच्या आदेशाप्रमाणे या मुद्देमालाची सत्वर निर्गती करावी. (स्फोटक ज्वालाग्राही पदार्थाच्या मुद्देमालाचे निर्गती बाबत नवीन आदेश आलेले असल्यास त्याचा आढावा घ्यावा.)