जप्त मुद्देमाल (Seized Property)

पोलिस स्टेशन मधील जप्त मुद्देमाल बाबत

मुद्देमाल म्हणजे काय?

(What is mean by seized Property?)

               गुन्हयाचे तपास व पुराव्याकामी जप्त केलेल्या वस्तू, आकस्मात मृत्यू, दारुबंदी, जुगार या केसेसमध्ये जप्त केलेले साहित्य अन्य स्थानिक कायदयान्वये केलेले कारवाई मध्ये जप्त केलेले साहित्य व बेवारस वाहने, वस्तू या सर्व जप्त वस्तूंना पोलिस स्टेशन मधील जप्त मुद्देमाल असे म्हणून ओळखले जाते.

पोलिस स्टेशन मधील जप्त मुद्देमालाचे स्त्रोत काय असतात?

(What are the sources of seized material in police stations?)

 • बंदिस्त जागेतील झडतीमध्ये जप्त केलेल्या वस्तु :-  फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 100( 7 ) अन्वये एखादया बंधीस्त जागेचे झडती घेतली असता त्याझडतीमध्ये जप्त केलेल्या वस्तु.
 • चोरीची मालमत्ता किव्हा तसा संशय असलेली मालमत्ता :-  फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 102 अन्वये पोस्टे प्रभारी अधिकारी यांनी चोरीची मालमत्ता आहे असे अभिकथन करण्यात आले असेल किंवा तसा संशय असेल अशा परिस्थितीत जप्त केलेली मालमत्ता.
 • गुन्हे अन्वेषणानाच्या प्रयोजनार्थ जप्त केलेल्या वस्तू:- फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 165 अन्वये अन्वेषण करणा-या अधिका-याने अन्वेषणानाच्या प्रयोजनार्थ जप्त केलेल्या वस्तू.
 • मार्ग चे तपासात जप्त मालमत्ता:-  फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 174 अन्वये आत्महत्या अथवा अपघाती मृत्यू अथवा संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये अन्वेषणाच्या प्रयोजनार्थ जप्त केलेली मालमत्ता.
 • मुंबई पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये जप्त केलेली मालमत्ता:- (ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे) जी मालमत्ता चोरलेली आहे किंवा लबाडीने मिळविलेली आहे असे सकारण वाटत असेल. अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो कोणत्याही रीतीने वाहून नेत असेल किंवा ती वस्तु विकण्यास किंवा गहाण ठेवण्यास नेत असेल त्यास, अशी वस्तू ताब्यात बाळगण्याबद्दलचे किंवा तसे कृत्य करण्याबद्दलचे कारण समाधान होईल अशा रीतीने देत नसेल तर ती मालमत्ता मुंबई पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये जप्त केली जाते.
 • मुंबई जुगार कायदा:- मुंबई जुगार कायध्या अंतर्गत जप्त करण्यात आलेली मालमत्ता. (महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5, 12 ( अ ) अन्वये जप्त केलेला माल.)
 • मुंबई दारुबंदी कायदा:-  मुंबई दारुबंदी कायध्याचे विविध कलमन्वये जप्त करण्यात आलेली मालमत्ता. (महाराष्ट्र दारुबंदी कायदा:- महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65, 66 अन्वये राखुन जप्त केलेला माल.)
 • ‘एन डी पी एस अॅक्ट 1989:- ‘एन डी पी एस अॅक्ट 1989 अन्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. (अंमली पदार्थ)
 • जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955:- जिवनावश्यक वस्तु अधिनियम अन्वये जप्त करण्यात आलेला मुद्येमाल.
 • स्थानिक कायदयान्वये जप्त मुद्देमाल:-  स्थानिक कायदयान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल.
 • महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85:- महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 प्रमाणे राखुन ठेवलेले रक्ताचे नमुने. (सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घातल्याने पोलिसांनी कार्यवाही केल्यावर CA ला तपासणी कमी पाठविण्याकरिता काढून ठेवलेले रक्ताचे नमुने.)
 • बेवारस मालमत्ता:-  बेवारस स्थितीत सापडलेला मुद्देमाल महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 कलाम 82 प्रमाणे जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहेत.

पोलिस स्टेशन मध्ये जप्त मुद्दमालाचे वर्गीकरण..

(How to classify the seized property in the police station?)

 • घटनास्थळावरुन मिळणारे भौतिक दुवे :- केस, विर्य, रक्त, रक्ताचे नमुने, लाळ, घाम, दात, हाड, मुञ, विष्टा, रक्त मिश्रीत माती, साधी माती, धुळीचे डाग, दगड, गवत, कागद, डाग, काठी, हत्यार, वास येणा-या वस्तु इत्यादी.
 • घटनास्थळावरुन मिळणारे स्फोटक पदार्थ :- अग्नी शस्त्रे, बंदुक रिव्हॉल्वर, पिस्तुल, काडतुसे, तोफा, क्षेपणास्त्रे, विषारी स्फोटक पदार्थ, जिलेटीन, डेटोनेटर्स अन्य प्रकारचे पावडर.
 • शव विच्छेदनाचे वेळी तपासणीसाठी राखुन ठेवलेले :- शरीरातील वेगवेगळ्या भागातील अवयवाचे तुकडे, व्हिसेरा, कातडी, मेंदु, स्टमक वॉश, सांगाडा, अर्धवट जळालेली हाडे इत्यादि.
 • NDPS कायदयाखाली जप्त केलेल्या वस्तु :- गांजा, चरस, अफु, हेरॉईन ब्राऊन शुगर, मेन्ड्रेक्स गोळया.
 • दस्तऐवज :- स्टॅम्प, हस्तलिखीत, टंकलिखीत, प्रिंट, नैसर्गिक हस्ताक्षर, नमुना हस्ताक्षर, वादग्रस्त दस्तऐवज.
 • दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल :- गावठी दारु, देशी दारु, विदेशी दारु.
 • जुगार कायदयाखालील मुद्देमाल :- जप्त रोख रक्कम, मोबाईल, वाहने.
 • किंमती मुद्देमाल :- सोने, चांदी, हिरे, जवाहरात, नगदी रोख.
 • ज्वालाग्रही मुद्देमाल :- पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस व इतर ज्वालाग्रही पदार्थ.
 • बेवारस मुद्देमाल :- दुचाकी, चार चाकी वाहने, इतर बेवारस वस्तु.
 • बोटांचे व पायाचे ठसे :- घटनास्थळावरुन मिळुन आलेले गुन्हेगारांचे व संशयीतांचे बोटांचे व पायाचे ठसे.
 • संभाषण :- अपहरण, लाच, खंडणी, ब्लॅकमेलींग, वादग्रस्त संभाषण असलेली साधने. 
 • इलेक्ट्रॉनिक्स मुद्देमाल :- मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सीडी, पेन ड्राईव्ह, सी.सी.टी.व्ही. फुटेज, व्हीडीआर.

Leave a Comment