घर झडती पंचनामा (House Search Panchanama)

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 ची घरझडती पंचनाम्या नुसार महत्वाची कलमे.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 100.

कलम १०० नुसार, एखाद्या बंद जागेत शिरण्यास व त्या जागेची झडती घेण्यास वॉरंट बजावणाऱ्या अंमलदारास कोणी मज्जाव करता कामा नये. तसेच आपल्या अंगावर वस्तू लपविल्या आहेत असा संशय आल्यावर सदरहू इसमाची अंगझडती घेण्याचा सदरहू अंमलदारास अधिकार आहे. (या अधिकारास कुणी प्रतिबंध केल्यास आय.पी.सी. कलम 353 प्रमाणे अपराध आहे.)

कलम १००:-

  • सदरची घरझडती न्यायालयाने दिलेल्या वॉरंटानुसार घेण्यात येते.
  • घरात प्रवेश करताना अधिकारी, पंच व सोबतचे लोकांनी आपली स्वतःची अंगझडती देऊन घर झडतिच पुढील कार्यवाही करावी.
  • झडती घेणाऱ्या अंमलदाराने ज्या ठिकाणी झडती घ्यावयाची असेल ते ठिकाण ज्या भागात येते, त्या भागातील दोन अगर अधिक इसम पंच म्हणून बरोबर घ्यावेत व त्यांना प्रारंभापासून अखेरपर्यंत हजर राहण्यास सांगावे.
  • सापडलेल्या वस्तूंची त्या वस्तू कोठे सापडल्या हे नमूद करून यादी करावी.
  • कोर्टाच्या समन्सखेरीज पंचांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नाही.
  • ज्या जागेची झडती घ्यावयाची असेल त्या जागेच्या मालकास किंवा त्याच्यातर्फे कोणाही इसमास झडती घेताना त्या जागी हजर राहू दिले पाहिजे आणि पंचनाम्याची एक नक्कल त्याला दिली पाहिजे.
  • पंच म्हणून पुढे येण्याचे वाजवी कारणावाचून कुणी नाकारल्यास त्याने भा.दवि. चे कलम 187 अन्वये गुन्हा केला, असे गृहीत धरले जाईल त्या नुसार कार्यवाही होईल.
  • झडतीची जागा बंदिस्त असल्यास तेथे राहणाऱ्या इसमाने झडती घेण्यास मुक्त प्रवेश द्यावा. प्रवेश नाकारल्यास फौ. प्र. सं., कलम ४७ (२) प्रमाणे जबरदस्तीने प्रवेश करता येतो.
  • झडती चालू असताना जर अंगावर माल लपविला असे आढळले तर अंगझडती घेता येते.
  • एखाद्या इसमाच्या अंगझडतीत त्याच्या अंगावर काही वस्तू सापडल्यास त्या वस्तूंची यादी करून पंचनाम्याची नक्कल त्याला दिली पाहिजे.
  • झडती घेण्यापूर्वी त्या भागातील दोन स्थानिक प्रतिष्ठित पंच घेण्यात यावेत. त्याांना CRPC कलम 160 अन्वये लेेखी समन्स द्यावे. तशी लेखी पत्रसूचना नोंदी ठेवावी.
  • झडती साक्षकामी पंच आले नाहीत तर त्यांचेविरुद्ध कलम १८७ भादंवि अन्वये कारवाई करावी. तशी नोंद व दस्तऐवज ठेवावे.
  • पंचांसमक्ष झडती घ्यावी व जप्त केलेल्या वस्तूंची यादी तयार करून त्यावर पंचांच्या सह्या घ्याव्यात.
  • घरझडती सभ्यपणे व कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता करावी.

CRPC कलम 165 मधील पोटकलमांतील तरतुदी.

  •  CRPC 165(1) घरझडती घेण्याचे अधिकार पोलिसांना या कलमाद्वारे देण्यात आले आहेत. (पोलीस अधिकारी स्वतः किंवा दुसऱ्याकरवी जागेची झडती घेऊ शकतो व पुराव्याकामी/ तपासकामी वस्तू जप्त करू शकतो.)
  • CRPC 165(2) नुसार, पोटकलम (1) अंतर्गत कार्यवाही करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतः झडती घ्यावी.
  • CRPC 165(3) नुसार तो काही कारणास्तव असमर्थ असल्यास त्याने आपल्या दुय्यम अधिकाऱ्यास लेखी आदेशान्वये झडती घेण्यास पाठवावे.
  • CRPC 165(4) नुसार, कलम 100 अंतर्गत असलेल्या तरतुदी या कलमाखाली घेतलेल्या झडतीस लागू आहेत.
  • CRPC 165(5) नुसार,  वरील पोटकलम (1) व (3) अंतर्गत केलेल्या नोंदीच्या प्रती तपासी अधिकाऱ्याने जवळच्या न्यायिक दंडाधिकाऱ्याकडे पाठवाव्यात व झडती घेतलेल्या जागेच्या मालकाला त्याची एक प्रत विनामूल्य द्यावी.

Leave a Comment