IPC Act Section 299

IPC Act Section 109

  • कलम 299 – सदोष मनुष्यवध [Culpable Homicide] :- हे व्याख्या कलम असुन या कलमाचे शिक्षा कलम 304 हे आहे.

मृत्यू घडवुन आणणाच्या उद्देशाने अथवा जिच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे. अशी शारीरिक जखम करण्याच्या उद्देशाने अथवा एखाद्या कृतीमुळे आपण एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होण्याचा संभव आहे याची जाणीव असताना जो कोणी अशी कृती करून एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होतो तो ‘सदोष मनुष्यवधा चा अपराध करतो.

उदाहरण..

(१) ‘अ’ एका खड्ड्यावर काड्या व गवत टाकून ठेवतो, त्यायोगे मृत्यू घडवून आणावा असा त्याचा उद्देश आहे किंवा मृत्यू घडून येणे संभवनीय आहे याची त्याला जाणीव आहे. जमीन पक्की आहे असे समजून ‘ब’ त्यावरून चालत जातो, व त्यात पडून मरतो. ‘अ’ ने सदोष मनुष्यवधाचा अपराध केला आहे.

(2) ‘अ’ झुडपांच्या मागे असल्याचे ‘ब’ ला माहित आहे. परंतु ‘ड’ ला ते माहित नाही. ‘अ’ चा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने किंवा तो घडून येण्याचा संभव आहे याची जाणीव असताना ‘ब’ हा ‘ड’ ला झुडपावर गोळी झाडण्यास प्रवृत्त करतो. ‘ड’ गोळी झाडतो व ‘अ’ ला मारतो. या बाबतीत ‘ड’ हा कोणत्याही अपराधाबद्दल दोषी नसेल, पण ‘ब’ ने मात्र सदोष मनुष्यवधाचा अपराध केला आहे.

(3) ‘अ’ ने एका पक्षाला मारण्याच्या व चोरून नेण्याच्या उद्देशाने गोळी झाडल्यामुळे झुडपा- आड असलेला ‘ब’ मारला जातो. तो तिकडे असल्याचे ‘अ’ ला माहीत नव्हते. या बाबतीत, जर ‘अ’ बेकायदेशीर कृत्य करत असला तरी तो मनुष्यवधाचा दोषी नव्हता, कारण त्याचा ‘ब’ ला मारण्याचा किंवा ज्यामुळे मृत्यू घडून येण्याचा संभव असल्याचे आपणास माहीत आहे अशी कृती करून मृत्यू घडवून आणण्याचा त्याचा उद्देश नव्हता.

स्पष्टीकरण १. – जी व्यक्ती एखादा विकार रोग किंवा शारीरिक दुर्बलता यांनी पछाडलेल्या अन्य व्यक्तीला शारीरिक क्षती पोहोचवील व त्यायोगे त्या अन्य व्यक्तीचा मृत्यू अधिक लवकर घडवून आणील तिने त्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणला असे मानले जाईल.

स्पष्टीकरण २ – शारीरिक क्षतीमुळे मृत्यू घडून येईल त्या बाबतीत योग्य, इलाज व उपचार- कौशल्य यांचा अवलंब केला असता तर मृत्यू टळला असता असे असले तरी, अशी क्षती पोचवणाऱ्या व्यक्तीने मृत्यू घडवून आणला असे मानले जाईल.

स्पष्टीकरण ३- मातेच्या गर्भातील जीवाचा मृत्यू घडवून आणणे हा मनुष्यवध नाही. पण त्या जीवाचा कोणताही भाग बाहेर काढण्यात आला असेल तर त्याने श्वासोच्छवास केला नसला किंवा तो पूर्णपणे जन्माला आला नसला तरी त्या जीवंत बालकाचा मृत्यू घडवून आणणे हे ” सदोष मनुष्यवध या व्याखेत मोडू शकेल.

Leave a Comment