“350 व्या शिवराज्याभिषेक" निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत शासन निर्णय.

“३५० व्या शिवराज्याभिषेक" निमित्त बोधचिन्ह...

  • छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 06 जून 1674 रोजी रायगडावर संपन्न झाला होता. हा राज्याभिषेक सोहळा नऊ दिवस उत्साहात साजरा केला गेला होता.
  • त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा, 01 जून ते 06 जून 2023 दरम्यान राज्यभरात साजरा केला गेला.
  • त्या निमित्त शासनाने विविध कार्यक्रम राबविले आहे त्याचाच एक भाग म्हणून शासन स्थरावर, “350 व्या शिवराज्याभिषेक” निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत चा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
  • ३५० व्या शिवराज्याभिषेक, निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण शासनातर्फे करण्यात आले आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी, हा या मागील उद्देश आहे. त्यानुषंगाने, राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार/प्रसिध्दीत तसेच शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा (Logo) वापर करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला.
  • सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात सदर बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे या बाबत निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment