हरवलेल्या व्यक्ती आणि अनोळखी मृत इसम (Missing Persons and Unidentified Dead Bodies)

Missing Persons तसेच 363 IPC मधील (हरवलेल्या व्यक्ती)

Unidentified Dead Bodies (अनोळखी मृत व्यक्ती)

Policelifeline.in या वेबसाइट वर हरविलेल्या व्यक्ति आणि अनोळखी मृत इसम बाबत ची शोध पत्रिका/ माहिती प्रसारित करताना सूचना.

 • Policelifeline.in या वेबसाइटला पोलिस  वाचका कडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्या करिता आम्ही त्यांचे आभारी आहोत.
 • पोलिसांच्या या मंचाचा फायदा पोलिसांना त्यांचे तपास विषयक कामकाजात व्हावा अशी आमची प्रामाणिक मनोकांक्षा आहे.
 • या वेबसाइट चे वाचक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात असून त्यांचेच मदतीने हरविलेल्या इसमचा/तसेच अनोळखी मयत इसमांचा शोध घेन्याची संकल्पना काही पोलिस मित्रांनी मांडली.
 • बरेचदा एखादी व्यक्ती एक पोलिस स्टेशन चे हद्दीतून हरविलेली असते व दुसरीकडे जिवंत किव्हा मृत स्वरुपात मिळालेली असते. परंतु शोध घेण्याचे सुलभ माध्यम उपलब्ध होत नसल्याने सदर व्यक्तीचा शोध त्वरित लागत नाही.
 • इतर तापसी अमलदारांचे  निदर्शनास सदर माहिती व फोटो आणून दिल्यास, पोलिसांच्या या मंचाचा फायदा पोलिसांचे तपसातील हरविलेल्या व्यक्ति आणि अनोळखी मृत इसमाचे शोध कमी होऊ शकतो असे वाचकांकडून आम्हास सूचना केल्या गेल्याने आम्ही ही सेवा आमच्या पोर्टल वर उपलब्ध करून देत अहोत. 
 • ही निशुल्क सेवा असून ती हरविलेल्या व्यक्ति आणि अनोळखी मृत इसम याचा जलदगतीने शोध घेता यावा या उदेशाने सुरू केली गेली आहे.
 • एखादी व्यक्ती हरविली असल्यास किव्हा अनोळखी मयत असल्यास पोलिस त्याची शोध पत्रिका तयार करतात व ती शोध पत्रिका सर्वत्र प्रसिद्ध करतात. 
 • या पोर्टल वर फक्त पोलिसांना शोध घेणे असलेल्या इसमची माहिती शोधपत्रिके च्या स्वरुपात प्रसारित व प्रसिद्ध करण्याची सेवा दिली गेली आहे.
 • सदर शोध पत्रिका तापसी अंमलदार/अधिकारीनी त्यांची  स्वतची सही/शिक्याने तसेच संबंधित पोलिस स्टेशनचा गोल शिक्का वापरुन, तयार केलेली असावी. तसेच पोलिस तपासच्या नैसर्गिक प्रक्रिये नुसार ती प्रसिद्ध केली गेली असावी.
 • शोध पत्रिका Policelifeline.in चे अधिकृत मोबईल नंबर (7588722442) वर पाठविल्यास तिच फक्त या ठिकाणी प्रसिद्ध केली  जाईल.
 • पोलिसांनी पाठविलेल्या शोध पत्रिके सोबत फक्त एकाच फोटो (जो की शोध पत्रिके मध्ये प्रसिद्ध केला गेला आहे व स्पस्ट ओळखता येत नसल्यास) प्रसिद्ध केला जाईल.
 • ही माहिती आमचे facebook / instagram / whats app व इतर पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल.
 • तसेच इतर सदस्यांना विनंती आहे की, या पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या, हरविलेली व्यक्ति/अनोळखी मयत इसम बाबत आपले पो.स्टे/जिल्हा परिसरात किव्हा इतर कुठेही काहीही माहिती आपणास मिळाल्यास आपण त्यांची माहिती संबंधित शोध पत्रिका प्रसिद्ध करणारे तापसी अधिकारी यांना कळवायची आहे.
 • संबंधित व्यक्ति तीच आहे असे तापसी अंमलदार/अधिकारीनी कडून शिक्कामोर्तब झाल्यास व सदर तापसी अंमलदार/अधिकारींनी या पोर्टलला कळविल्यास आम्ही त्या व्यक्तिची शोध पत्रिका आमचे पोर्टल वरून डिलीट करू.
 • या प्रमाणे पोलिसांच्या या मंचाचा पोलिसांच्या मिसिंग/शोध तपास कामासाठी उपयोग केला जाईल. 
 • जी व्यक्ति मिळून आली नाही त्याची शोध पत्रिका काही कळवधी नंतर डिलीट केली जाईल.
 • तसेच इतर कुठल्याही माध्यमातून या पोर्टल ला हरविलेल्या इसमबाबत कळल्यास किव्हा एखाध्या व्यक्तीचा शोध लागल्यास त्याबाबत संबंधित तापसी अधिकारीना कळविले जाईल.
 • सदर webpage ज्या प्रमाणे शोध पत्रिका येतील त्या प्रमाणे रोज प्रसिद्ध केला जाईल. 

हरविलेल्या व्यक्तीची शोध पत्रिका/तपासयादी नमूना

Leave a Comment