खोट्या आणि निनावी तक्रारी बाबत करायची कार्यवाही (False and Anonymous Complaint)

शासकीय निर्णय नुसार खोट्या आणि निनावी तक्रारी संदर्भात करायची कार्यवाही.

निनावी तक्रारी तसेच खोट्या तक्रारी पडताळणी करिता महाराष्ट्र शासनाने खालील प्रमाणे सूचना दिनांक 25/02/2015 रोजीच्या शासन निर्णय अन्वये निर्गमित केल्या आहेत.

  • ज्या तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमुद केलेला नाही अशा निनावी अर्जदारांच्या तक्रारी मध्ये कोणत्याही स्वरूपाची तक्रार / माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या तक्रारी परस्पर दफ्तरी दाखल करण्यात याव्यात.
  • ज्या तक्रारीमध्ये (vague) असंबध्द असे आरोप केलेले आहेत अशा तक्रारी मध्ये देखील तक्रारदाराची तपासणी न करता अश्या तक्रारी परस्पर दफ्तरी दाखल करण्यात याव्यात.
  • ज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येवू शकेल असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारीचे संबंधात संबंधित प्रशासकीय विभाग/मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी व पुढील कार्यवाही करावी. अशा प्रकरणी सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने सदरहू तक्रार तक्रारदाराकडे पाठवून ती त्यांने स्वतःच केली आहे किवा कसे? याबाबत खात्री करून घेण्यात यावी. तक्रारदाराकडून 15 दिवसामध्ये प्रतिसाद मिळाला नाही तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे व तद्नंतर 15 दिवसांची प्रतिक्षा केल्यानंतर देखील माहिती प्राप्त न झाल्यास सदरहू तक्रार खोटया नावाची (Pseudonymous) तक्रार असल्याचे नमुद करून दफ्तरी दाखल करण्यात यावी.
  • तक्रारदाराने आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास अशा तक्रारीवर कार्यवाही करताना अश्या प्रकारच्या तक्रार अर्जातील अर्जदाराचे नाव व पत्ता झाकुन तक्रारीची छायांकित प्रत काढुन ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवावी व पुढील कार्यवाही करावी.

खोट्या आणि निनावी तक्रारी संदर्भात करायची कार्यवाही संदर्भात इतर जुने शासकीय निर्णय.. आपले अवलोकनार्थ

Leave a Comment