सेवानिवृत्ती (Retirement)

सेवानिवृत्ती (Retirement)

पोलीस अधिकारी/कर्मचारी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होतात. सर्वसाधारणपणे सेवानिवृत्तीनंतर खालीलप्रमाणे लाभ देय आहेत.

 • निवृत्ती वेतन / तात्पुरते निवृत्ती वेतन
 • अंशराशीकरण रक्कम (Commutation of Pension)
 • भविष्य निर्वाह निधी रक्कम (G.P.F.)
 • सेवानिवृत्ती उपदान रक्कम (Gratuity)
 • गट विमा योजना रक्कम (G.I.S.)
 • रजा रोखीकरण रक्कम (Cash Equivalent)

संबंधित अधिकारी / कर्मचारी चे कर्यालयांनी संबंधित विभागांशी समन्वय राखून खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

 • जे पोलीस अधिकारी / कर्मचारी नजिकच्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातील सर्व नोंदीची तातडीने पडताळणी करावी. तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी त्यांचे सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करुन घेण्यात यावी.
 • जे पोलीस अधिकारी / अंमलदार सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचे सेवानिवृत्ती / भविष्य निर्वाह निधी बाबतचे फॉर्म संबंधित वरिष्ठ / प्रभारी पोलीस निरीक्षक यांचेमार्फतीने विहीत मुदतीत त्यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत.
 • निवृत्ती वेतन प्रकरण विहीत वेळेत मा. महालेखापाल कार्यालयास सादर करावेत. त्याबाबत वेळोवळी मा. महालेखापाल कार्यालयास पाठपूरावा करावा व निवृत्ती वेतन प्रकरण विहीत वेळेत मंजूर करुन घेण्यात यावेत.

सेवानिवृत्ती (Retirement) नंतर इतर लाभ..

सेवानिवृत्तीनंतर इतर लाभ.

 • महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत पोलीस अधिकाऱ्यांना 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन, 1 मे, महाराष्ट्र दिन व 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन इत्यादी राष्ट्रीय समारंभाच्यावेळी, महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना ते ज्या दर्जाच्या पदावरुन सेवानिवृत्त झाले असतील त्या दर्जाचा गणवेष परिधान करून ध्वजारोहणास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस नियमावली १९९९, भाग-१, नियम क्र. २४२ (३) मध्ये तरतूद करण्यात आली आहे.

सेवानिवृत्ती चे लाभ वेळेत मिळावे या करिता संचालक लेखा व कोषागारे यांचे आदेश.

सेवानिवृत्त होणारे शासकीय कर्मचारी ना सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ वेळेत मिळावे. लेख व कोषागारे यांचे परिपत्रक. (दिनांक. 12/10/2018) यात खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.

 • सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेवर प्रदान केले जावे यासाठी मनासे निवृत्तीवेतन नियम १९८२ च्या प्रकरण दहा मधील विविध नियमानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे.
 • सदरहू वेळापत्रकाचे पालन काटेकोरपने करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागामार्फत वारंवार शासन निर्णय / परिपत्रकांन्वये विभाग / कार्यालय प्रमुख यांना वेळोवेळी सूचना निर्गमीत करण्यात येतात. (तरीसुध्दा विभाग / कार्यालय प्रमुखांकडून निवृत्तीवेतन, उपदान, भनिनि अंतिम प्रदान, रजा रोखीकरण प्रत्यक्ष अदा करण्याच्या विहित कार्यपध्दतीचे पालन न केल्यामुळे बऱ्याच प्रकरणी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना / अधिकाऱ्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ विलंबाने प्रदान केले जात असलेचे निदर्शनास आले आहे.)
 • शासन निर्णय दिनांक 18/08/2008,  02/07/2015, व 30/12/2015 अनुसार शासकीय कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन प्रदान करण्याकरिता सुधारित कार्यपध्दती लागू करण्यात आली आहे.
 • निवृत्तीवेतन प्रदान आदेश प्राप्त झाल्यानंतर नमुना अ, नमुना ब, नमुना 42-अ व नमुना क (शासन परिपत्रक दिनांक 18/07/2018) असे हे नमूने दहा दिवसांच्या आत ऑनलाईन तसेच पोस्टाद्वारे दहा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या आत प्रदान कोषागारास स्पीड पोस्ट/ रजिस्टर ए.डी./ हस्त बटवडा च्या माध्यमातून पाठविणे नियमानुसार अनिवार्य आहे.
 • सर्व विभाग/ कार्यालय प्रमुख यांना सूचित करण्यात येते की, महालेखापाल कार्यालयांकडून निवृत्तीवेतन प्रदानाचे प्राधिकारपत्र प्राप्त झाल्यानंतर आवश्यक प्रमाणपत्रे दहा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांच्या आत प्रदान कोषागारास पाठविणे नियमानुसार अनिवार्य आहे. (अन्यथा संबंधीत विभाग / कार्यालय प्रमुख यांचे अधिपत्याखालील प्रलंबित निवृत्तीवेतन प्रदान आदेशांची माहिती त्यांच्या संबंधीत विभागास पाठवून योग्य ती कारवाई करण्याकरिता प्रस्तावित करणेत येईल.)
 • महालेखापाल कार्यालयांकडून उपदान, भ.नि.नि. अंतिम प्रदान या प्रकारची प्राधिकारपत्रे प्राप्त झाल्यानंतर एका महिन्याच्या आत प्रदानाकरिता आवश्यक देयके संबंधीत कोषागारास सादर करण्यात यावी. (अन्यथा प्रलंबित प्राधिकार पत्रांबाबत संबंधीत विभागास पत्राद्वारे सूचित करण्यात येईल.)
 • अशी कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास व त्या प्रकरणी व्याज प्रदान करण्याचा प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतची सर्व जबाबदारी संबंधीत विभाग / कार्यालय प्रमुखांवर राहील. याची सर्वांनी नोंद घेऊन प्रकरणी उचित कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करणेची दक्षता घेणेत यावी.

Leave a Comment