पोलीस अधिक्षक (SP)

पोलीस अधिक्षक/तरतूद/कामे/इतर बाबी

पोलीस नियमावली भाग -1, प्रकरण 1, कलम (4)( १ ) नुसार प्रत्येक जिल्हयाकरीता एक पोलीस अधीक्षक असतात.

 • आवश्यकतानसार एक अथवा अधिक अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक असतात.
 • जिल्हयाची विभागणी उपविभागामध्ये केलेली असते, आणि त्यावर सहाय्यक अथवा उप पोलीस ‘अधीक्षक दर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभारी असतात.
 • उपविभाग मध्ये पोलीस ठाणे असतात त्यावर ठाणेदार प्रमुख अधिकारी असतो.
 • पोलीस ठाणे अंतर्गत दुरक्षेत्र असतात.

पोलीस नियमावली भाग -1, कलम (२५) – पोलीस अधीक्षक

( १ ) जिल्हादंडाधिकारी आणि पोलीस महासंचालक यांच्या आदेशाच्या अधीन राहून संपूर्ण जिल्हयातील पोलीसांबाबतचे निर्देश आणि नियंत्रण पोलीस दलाचे कार्यकारी प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शस्त्रे, कवायत, व्यायाम, गुन्हे प्रतिबंध आणि अन्वेषण, अभियोग चालविणे, शिस्त आणि इतर कार्यकारी बाबींसह दलाच्या अंतर्गत गृह व्यवस्थेवर त्यांचे पूर्णपणे नियंत्रण असते.

( २ ) ज्या क्षेत्रावर अपर पोलीस अधीक्षक यांना नेमलेले असते, त्या क्षेत्राकरीता ते पोलीस अधीक्षकांप्रमाणेच असतात, आणि राज्य शासनाने त्यांच्यावर सोपवल्यानुसार पोलीस अधीक्षक यांची कर्तव्ये पार पाडतात, आणि अधिकार चालवतात. ( मुंबई पोलीस कायदा कलम १६).

पोलीस अधीक्षक हे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी असतात, ते एखाद्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असतात.

पोलीस अधिक्षकांच्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये खालील बाबी समाविष्ट आहे:

 • कायदा आणि सुव्यवस्था राखणे: पोलीस अधिक्षक हे त्यांच्या अधिकारक्षेत्रातील नागरिकांची सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात. गुन्हे रोखणे, सार्वजनिक अशांतता नियंत्रित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करून कायदा व सुव्यवस्था राखणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. या करिता ते, बंदोबस्त तैनात करणे, नाकाबंदी, All Out Operation, प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादी मार्गाचा वापर करतात.
 • गुन्ह्यांचे प्रतिबंध आणि तपास: पोलीस अधिक्षक त्यांच्या कार्यालयातील विविध शाखा मार्फत गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेवतात. गुप्त माहिती गोळा करून, गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यावर लक्ष ठेवून आणि सक्रिय उपाययोजना करून ते रोखण्यासाठी कार्य करतात. या करिता ते गुन्हे पडतळणी, जिल्ह्याबाहेर महाराष्ट्र राज्य अंतर्गत तपासास परवानगी, (महाराष्ट्र राज्याबाहेर च्या तपसास IG/DIG सा. परवानगी देतात.) तपास खर्चास मंजुरी इत्यादी कामे करतात.
 • पोलिस कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण व व्यवस्थापन: पोलीस अधिक्षक त्यांच्या अधिकार क्षेत्रा खालील पोलिस कर्मचार्‍यांच्या तैनाती आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार असतात. पोलिस अधिकारी योग्यरित्या प्रशिक्षित, सुसज्ज करणे आणि त्यांची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करणे हे पोलीस अधिक्षक यांनी करणे अपेक्षित आहे. या करिता पोलीस अधिक्षक यांना, अधिकारी/कर्मचारी संदर्भात चौकशी बदली, बक्षीस, शिक्षा, निलंबन, इत्यादी अनेक अधिकार आहेत.
 • गोपनीय माहिती घेणे : पोलीस अधिक्षक आपल्या अधिकार क्षेत्रात घडणाऱ्या घटनांची गोपनीय माहिती गोपनीय शाखेमार्फत, घेऊन, कार्यक्रमाचे रूपरेषा प्रमाणे बंदोबस्त तैनात करतात, व संभावित अनुचित घटना टाळतात.
 • कार्यालयीन कामकाज : पोलीस अधिक्षक यांच्या हाताखाली मुबलक प्रमाणात, मंत्रालयीन कर्मचारी असतात, जे पोलीस अधिक्षक यांचे कार्यालयीन कामकाज सुचारू प्रकारे चालावे याकरिता त्यांना मदत करतात. मंत्रालयीन कर्मचारी वर देखरेख ठेवण्यासाठी office superintendent (कार्यालयीन अधिक्षक) ची नेमणूक केली असते.
 • मोटार परिवहन विभाग : जिल्ह्यातील कामकाज सूचारू पद्धतीने चालावे या करिता पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात वाहने तैनात करण्यात आली असतात. त्याचे व्यवस्थापन करण्या करिता पोलीस अधिक्षक यांच्या हाताखाली मोटार परिवहन विभाग असतो.
 • इतर एजन्सींसोबत समन्वय: पोलीस अधिक्षक यांनी गुन्हेगारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायपालिका, स्थानिक प्रशासन आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी यांसारख्या इतर एजन्सींसोबत योग्य समन्वय ठेवून काम करणे आवश्यक आहे.
 • Community policing : पोलीस अधिक्षक यांनी ते ज्या समुदायाची सेवा करतात त्यांच्याशी संलग्न असणे आणि पोलिस आणि जनता यांच्यात विश्वास आणि सहकार्य निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील लोकांच्या गरजा आणि गुन्हेगारी विषयक समस्यांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे. या सोबतच पोलिस स्टेशन स्थरावर काही Community Policing च्या योजना राबविल्या जातात.

(एकंदरीत, पोलीस अधीक्षकाची भूमिका आव्हानात्मक असते आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची असते. या करिता उच्च दर्जाची समज, व्यवस्थापन कौशल्य आणि समर्पण आवश्यक असते.)

Leave a Comment