स्टेशन डायरी अंमलदार

......... अश्या परिस्थितीत स्टेशन डायरी अंमलदारनी काय करावे?

ऑनलाइन/फोन वरून आर्थिक फसवणूक झालेल्या  व्यक्तीस, पोलीस ठाणे डायरी अंमलदारनी (स्टेशन डायरी इन्चार्ज) त्वरित

सायबर हेल्पलाइन नंबर

1930

वर फोन लावून तक्रार नोंदविण्यास सांगावे.

माझा मोबाईल हरविला आहे अशी तक्रार घेवून तक्रारदार आल्यास, ठाणे अंमलदाराने त्वरीत खलील प्रमाणे कारवाही करावी…

  • सादर इसमचा मोबाईल मिसिंग चा अर्जं त्याचेच हस्ताक्षरात घ्यावा.
  • सादर अर्जाची गहाळ रजिस्टर ला नोंद करावी.
  • सादर तकरारदरस CEIR या सरकारी पोर्टल (Link) वर आपले मोबाईल मिसिंग झाले बाबत माहीती नोंदविण्यास कळवावे.

तकरारदरस खलील माहिती आवर्जून सांगावी…

  • आपला मोबाइल हरविला आहे तो हे पोर्टल शोधून देईल. तुम्हाला वारंवार पोलिस स्टेशन किव्हा सायबर पोलिस स्टेशन ला जायची गरज नाही.
  • मोबाईल चा शोध लागला किव्हा कसे ? हे बघण्याकरीता, आपल्याला मिळालेल्या Complaint ID नंबर ने आपण CEIR पोर्टल वरील Ticket Status Report (Link) या ठिकाणी जावून आपला मोबाइल मिसिंग ची सध्या स्थिती पाहू शकतो.

मोबाईल चा शोध लागल्याचे CEIR पोर्टल चे status वर दिसून आल्यास काय करावे?

  • संबंधित पोलिस स्टेशन मध्ये जावून आपला मोबाईल चा शोध लागला असे कळवुन पोलीसांचे मदतीने मोबाईल ताब्यात घ्यावा.
  • मोबाईल ताब्यात आल्यावर (च) CEIR पोर्टल वरील unblock या option वर जाऊन आपला मोबाईल UNBLOCK करावा (Link) व मोबाईल वापरणे सुरू करावे.

CEIR बाबत अधिक महिती या ठिकाणी पहावी….

  • सदर जखमी इसमास त्वरित उपचार कमी दवाखान्यात पाठविण्याची व्यवस्था करावी.
  • आपला कर्मचारी जखमी इसमसोबत ध्यावा.
  • जखमीचे बयाण घेणे कमी अनुभवी पोलिस अंमलदार पाठवावा.
  • पो.स्टे. ला दुखा:पतीच्या गुन्ह्याची तक्रार आल्या बाबत PSO ना कळवावे.
  • सादर बाबतीत परिस्थिती प्रमाणे गुन्हा / NC दाखल करावी.
  • घटणे प्रमाणे स्टेशन डायरी नोंदी घ्याव्यात.

दुखा:पतीचा गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे अंमलदाराने त्वरीत करावयाची कारवाही….

मुले पालकाची काळजी घेत नाही, त्यांची देखभाल करीत नाही, अश्या प्रकारची तक्रार पोलिस स्टेशनला आल्यास पोलिसांनी/ठाणे अंमलदाराने त्वरीत करावयाची कार्यवाही….

स्टेशन डायरी अंमलदार

  • हि सतत चालनारी ड्यटी असुन, पोलीस ठाण्यात २४ तास सतत ड्युटीसाठी अधिकारी व कर्मचारी नेमले जातात.
  • आयुक्तालयात प्रामुख्याने PSI व  API दर्जाचे अधिकारी असतात. त्यांना डे ऑफीसर, नाईट ऑफीसर (स्टेशन हाऊस ऑफीसर) असे संबोधिले जाते.
  • ग्रामीण भागात पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) या दर्जाचे अधिकारी ठाणे अंमलदार ड्युटीस असतात. दिवसा ८ तास व रात्री १२ तास ड्युटी करतात.
  • त्यांच्या मदतीला पोलीस कर्मचारी देखील असतात.

पोलीस ठाणे डायरी अंमलदार (स्टेशन डायरी इन्चार्ज) ची कामे..

  • स्टेशन डायरीचा चार्ज घेणे, स्टेशन डायरी ००:०१ वाजेपासून २४:०० वा. पावेतो २४ तास सुरु असते. डायरीत वेळोवेळी हद्दीतील घटना, गुन्हे, महत्त्वाचे फोन, माहिती, इतर हालचाली यांच्या वेळेप्रमाणे नोंदी घेतल्या जातात.
  • ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींची नोंद स्टेशन डायरीमध्ये घेने .
  • शेवटी दिवसभरातील गुन्हे, अदखलपात्र गुन्हे, प्रतिबंध कारवाई, अकस्मात मृत्यु नोंद व इतर नोंदी गोशवाऱ्याचे स्वरुपात घेतल्या जातात.
  • पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करून, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपासी अंमलदाराकडे तपासकामी त्वरीत सोपविने.
  • ठाणे अंमलदार, जिल्हा स्थरावरील व आयुक्त स्थरावरील पोलीस नियंत्रण कक्ष, तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या संपर्कात राहून त्यांच्या आदेशान्वये काम करतो व त्यांना नियमीत पोलीस स्टेशन हद्दीत घडनाऱ्या  घटनांची माहिती देत असतो.

स्टेशन डायरी बुक

नाकाबंदी रजिष्टर

खबरी बुक

खबरी बुक भाग १ ते ५

खबरी बुक भाग ६

खबरी बुक दारुबंदी

खबरी बुक अकस्मात मृत्यु

अदखलपात्र (NC) रजिस्टर

पोलीस एन. सी. रजिष्टर

अकस्मात आग रजिष्टर

हरविलेल्या सामानाचे रजिष्टर

मोटार अपघात रजिष्टर

एम. व्ही. ॲक्ट रजिष्टर

हरविलेल्या व्यक्तीचे रजिष्टर

मुसाफिर रजिष्टर

कोर्टातुन जामीनावर सुटलेले, हजेरी लावलेले आरोपी रजिष्टर

एम.एल.सी. (दवाखाना ) रजिष्टर

अटक रजिष्टर

अटक रजिष्टर भाग ६ 

अटक रजिष्टर भाग १ ते ५

अटक रजिष्टर दारुबंदी

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर सी. आर. पी. सी. १०९

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर सी. आर. पी. सी. १४५

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर मुंबई पोलीस प्रोव्हिबिशन अॅक्ट ९३

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर सी. आर. पी. सी. १०७

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर सी. आर. पी. सी. ११०

प्रतिबंधक कारवाई रजिष्टर मुंबई पोलीस अॅक्ट ५५ ते ५७

भेट रजिष्टर

वरिष्ठांनी भेट दिल्याचे रजिष्टर

व्हिजीटर रजिष्टर

ठाणे अंमलदार मदतनीस व त्याची कामे

ठाणे अंमलदार मदतनीस व त्याची कामे..

  • पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे अंमलदारास मदत करणे कामी याची ड्युटी लावलेली असते.
  • पोलीस ठाण्यात तक्रार देणे कामी आलेल्या तक्रारदारांची चौकशी करून, काय तक्रार आहे  याची खात्री करण्याचे काम पोलीस ठाणे मदतनिस कडुन केले जाते.
  • ठाणे अंमलदार इतर कामात व्यस्त असताना पोलीस स्टेशन ला आलेले फोन उचलने व तक्रार दारांचे म्हणने ऐकुन घेणे.
  • पोलीस ठाण्यात हजेरीकरीता आलेल्या विवीध गुन्ह्यातील आरोपींचे हजेरी रजिस्टर ला नोंद करून घेवून पोलीस ठाणे अंमलदार यांना सांगणे.
  • अदखलपात्र गुन्हे नोंदवून तक्रारदारास प्रभारी कोर्टात दाद मागण्यासाठी समन्स देणे इत्यादी कामे ठाणे अंमलदार मदतनिस करतो.
  • ठाणे अंमलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारी नोंदवून घेण्याचे काम ठाणे अंमलदार मदतनिस करतो.
  • आजकाल CCTNS या संगनकीकृत गुन्हे नोंदनी प्रनाली चा वपर गुन्हे नोंद करण्या करीता केला जातो. सदर प्रनालीचे संगनकीय उपकरने सुध्दा हाताळन्याचे काम हा कर्मचारी करतो. तसेच CCTNS प्रनालीवर गुन्हा नोंद करण्याचे काम पोलीस ठाणे अंमलदार मदतनिस करतो.

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे..

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे…

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आपन कटीबध्द आहोत.)