ठाणेदार

पोलीस ठाणे अंमलदार [P.S.O.] (ठाणेदार) विषयी महीती

  • CrPC चे कलम 2(ओ) नुसार, ठाणेदार याचा अर्थ नेहमीचा पोलीस ठाण्यात नेमलेला अंमलदार.

  • पण तो कुठल्याही कारणान्वये आपले कर्तव्य करण्यात असमर्थ असला तर तेथे हजर असलेला लगतखालच्या दर्जाचा इतर पोलीस अधिकारी त्याचे काम पाहील. ( परंतु असा अधिकारी पोलीस शिपाई या पदाच्या वरच्या दर्जाचा असेल.)
  • अगर राज्य शासन निर्देशीत करील त्याप्रमाणे तेथे हजर असलेला कोणत्याही दर्जाचा अधिकारी होय.
  • प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दर्जाचा असेल तर त्यांचे नियंत्रणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हा दुय्यम प्रभारी अधिकारी असतो.
  •  प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा असेल तर त्यांचे नियंत्रणाखाली पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी हा दुय्यम प्रभारी अधिकारी असतो.
  • पोलीस आयुक्तालय किंवा ग्रामीण भागातील मोठ्या पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी प्रभारी अधिकारी असतो. त्यांचे मदतीस इतर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असतात.
  • पोलीस ठाण्याचे कामकाज सुव्यवस्थित चालावे याकरिता दुय्यम अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले जातात. दुय्यम अधिकारी अधिकाराचा वापर अयोग्यरित्या करीत नाही हे पाहाण्याचे काम प्रभारी अधिकारी यांचे असते.
  • दुय्यम प्रभारी अधिकारीनी महत्वाच्या गुन्ह्यांचे तपासात सहकार्य करणे तसेच स्वतः ही स्वतंत्ररित्या तपास करणे अपेक्षित आहे.

पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्याची कर्तव्ये..

  • पोलीस स्टेशन च्या भौगोलीक क्षेत्राची विभागणी ही बीट मध्ये केलेली असते. प्रत्येक बीट वरती एक बीट अंमलदार प्रभारी म्हणून नेमला जातो. हा बीट अंमलदार ASI, HC पोलीस कर्मचारी असतो. बीट अंमलदार चे काम त्या बीट मध्ये घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवणे, त्याची माहिती त्वरित प्रभारी अधिकारी यांना देणे हे आहे. या बरोबरच तो बीट मधील होणाऱ्या अवध्य दारू विक्री, जुगार, सट्टा, इत्यादी ला आळा घालण्याचे काम करतो. बीट मधील सवईचे गुन्हेगार, आडदांड प्रवृत्ती चे लोक यावर तो प्रतिबंधात्मक कारवाई करून बीट परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करतो. बीट मध्ये घडणारे किरकोळ गुन्ह्याचा तपास सुद्धा बीट अंमलदार च करतो.
  • बीट अंमलदार हे त्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सदर बीट अंमलदार चे कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी करीत असतो. 
  • बीट अंमलदार हा त्याच्या प्रत्येक कामासाठी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना जबाबदार असतो.
  • पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारीनी वेळोवेळी बीट अंमलदार व ईतर कनिष्ट कर्मचारींचे कामाचे मुल्यमापन केले पाहिजे. बीट अंमलदार चे कामा बाबत वारंवार तक्रारी येत असल्यास त्यास मार्गदर्शन करून बीट अंमलदार चे कामात सुधारणा घडवून आणावी. बीट अंमलदार चे विरोधात येणाऱ्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असतील तर वेळीच दाखल घेऊन वरिष्ठ कार्यालयास (SDPO, SP) कळवून योग्य ती कार्यवाही करावी.
  • बीट अंमलदार व बीट मधील ईतर कर्मचार्‍यांविरूद्ध च्या गैरवर्तन केल्याच्या आरोपाची चौकशी करुन त्यांचे वरीष्टांना अहवाल पाठविन्याचे काम सुद्धा प्रभारी अधिकारी चे असते.
  • अवैध्य धंद्यास प्रतिबंध करणे. बीट मध्ये अवैध्य धंद्याचे प्रमाण अधिक वाढल्यास पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी ने स्वतः जबाबदारी घेऊन बीट अंमलदार याच्या सहायाने किंवा परस्पर बीट मधील होणारे अवैध्य धंदे, धाडी टाकून बंद करावे.
  • गुन्हे तपासात मार्गदर्शक म्हणुन काम पाहने. खटल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करवुन घेणे. बीट मधील गुन्ह्याचे तपासावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुद्धा प्रभारी अधिकारी यांनी करायचे असते. त्या करिता प्रभारी अधिकारी यांनी, तपासी अधिकारी यांना तपास सूचना देणे व वेळोवेळी तपासाचे कागतपत्र चेक करावे.
  • बीट मधील किरकोळ गुन्हे बीट अंमलदार किंवा दुय्यम अधिकारी तपासत असतात. तर, बीट मध्ये घडणारे गंभीर गुन्ह्याचा तपास शक्यतो प्रभारी अधिकारी यांनी स्वताः करावा. जेनेकरुन योग्य होईल.
  • प्रभारी अधिकारींनी बीट अंमलदार व ईतर पोलीस कर्मचारींना प्रशासनाचे कामात होनारे बदल, कायद्यात होनारे बदल, समजावुन सांगावे, त्या प्रमाने कायदे राबवुन घ्यावे, विभागीय धोरणे आणि कार्यपद्धतीची अंमलबजावणी आपल्या परिसरात बीट अंमलदार करावी करून घेण्याची जबाबदारी प्रभारी अधिकारी यांची असते.
  • गुन्हे शोध, गुन्हे प्रतिबंध, गुन्हयाचा तपास करणे, गुन्हे तपासात मार्गदर्शक म्हणुन काम पाहने. खटल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करवुन घेणे
  • गंभीर गुन्ह्याचा तपास स्वताः करणे.
  • आपल्या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था  राखने.
  • आपल्या क्षेत्रातील अवैध्य धंद्यावर धाडी टाकुन, अवैध्य धंद्यास प्रतिबंध करणे.
  • कनिष्ट कर्मचारी व वरीष्ट अधिका-यांना जोडनारा दुवा म्हणुन काम करणे.
  • कनिष्ट कर्मचारींचे कामाचे मुल्यमापन करणे.
  • पोलीस कर्मचारींना प्रशासनाचे कामात होनारे बदल, कायद्यात होनारे बदल, समजावुन सांगुन त्या प्रमाने कायदे राबवुन घेने. विभागीय धोरणे आणि कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणे.
  • पोलीस स्टेशन चे सर्व दस्तऐवज तयार करून, ते नियमाप्रमाणे भरले जात असले बाबत खात्री करणे, तसे भरवुन घेणे व नोंदी राखणे, अहवाल तयार करणे, विभागीय रेकॉर्डची पूर्तता करणे, हाताळणे आणि देखभाल करणे आणि युनिटची इतर प्रशासकीय कामे व्यवस्थापित करणे.
  • कनिष्ट कर्मचारींचे समश्यांचे निराकरण करणे. पोलीस स्टेशन मधील कर्मचार्‍यांच्या समस्येचे निराकरण करणे.
  • कर्मचार्‍यांविरूद्ध च्या गैरवर्तन केल्याच्या आरोपाची चौकशी करुन त्यांचे वरीष्टांना अहवाल पाठविने.

प्रशासकीय काम :- 

  • पोलीस स्टेशन चे कामकाज चालविण्याची जबाबदारी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची असते.
  • नजीकचे काळात पोलीस स्टेशन प्रभारी ला काही प्रमानात (DDO) वित्तीय अधिकार देण्यात आले असुन तो त्याचे अधिकारात पदाचे प्रमानात दिलेल्या मुदतीतील रक्कम पोलीस स्टेशन चे कामाकरीता खर्च करु शकतो.

कायदा व सुव्यवस्थेचे काम :- 

गुन्हे अन्वेषण चे काम :- 

 काम :- 

प्रशासकीय काम :- 

प्रशासकीय काम :- 

प्रशासकीय काम :- 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे..

आरोपी अटके बाबत, डी.के. बासु प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नी दिलेली मार्गदर्शक तत्वे…

(सदर लिंक ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, कायदेविषयक संकेतस्थळावरुन जशीच्या तशी पुरवली जात असुन याचा उद्देश आपल्या पर्यंत दर्जेदार, सत्य व विश्वसार्य माहीती पोहचावी हा आहे. सदर माहीती आपना पर्यत पोहचवीन्याच्या सर्व अटी-शर्तीचे पालन करण्यास आम्ही कटीबध्द आहोत.)

Leave a Comment