मुद्देमाल मोहरर व लेखनिक पोलीस हवालदार
मुद्देमाल मोहरर
लेखनिक पोलीस हवालदार
- मुद्देमाल अंमलदार हाच शक्यतो लेखनिक अंमलदार म्हणुन काम पाहतो.
- हा अंमलदार पोलीस हवालदार (HC), सहा. पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो.
मुद्देमाल मोहरर ची कामे..
- पोलीस स्टेशन मध्ये असनारे गुन्ह्यातील सर्व प्रकारचे मुद्देमाल रजिष्टर व मुद्देमाल पावती बुक मुद्देमाल मोहरर चे ताब्यात असतात. ते व्यवस्थीत मांडणी करून ठेवण्याचे काम मुद्देमाल मोहरर करीत असतो.
- गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल जमा करणे त्याला मुद्देमाल क्रमांक देणे व वेळोवेळी आवश्यकते प्रमाणे त्याची निर्गती करणे, तसेच कोर्टाच्या आदेशानुसार तक्रारदाराला मुद्देमाल परत करणे ही कामे मुद्देमाल मोहरर ला करावी लागतात.
मुद्देमाल हवालदार यांच्याकडे असलेले अभिलेख :-
- भाग १ ते ५ रजिष्टर
- भाग ६ रजिष्टर
- प्रोव्हिबिशन रजिष्टर
- अकस्मात मृत्यु रजिष्टर
- बेवारस जप्त मुद्देमाल रजिष्टर
- मुद्देमाल पावती रजिष्टर
लेखनिक पोलीस हवालदार बाबत
मुद्देमाल मोहरर हा पोलिस स्टेशन चा वर्ग 3 चा कर्मचारी असून तो पोलिस स्टेशन मधील जप्त माल व वरिस्ट कार्यालयाकडून प्राप्त माल संबंधित कामकाज पाहतो. या सत्रात आपण मुद्देमाल मोहरर ची कामे, मुद्देमाल कसं नाश करावा? पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल कसं प्राप्त करावा या बाबतची माहिती घेणार अहोत.
लेखनिक पोलीस हवालदार
- मुद्देमाल अंमलदार हाच शक्यतो लेखनिक अंमलदार म्हणुन काम पाहतो.
- हा अंमलदार पोलीस हवालदार (HC), सहा. पोलीस उपनिरीक्षक (ASI) यापैकी कोणत्याही पदाचा अंमलदार असू शकतो.
- लेखनिक हवालदार ची नेमनुक करतांना, सिक्युरीटी बॉन्ड घेण्यात येतो. सदर बॉंड हा वरीष्ठ कार्यालयात पाठवायाचा असल्याने या अमलदाराची नेमनुक करतांना वरिष्ठ कार्यालयास कळवावे.
- लेखनिक अंमलदार, पोलीस ठाण्याचे सर्व आर्थिक व्यवहार पाहत असतो.
- लेखनिक हवालदाराच्या कामासंबंधाने संबंधित नेमनुक केल्या गेलेल्या कर्मचारीस विशेष भत्ता पगारामध्ये समाविष्ट दिला जात असतो.
लेखनिक पोलीस हवालदार ची कामे..
- पोलीस स्टेशन मधिल “डे बुक रजिष्टर” लिहिण्याचे काम लेखनिक हवालदार करतो.
- कर्मचारींना बरेचदा पोलीस स्टेशन चे काम सुचारू पध्दतीने चालावे म्हणुन वरीष्ठांच्या परवानगीने काही किरकोळ परंतु अपरीहार्य खर्च करावा लागतो, अशा कर्मचारींच्या रकमांचे बिल मंजुर करून घेवुन त्याचे वाटप करणे.
- पोलीसांच्या व जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन मध्ये पुरेसे हत्यार व दारूगोळा ठेवला असतो. ही हत्यारे व दारूगोळा लेखनिक हवालदार स्वताः चे ताब्यात ठेवतो व हत्यारांचे कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी वाटप व जमा करण्याचे काम करणे करतो. तसेच सदर पो.स्टे. तील हत्यारांची नियमित साफसफाई करून घेणे हत्याराची देखभाल करण्याची प्रमुख कामे तो करीत असतो.
- पोलीस ठाण्यातील अभिलेख व मुद्देमाल यांची व्यवस्थित मांडणी करून त्यांचे जतन करने तसेच त्याची देखभाल करून ते गरजे प्रमाणे उपलब्ध करून देण्याचे काम लेखनिक अंमलदार करीत असतो.
- पोलीस ठाण्यातील विवीध गुन्ह्यातील अटक आरोपींना देण्यात येना-या (खुराक) जेवण भत्ता चा हिशेब हा अंमलदार ठेवतो. त्याचे बिल काढण्याचे काम लेखनिक अंमलदार करतो.
- ज्या वेळेस गुन्हा संपरीक्षे करीता बोर्ड वर येतो तेव्हा त्या संबंधित गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल वेळोवेळी कोर्टात हजर करण्याचे काम लेखनिक हवालदार करतो.
- पोलीस ठाण्यातील ग्रंथालय, जडसंग्रह रजिष्टर हे सुद्धा लेखनिक हवालदार याचे ताब्यात असतात.
- दरवर्षी पोलीस स्टेशन मधिल “ब” रेकॉर्ड छाननी करून मुदत संपलेले रेकार्ड बाबत वरिष्ठांची परवानगी घेऊन ते नाश करण्याचे काम पण लेखनिक हवालदार करीत असतो.
- आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात तसेच ग्रामीन भागातील मोठ्या पोलीस स्टेशन मध्ये मुद्देमाल संबंधाने स्वतंत्र हवालदाराची नेमणूक केली जाते त्याला मुद्देमाल मोहरर असे म्हणतात. तो मुद्देमाल चे कोर्टात मागणीप्रमाणे जमा करणे, कोर्टात दाखल करणे, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मुद्देमालाची निर्गती करणे ही कामे मुद्देमाल मोहरर करीत असतो.
- हत्यार दारुगोळा देवाण-घेवाण रजिष्टर
- कॅश रजिष्टर
- जड वस्तु संग्रह रजिष्टर
- हत्यार दारुगोळा रजिष्टर
- डे-बुक रजिष्टर
- ग्रंथालय रजिष्टर
- जी. एन. पावती रजिष्टर
- अधिकारी-कर्मचारी यांचे पगार बिल रजिष्टर
- आहार भत्ता, साप्ताहीक बिल रजिष्टर
- पोलीस पाटील पगार बिल रजिष्टर
- पोलीस स्टेशन इमारतची पाणीपट्टी रजिष्टर
- पोलीस स्टेशन इमारतची घरपट्टी रजिष्टर
- पोलीसांच्या मालकीची सरकारी जागा रजिष्टर
- कैदी भत्ता बिल रजिष्टर
- एस. टी. वॉरंट रजिष्टर
- रेल्वे वॉरंट रजिष्टर