दुःखापतीच्या गुन्हयाचा तपास कसा करावा. (Investigation of Injury)
दुःखापतीच्या गुन्हयाचा तपास कसा करावा? (Step By Step)
तपासी अंमलदार यास तपास करण्यास एखाद्या दुःखापतीच्या गुन्ह्या बाबत कळवीले असल्यास त्याने खालील प्रमाणे कार्यवाही करावी..
CCTNS FIR + तोंडी रिपोर्ट + MLC इत्यादी इतर कागदपत्र ताब्यात घ्यावे :-
- तोंडी रिपोर्ट ताब्यात घेवुन वाचावी/समजुन घ्यावी/घडलेल्या परीस्तिथीचे आकलन करावे.
- पुरावे काय गोळा करावेत याची यादी करावी.
- (सामान्यताः फिर्याद, MLC, Injury Report, बयान, जप्ती, CA रिपोर्ट, Weapon Query रिपोर्ट, )
- दुःखापतीचा गुन्हा घडल्यास आत्ता लगेच काय करावे व नंतर पुढील तपासात काय करावे याची रुपरेशा आखावी.
- आरोपी जखमी असलेस ज्या पो. कॉन्स्टेबल सोबत पाठविणेत आले त्याची नोंद स्टेशनडायरी अंमलदार कडुन घ्यावी.
- फिर्यादीने काही पुरावे स्टेशन डायरी अंमलदार कडे दिले असल्यास ते ताब्यात घ्यावेत.
- जखमी असल्यास MLC चे कागदपत्र ताब्यात घ्यावेत. (स्टेशन डायरी अंमलदार कडुन/वैद्याकीय अधिकारी कडुन/ जखमी कडुन).
- गुन्हा दाखल केल्या नंतर वर्दी रिपोर्टची प्रत कोर्टात पाठविन्यात आली याची पडताळनी करावी.
वैद्यकीय प्रमाणपत्र :- (MLC)
- जखमीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागवून घेण्यात यावेत.
- त्यात जखमांचे स्वरुप गंभीर आहे काय ? याची खात्री करावी.
- मोठी दुःखापत झाली असल्यास मेडीकल ऑफिसर यांचे कडून खुलासा करुन घेण्यात यावा.
- (IPC कलम 320 :- जखम भरण्यासाठी 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागतो किंवा कसे?)
- डॉक्टर कडुन Injury Report घ्यावा.
- शस्त्र जप्त केले असल्यास दुखापत त्यानेच झाली किवा कसे या बाबत, शस्त्र पडताळनी (Weapon Query) करावी.
- डॉक्टर कडुन शस्त्र पडताळनी (Weapon Query) चा रिपोर्ट प्रप्त करावा.
पुरवनी बयान :-
- फिर्यादीने फिर्यादीत बऱ्याच व महत्वाच्या बाबी कुठल्याही कारनाने नाही सांगीतल्या असतील तर त्या पुरवनी बयानात लिहुन रेकार्ड वर घ्याव्यात.
- फिर्यादीचे पुरवनी बयान घेतांना आवश्यकतेनुसार दुभाषी वापरण्यात यावा.
- फिर्यादी पुरवणी बयान देत असल्यास सही घ्यावी,
इतर साक्षीदारांचे पुरवनी बयानावर सही घेवु नये.
पंचनामा :-
- पंचनामा करतांना सराईत पंच घेण्यात येवू नयेत.
- गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे पंच वापरण्यात येवू नयेत.
- पंचाचे व साक्षीदारांचे पुर्ण नांव, पत्ता, फोन नंबर घेण्यात यावेत.
- पंचनामा करतांना गरज असल्यास दुभाषी वापरण्यात यावा.
- घटनास्थळाचे निरीक्षण करतांना पंचासमक्ष घडयाळयाच्या काटयाच्या दिशेने अथवा विरुध्द दिशेने करुन तपशीलवार पंचनामा करण्यात यावे.
- पंचनामा / जबाब वाचून दाखवून स्वाक्षरी घेण्यात यावी.
जप्ती :-
- जखमीचे अंगावरील कपडे जप्त करण्यात यावेत.
- जप्त केलेल्या वस्तुचा जप्ती पंचनामा तयार करण्यात यावा.
- जखमीचे अंगावरील कपडयावरुन धारदार शस्त्राने जखम झाली अगर कसे याबाबत सविस्तर पंचनाम्यात वर्णन करण्यात यावे.
- जप्त केलेल्या वस्तू कोणत्या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्या हे तपशीलवार, सुसंगतपणे पंचनाम्यात लिहण्यात यावे.
निवेदन पंचनामा :- (आवश्यकते नुसार)
- अटक आरोपी हा गुन्ह्यातील माल/शस्त्र काढून देत असेल तर तो भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे निवेदन पंचनामा करुन माल/शस्त्र जप्त करुन ताब्यात घ्यावे.
- निवेदन पंचनामा करतांना प्रत्येक वस्तू एकत्रित सील न करता वेगवेगळी सिलबंद करण्यात यावी.
बयान :-
- समक्ष पाहणारे साक्षीदारांचे जबाब घेण्यात यावे.
- ऐकीव बयान टाळावे. (काहीच उपाय नसेल तर घ्यावेत. तपासास दिशा मिळु शकते.)
- बयानात इतर साक्षिदारांची नावे घ्यावीत, (नविन साक्षिदार माहीती होतात.)
- सर्व साक्षिदारांचे बयानात घडलेल्या घटना/तारीख/वेळ/घटनास्थळ/शस्त्र या बाबत एकरुपता असावी.
कारणशोध :- (प्रत्येक तपासी अंमलदारने छोट्या भांडणात कारनांचा शोध घ्यावा, यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलघडा होवुन नविन पुरावे समोर येतात. तसेच होवु घातलेल्या मोठ्या गुन्ह्यास वेळीच आळा घलता येते)
- जमिनीचे वा घराचे कारणावरुन सदरचा गुन्हा घडला आहे का? याबाबतचे पुरावे मिळवावे.
- अशा कारणाने गुन्हा घडला असल्यास त्यात पुर्वीचे अर्ज, तक्रारी होत्या का याची खात्री करावी.
- पुर्वीच्या तक्रारी असल्यास त्याचे उतरे तपासाचे कागदपत्रात सामील करावेत.
प्रतिबंधात्मक कार्यवाही :-
- गुन्ह्यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करणेत आली असल्यास ते पुरावे हस्तगत करावेत.
- पुर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असल्यास जामीन बॉन्ड रद्द करण्यास रिपोर्ट पाठवावा.
पोलीस स्टेशन मधिल स्टेशन डायरी अंमलदार, हा फिर्यादीची तक्रार लेखी लिहुन घेतो. स्टेशन डायरी अंमलदार ने फिर्याद दाखल करुन घेतांना खालील बाबींची पडताळनी करणे गरजेचे आहे.
- दुःखापत व्हावी या इरादयाने कृत्य केले असल्याची खात्री करण्यात यावी.
- दुःखापत मोठी होईल हे आरोपीस माहीत असलेची खात्री करण्यात यावी.
- दुःखापतीबाबत सविस्तर व मुद्देसुद माहीती फिर्याद मध्ये घेण्यात यावी.
- घातक शस्त्राने दुःखापत करण्यात आल्याची खात्री करावी.
- आरोपीचे नांव माहीत असलेस नांव वर्दी जबाबामध्ये (फिर्याद मध्ये) घेण्यात यावे.
- गुन्हा कोठे व कसा घडला, गुन्हयात कोणते हत्यार वापरले याचा उल्लेख असावा.
- गुन्हयाची फिर्याद फोनव्दारे/जखमी / नातेवाईकनी दिली आहे याबाबतची माहिती घ्यावी.
- फिर्यादीची फिर्याद घेतांना आवश्यकतेनुसार दुभाषी वापरण्यात यावा.
- फिर्यादीस फिर्याद वाचून दाखवून तोंडी रिपोर्ट व CCTNS प्रिंटेड FIR वर फिर्यादीची स्वाक्षरी घेण्यात यावी.
- आरोपी जखमी असल्यास त्यास ज्या पो. कॉन्स्टेबल सोबत दवाखान्यात MLC व उपचार कामी पाठविन्यात आले त्याची नोंद स्टेशन डायरीत घेण्यात यावी. (त्याची प्रत तपासी अंमलदारास तपास कामी द्यावी.)
- जखमी औषध उपचारासाठी दवाखण्यात परस्पर दाखल झाला असल्यास मेडीकल ऑफिसर यांना MLC करीता कळवावे, (मेडीकल ऑफिसर यांना कळविले बाबत स्टेशन डायरीत नोंद करुन जखमींचे मदतीसाठी अंमलदार यांना आदेश दयावा.)
- जखमींना बघणे व त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यासाठी दवाखाण्यात गेलेल्या अंमलदार त्यांनी बयान/खबर/MLC Report घेवून आल्या बद्दल स्टेशन डायरी अंमलदार यांना रिपोर्ट दयावा.
- रिपोर्ट सोबत वर्दी (फिर्याद/तक्रार) आली असल्यास ती दाखल करुन तशी स्टेशन डायरीत नोंद करण्यात यावी.
- गुन्हा दाखल केल्या नंतर फिर्यादीची प्रत कोर्टात पाठवावी.
दुःखापतीचा गुन्हा घडल्यास लगेच काय करावे?
- जखमी कुनीही असु द्या (आरोपी/फिर्यादी/साक्षिदार/बघनारे सामान्य नागरीक) त्यास वैद्यकीय मदत पुरवीने पोलीसांचे आद्य कर्तव्य आहे.
- टाळाटाळ करुच नका, तुमचे क्षमतेच्या बाहेर असेल तर वरीष्ट अधिकाऱ्यांना कळवा.
- पोलीसांनी जखमींना वैद्यकीय मदत पुरविण्यास टाळाटाळ केल्यास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार त्याचा लगेच ISSUE करतात व समस्या वाढते.
- गुन्हा गंभीर असेल तर, आरोपीस त्वरीत अटक करणे अपेक्षित आहे.
- गुन्हा अदखलपात्र असेल तरीही बऱ्याच वेळा आरोपीस CRPC कलम 151 नुसार ताब्यात घ्यावे लागते. (वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात हे पाउल उचलावे.)
- गुन्ह्यात नेता, पत्रकार, सामाजीक कार्यकर्ते, प्रतिष्ठीत व्यक्ती शामील असेल तर आरोपी अटक किंवा अटक टाळने याचा ISSUE केला जावु शकतो.
- (आरोपी अटके संदर्भात पुढे वाचण्याकरीता येथे क्लिक करा…)
- गुन्हा गंभीर असेल तर, आरोपीने वापरलेले शस्त्र त्वरीत जप्त करणे अपेक्षित आहे.
- बंदुक/तलवार इत्यादी शस्त्र वापरास बंदी असते ते त्वरीत ताब्यात घेने अपेक्षित असते.
- वरिष्ट अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला लगेच भेट देणे अपेक्षित असते.
- यामुळे जनमाणसात सुरक्षिततेची भावना वाढते.
- पोलीसांचे गुन्हागारांवर लक्ष आहे असा संदेश जातो.
- परीस्थितीचे पुर्ण आकलन पोलींसांना येते.
- घटनास्थळावर बघ्यांची गर्दी होने स्वाभाविक आहे.
- बघ्यात दोन्ही बाजुचे लोक उपस्थित असतात, ते परत त्याच मुद्याला धरुन भांडन सुरु करु शकतात.
- गर्दी न पांगवता तशीच राहीली तर चिथवनीखोर याचा फायदा घेवुन विनाकारण त्या परीसरात कायदा व सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करु शकतात.
- गरजे प्रमाणे बंदोबस्त लावावा.